AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UP Crime: मुलींचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणाऱ्या डान्स टीचरला अटक, उत्तर प्रदेशमधील धक्कादायक घटना

आर्यन सोनी गेल्या चार वर्षापासून दबौलीमध्ये अर्बन डान्स अकॅडमी नावाने डान्स क्लासेस चालवत आहे. त्याने तीन मुलींना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांचे लैंगिक शोषण केले. इतकेच नाही तर त्याने मुलींचे अश्लील व्हिडिओही काढले.

UP Crime: मुलींचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणाऱ्या डान्स टीचरला अटक, उत्तर प्रदेशमधील धक्कादायक घटना
भोजपुरी नायकाकडून पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या
| Edited By: | Updated on: Dec 21, 2021 | 6:00 PM
Share

उत्तर प्रदेश : कानपूरमध्ये डान्स शिकवण्याच्या बहाण्याने मुलींचे शोषण करुन अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणाऱ्या डान्स टीचरच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीच्या ब्लॅकमेलिंगला घाबरुन एका मुलीने आपल्या आईच्या अकाऊंटवरुन त्याला पैसे ट्रान्सफर केल्यानंतर त्याची भांडाफोड झाली. आर्यन सोनी उर्फ हिमांशु सोनी असे अटक करण्यात आलेल्या डान्स टीचरचे नाव आहे.

एका मुलीने दिलेल्या पैशांवरुन भांडाफोड

एका पीडित मुलीचे लैंगिक शोषण करताना आरोपीने व्हिडिओ बनवला होता. याच व्हिडिओच्या आधारे तो तिला ब्लॅकमेल करीत होता. त्याने मुलीकडे पैशांची मागणी केली. मुलीने घाबरुन आपल्या आईच्या अकाऊंटमधून त्याला पैसे ट्रान्सफर केले. आपल्या अकाऊंटमधून अचानक पैसे गायब झाल्याने मुलीच्या आईने गोविंद नगर पोलिसात तक्रार दिली. पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सायबर सेलने या प्रकरणाचा तपास केला असता हे पैसे महिलेच्या मुलीच्या डान्स टीचरच्या खात्यात गेल्याचे कळले.

अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करुन व्हिडिओ बनवायचा

पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास केल्यानंतर डान्स टीचरची भांडाफोड झाली. डान्स टीचरच्या अकाऊंटमध्ये पैसे कसे गेले याची चौकशी पोलिसांनी केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी डान्स टीचर आर्यन सोनी उर्फ हिमांशु सोनी याला अटक केली आहे. आर्यन सोनी गेल्या चार वर्षापासून दबौलीमध्ये अर्बन डान्स अकॅडमी नावाने डान्स क्लासेस चालवत आहे. त्याने तीन मुलींना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांचे लैंगिक शोषण केले. इतकेच नाही तर त्याने मुलींचे अश्लील व्हिडिओही काढले. त्याच्या मोबाईलमध्ये सर्व व्हिडिओ पोलिसांना सापडले आहेत.

पोक्सो कायद्याअंतर्गत कारवाई

आरोपी आर्यन सोनीला अटक करुन त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. त्याच्या विरुद्ध कलम 376, 377, 389 सह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलींचे आई वडिल आपली ओळख लपवू इच्छित असल्यामुळे पोलिसांनी सर्व कारवाई गुप्त केल्याचे गोविंद नगरचे पोलीस निरीक्षक रोहित तिवारी यांनी सांगितले. (Dance teacher arrested for blackmailing girls in uttar pradesh)

इतर बातम्या

Chennai Crime: मुलींचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाची हत्या, पीडित तरुणींनीच काढला काटा

Pune Crime |अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नीच्या विरोधात ईडीकडे तक्रार ; मृत व्यक्तीला जिवंत दाखवत जमीन बळकावली

राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.