Russia weapon | रशिया युद्धात धोकादायक लेझर शस्त्र!, 1500 किमीवरूनही करू शकतील युक्रेनवर हल्ला, जाणून घ्या किती धोकादायक

आता रशियाने युक्रेनला प्रत्युत्तर देण्यासाठी आपली लेझर शस्त्रे बाजारात आणली आहेत. पेरेस्वेट आणि जडीरा अशी त्यांची नावे आहेत. जाणून घ्या, पेरेस्वेट आणि जडीरा ही लेझर शस्त्रे किती धोकादायक आहेत आणि त्यांचा वापर कसा केला जाईल...

Russia weapon | रशिया युद्धात धोकादायक लेझर शस्त्र!, 1500 किमीवरूनही करू शकतील युक्रेनवर हल्ला, जाणून घ्या किती धोकादायक
प्रातिनिधीक फोटो Image Credit source: bbc
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 5:51 PM

युक्रेनला युरोपीय देशांकडून सातत्याने आर्थिक आणि लष्करी मदत मिळत आहे. प्रत्युत्तर म्हणून रशिया युद्धात (Russia in the war) (रशियन युक्रेन युद्ध) आपल्या नवीन शस्त्रांचा वापर वाढवत आहे. आता रशियाने युक्रेनला युद्धात हरविण्यासाठी आपली लेझर शस्त्रे (Laser weapons) बाजारात आणली आहेत. पेरेस्वेट आणि जदिरा (Pereswet and Jadira) अशी त्यांची नावे आहेत. या शस्त्रांचा वापर अनेक प्रकारे केला जाऊ शकतो. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी 2018 मध्ये लेझर वेपन पेरेस्वेटचा पहिल्यांदा उल्लेख केला होता. ही दोन्ही शस्त्रे रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात तैनात करण्यात आली आहेत. रशियाचे उप-पंतप्रधान आणि लष्करी विकास प्रभारी युरी बोरिसोव्ह यांनी मॉस्को येथे पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. लेझर वेपन पेरेस्वेट आणि जडीरा ही लेझर शस्त्रे अत्यंत धोकादायक आहेत. या शस्त्रांचा वापर कसा केला जाईल याबाबत रशियाचे उप-पंतप्रधान आणि लष्करी विकास प्रभारी युरी बोरिसोव्ह यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

दोन्ही शस्त्रे अत्यंत धोकादायक

रशियाचे डेप्युटी पीएम युरो बोरिसोव्ह म्हणतात, ही दोन्ही लेझर शस्त्रे धोकादायक आहेत. जर तुम्ही दोघांची तुलना केली तर पेरेस्वेटपेक्षा जडीरा अधिक धोकादायक आहे. WION च्या अहवालानुसार, Peresvet हे असे लेझर शस्त्र आहे जे पृथ्वीपासून 1500 किमी अंतरावर असलेल्या उपग्रहांचाही नाश करू शकते. युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धात पेरेस्वेटची तैनाती किती महत्त्वाची आहे, हे आपण एका उदाहरणाने समजू शकतो. अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांवर सहसा उपग्रहांच्या मदतीने लक्ष ठेवले जाते. जर युक्रेनने रशियावर हल्ला करण्यासाठी अशा क्षेपणास्त्राचा वापर केला, तर हे पेरेस्वेट स्वतःच उपग्रह नष्ट करेल, ज्यावरून क्षेपणास्त्रावर लक्ष ठेवले जाईल. म्हणजे फक्त जमिनीतच नाही, आकाशातही रशिया आता युक्रेनची योजना हाणून पाडण्याच्या तयारीत आहे. एवढेच नाही तर हे लेझर शस्त्र फायटर जेटच्या पायलटला त्याच्या किरणांनी आंधळे करू शकते.

सैनिकांना आंधळे करणारे शस्त्र

जडेरा 5 किमी अंतरावरुन 5 सेकंदात ड्रोन-क्षेपणास्त्र नष्ट करेल रशियन मीडियाने 2017 मध्ये आपल्या लेझर अस्त्र जडेराबद्दल प्रथम वृत्त दिले होते. रशियन मीडियानुसार, जडेरा न्यूक्लियर कॉर्पोरेशन रोसाटॉमने बांधले आहे. हे शस्त्र शत्रूचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे 5 किलोमीटर अंतरावरून 5 सेकंदात जाळून नष्ट करते. हे लेसर शस्त्र अवरीत प्रकाशाचे किरण शत्रूच्या लक्ष्याकडे पाठवते जोपर्यंत शस्त्रुचा नायनाट होत नाही तोवर. अखेर लक्ष्याला पूर्ण जाळून नष्ट केले जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही लेझर शस्त्रे ब्रिटनचे संरक्षण तळ पूर्णपणे नष्ट करू शकतात आणि सैनिकांना आंधळे करू शकतात.

हे सुद्धा वाचा

रशियाकडे अशी किती शस्त्रे आहेत?

रशियाकडे अशी किती शस्त्रे आहेत असा प्रश्न जेव्हा रशियाच्या उपपंतप्रधानांना विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की युक्रेनमध्ये वापरला जाणारा जडीरा हा प्रोटोटाइप आहे, म्हणजेच अशा प्रकारचे हे पहिले लेझर शस्त्र आहे. त्याची चाचणी या वर्षी मे महिन्यातच झाली होती. त्याच वेळी, पेरेस्वेट देखील युक्रेन विरुद्ध वापरला जात आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.