प्रजासत्ताक दिनादिवशी दिल्लीत हवाई हल्ल्याची शक्यता; ड्रोनसारख्या उडणाऱ्या वस्तूंवर बंदी
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पुढील 27 दिवस म्हणजेच 15 फेब्रुवारीपर्यंत दिल्लीत ड्रोनसारख्या उडणाऱ्या वस्तुंवर बंदी घालण्यात आली आहे. दहशतवाद्यांकडून हल्ला होण्याची भिती असल्याने दिल्लीच्या पोलीस आयुक्तांकडून ड्रोनसारख्या हवेत उडणाऱ्या वस्तुंवर बंदी घालण्यात आली आहे.
दिल्लीः देशात प्रजासत्ताक दिन (Republic Day) जवळ येत आहे, त्या धर्तीवर आता दहशतवाद्यांकडून दिल्लीत हवाई हल्ला (Terrorist Air Strike) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दहशतवादी हल्ल्याची भिती व्यक्त केली गेल्याने दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना (Rakesh Asthana) यांनी सुरेक्षेबाबत आदेश काढला आहे. यामध्ये ड्रोनबरोबरच हवेत उडवल्या जाणाऱ्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्थेकडून दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्तांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीत पुढील 27 दिवस कोणत्याही प्रकारचे ड्रोन, पॅरा ग्लायडिंग, पॅरा मोटर्स, हँग ग्लाईडर, मानवरहित एरियल वाहन हवेत उडविण्यावर बंदीचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
याबरोबरच मायक्रो लाईट एअरक्राप्ट, रिमोटवर हवेत उडणाऱ्या वस्तू, हॉट इअर बलून्स, लहान आकारातील विमाने उडविण्यावरही 37 दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्थेकडून सतत मिळणाऱ्या सूचना आणि माहितीच्या आधारावर पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. दहशतवाद्यांकडून सामान्य नागरिक, उच्च पदावर असणाऱ्या व्यक्ती आणि संवेदनशील इमारतींवर हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पुढील 27 दिवस म्हणजेच 15 फेब्रुवारीपर्यंत हा नियम लागू केला जाणार आहे. या आदेशानंतर पोलीस खात्यातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना पुढील 37 दिवसांपर्यंत कोणत्याही हवाई हालचाली होणार नाहीत याबाबत सतर्कता बाळगण्यास सांगितले आहे.
देशाच्या राजधानीत प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येलाच दिल्ली पोलिसांकडून रोहिणी सेक्टर 35 या परिसरात मोठी कारवाई केली आहे. यामध्ये ३६ वर्षीय कपिल सांगवान या तरुणाला हत्यारांची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. यामध्ये अत्याधुनिक पिस्तूल आणि 38 जिवंत काडतूसे सापडली आहेत.
(सौजन्यः टीव्ही नाईनच्या वेबसाईटवरून घेतली आहे)
संबंधित बातम्या