Rozgaar Budget: 5 वर्षात 20 लाख नोकऱ्या देणार, आपचा ‘रोजगार’ बजेट सादर; दिल्लीकरांसाठी आणखी काय?
दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री मनिष सिसोदिया यांनी 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा दिल्लीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. 75 हजार 800 कोटीचा हा अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पाला रोजगार बजेट असं नाव देण्यात आलं.
नवी दिल्ली: दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा दिल्लीचा अर्थसंकल्प (Delhi Budget 2022) सादर केला आहे. 75 हजार 800 कोटीचा हा अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पाला ‘रोजगार बजेट’ (Rozgaar budget) असं नाव देण्यात आलं. तसेच येत्या पाच वर्षात दिल्लीकरांना 20 लाख नोकऱ्या देण्याचं उद्दिष्ट्येही या अर्थसंकल्पातून व्यक्त करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी आपने देशभक्ती बजेट मांडलं होतं. या वर्षी आम्ही रोजगार बजेट मांडलं आहे. त्यानुसार आम्ही दिल्लीकरांना जास्तीत जास्त नोकऱ्या देणार आहोत, असं मनिष सिसोदिया यांनी सांगितलं. सिसोदिया यांचा हा आठवा अर्थसंकल्प आहे. आमच्या 7 अर्थसंकल्पामुळे दिल्लीतील शाळा चांगल्या झाल्या आहेत, लोकांना विजेचं शून्य बिल येत आहे, मेट्रोचा विस्तार झाला आहे, सुविधा फेस लेस झाल्या आहेत, आता लोकांना सरकारी कार्यालयात खेपा माराव्या लागत नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
गेल्या सात वर्षात 1.8 लाख सरकारी रोजगारात 51307 सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत. विद्यापीठात 2500, हॉस्पिटलमध्ये 3000 रोजगार, गेस्ट टीचर म्हणून 25, सॅनिटेशन अँड सिक्युरिटीमद्ये 50 हजार रोजगार देण्यात आले. आता दिल्लीत लोक सरकारी कार्यालयात फेऱ्या मारत नाहीत, असं मनिष सिसोतदिया यांनी सांगितलं.
फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन
या अर्थसंकल्पात दिल्ली फिल्म पॉलिसीसाठी काम करण्यात आलं आहे. त्यामुळे तरुणांना रोजगार मिलेल. तसेच दरवर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरवण्याची घोषणाही करण्यात आली आहे. रिटेल सेक्टर, फूड अँड बेव्हरेज, ट्रॅव्हल अँड टुरिझम, लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन, एंटरटेन्मेंट, बांधकाम श्रेत्र, रिअल इस्टेट आणि ग्रीन एनर्जीमध्ये रोजगार देण्याची दिल्ली सरकारची योजना आहे. यावेळी सिसोदिया यांनी अमेरिकेचं उदाहरण दिलं. आपण तरुणांना रोजगार दिले तर ते खर्चही करतील. त्यामुळे खप वाढेल आणि विकासही होईल, असं त्यांनी सांगितलं.
शॉपिंग फेस्टिव्हलचं आयोजन
तसेच रिटेल मार्केटला प्रोत्साहन देण्यासाठी दिल्लीत शॉपिंग फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे खरेदी विक्री वाढेल. होलसेल मार्केटलाही प्रोत्साहित करण्यासाठी होलसेल शॉपिंग फेस्टिव्हलचंही आयोजन केलं जाणार आहे. स्थानिक बाजारात दुकानदारांना ग्राहकांना जोडून घेण्यासाठी पोर्टलची सुरुवात करण्यात येणार आहे. गांधी नगर कपडा मार्केटला दिल्ली गार्मेंट हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे. दिल्लीच्या फूड हबचा पुनर्विकास करण्यात येईल. तसेच क्लाऊड किचनची निर्मितीही केली जाणार आहे.
This year’s Budget is called ‘Rozgar Budget’!
We aim to create 20 Lakh New Jobs in Delhi, in the next 5 years.
-Dy CM @msisodia #DelhiBudget2022 pic.twitter.com/insg0mreXB
— AAP (@AamAadmiParty) March 26, 2022
संबंधित बातम्या:
तब्बल 1 हजार कोटींचा घोटाळा करून नाशिकमध्ये लपला; भूमाफियाला दिल्ली पोलिसांच्या बेड्या!