काहीही करून ऑक्सिजनचं संकट दूर करा, लोक मरत आहेत; दिल्ली हायकोर्टाचे केंद्र सरकारला निर्देश

नवी दिल्लीत ऑक्सिजनचं प्रचंड संकट निर्माण झालं आहे. लोक ऑक्सिजनसाठी भटकत आहेत. त्याची दिल्ली उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. (Delhi High court slams central government Govt for oxygen shortage)

काहीही करून ऑक्सिजनचं संकट दूर करा, लोक मरत आहेत; दिल्ली हायकोर्टाचे केंद्र सरकारला निर्देश
oxygen-shortage
Follow us
| Updated on: Apr 29, 2021 | 1:48 PM

नवी दिल्ली: नवी दिल्लीत ऑक्सिजनचं प्रचंड संकट निर्माण झालं आहे. लोक ऑक्सिजनसाठी भटकत आहेत. त्याची दिल्ली उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. काहीही करा आणि ऑक्सिजनचं संकट दूर करा, लोक मरत आहेत, असे निर्देशच दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. (Delhi High court slams central government Govt for oxygen shortage)

टँकर्स ऑक्सिजन पुरवठ्याची मोठी ताकद आहे, असं सांगतानाच तुम्हाला काही तरी करावं लागेल. रोज लोक मरत आहेत. जवळच्या नातेवाईकांनाही बेड्स मिळत नाहीत, असं कोर्टाने केंद्राला सांगितलं. राजधानी दिल्लीत इतर राज्यातून कोरोनाचे रुग्ण उपचारासाठी येत असल्याचं कोर्टाने मान्य केलं. मात्र, कोणत्याही रुग्णाला उपचारापासून दूर ठेवता येणार नाही. कोर्ट जे काही सांगत आहे, त्यामुळे लोक पॅनिक होत नाहीयेत. तर जी वस्तुस्थिती आहे, त्यामुळे लोक पॅनिक होत असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.

महाराष्ट्राला किती ऑक्सिजन दिलं?

रुग्णालयात बेड रिकामे आहेत. कारण तिथे ऑक्सिजन नाहीये. त्यामुळे ही समस्या तुम्हाला सोडवावी लागणार आहे. ही समस्या कशी सोडवणार ही तुमची जबाबदारी आहे, असं सांगतानाच तुम्ही महाराष्ट्राला किती ऑक्सिजन दिलं, असा सवालही कोर्टाने केंद्राला केला. त्यावर संपूर्ण देशातील ऑक्सिजन पुरवठ्यावर फोकस करू नये ही आमची विनंती आहे, असं केंद्राने सांगितलं.

आम्ही दिल्लीसोबत

दरम्यान, केंद्राच्यावतीने सॉलिसिटर जनरल यांनी आम्ही या संकटात दिल्लीच्या सोबत असल्याचं स्पष्ट केलं. दिल्लीला आता जेवढा साठा आवश्यक आहे. तेवढ्या ऑक्सिजनचा पुरवठा करत आहोत. उद्या जर त्सुनामीसारखी स्थिती निर्माण झाली तर परिस्थिती बदलले, असं केंद्राने सांगितलं.

दिल्ली सरकारचा आरोप

यावेळी दिल्ली सरकारनेही कोर्टात आपली बाजू मांडली. ऑक्सिजन पुरवठ्यामध्ये केंद्राकडून अडथळे येत आहेत. केंद्र सरकार ऑक्सिजन पुरवठा करण्यात अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारवरही जबाबदारी टाकली पाहिजे. केंद्राने आतापर्यंत काहीच ठोस पावलं उचलली नाहीत. केंद्र सरकार केवळ आदेश मंजूर करण्याचं काम करत आहे, असा आरोप दिल्ली सरकारने केला आहे. दिल्लीत ऑक्सिजन आणि औषधांचं उत्पादन होत नाही. त्यामुळे आम्ही हतबल आहोत. अशा वेळी केंद्र सरकारला उत्तरदायी ठरवलं पाहिजे, असं दिल्ली सरकारने म्हटलं आहे. (Delhi High court slams central government Govt for oxygen shortage)

संबंधित बातम्या:

लग्नानंतर 24 तासात नववधूला वैधव्य, कार सजवण्यासाठी गेलेल्या नवरदेवाचा अपघाती मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना, रुग्णवाहिका न मिळाल्याने मुलाने बाईकवरुन नेला आईचा मृतदेह

कोरोनाचं तांडव सुरुच, भाजपच्या तिसऱ्या आमदाराचं निधन

(Delhi High court slams central government Govt for oxygen shortage)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.