Twitter:”ट्विटरने लोकांच्या भावनांचा आदर करणे गरजेचं,” दिल्ली उच्च न्यायालयचे आदेश

"तुम्ही सामान्य लोकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे कारण तुम्ही लोकांसाठी व्यवसाय करत आहात. त्यांच्या भावनांना महत्त्व दिले पाहिजे. तुम्ही अशा पोस्ट काढून टाका,” असे सरन्यायाधीश डीएन पटेल आणि न्यायमूर्ती ज्योती सिंग यांच्या खंडपीठाने सांगितले.

Twitter:ट्विटरने लोकांच्या भावनांचा आदर करणे गरजेचं, दिल्ली उच्च न्यायालयचे आदेश
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 10:04 PM

नवी दिल्ली: दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी ट्विटरला हिंदू देवतांशी संबंधित आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितले. कोर्टाने म्हटले की ट्विटरसारख्या लोकप्रिय सोशल मीडिया माध्यामांना आपला व्यवसाय करताना, सामान्य लोकांच्या भावनांचा आदर करणे गरजेचं आहे. याचिकाकर्ते आदित्य सिंग देशवाल यांनी कोर्टात सांगीतले होते की त्यांना ट्विटरवर हिंदू देवीचे (काली मातेचे) काही अत्यंत निंदनीय पोस्ट आढळल्या होत्या. (delhi high court tells twitter to remove objectional posts of hindu goddess)

न्यायालयाने सांगितले की, “तुम्ही सामान्य लोकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे कारण तुम्ही लोकांसाठी व्यवसाय करत आहात. त्यांच्या भावनांना महत्त्व दिले पाहिजे. तुम्ही अशा पोस्ट काढून टाका,” असे सरन्यायाधीश डीएन पटेल आणि न्यायमूर्ती ज्योती सिंग यांच्या खंडपीठाने सांगितले. तुम्ही राहुल गांधींच्या बाबतीतही ते केले आहे,” असे खंडपीठाने नमूद केले

न्यायालयाने पुढची सुनावणी 30 नोव्हेंबरला ठेवली आहे.

काय आहे ट्विटरविरोधात तक्रार

याचिकाकर्ते आदित्य सिंग देशवाल म्हणाले होते की, @AtheistRepublic नावाच्या ट्विटर अकाउंटवर मा कालीबद्दल काही आक्षेपार्ह पोस्ट्स पाहिल्या आणि देवतेचे प्रतिनिधित्व लज्जास्पद आणि अपमानजनक पद्धतीने केले गेले.

याचिकाकर्त्याने असे सांगितले की याची तक्रार त्यांनी ट्विटरच्या अधिकाऱ्याला केली आणि सूचित केले की ती पोस्ट माहिती तंत्रज्ञान मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचार संहिता नियम, 2021 ( Information Technology Intermediary Guidelines and Digital Media Ehtics 2021) चे उल्लंघन करते.

जुलैमध्ये ट्विटरने दिल्ली उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून सांगितले होते की, कंपनी नवीन आयटी नियमांतर्गत अंतरिम मुख्य अनुपालन अधिकारी आणि अंतरिम स्थानिक तक्रार अधिकारी यांची नियुक्ती करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे.

काय आहेत नवीन आयटी नियम

केंद्र सरकारने काही महिन्यांपुर्वी देशातील सर्व सोशल मीडिया कंपन्यांना (Social Media Companies) Facebook, Twitter आणि Instagram इत्यादी याना काही नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले. 25 फेब्रुवारी 2021 रोजी भारत सरकारच्या MEITY ने सर्व सोशल कंपन्यांना नवीन नियमांचे पालन करण्यासाठी तीन महिने दिले होते. यामध्ये भारतात आपला अधिकारी आणि कॉंटेक्स अॅड्रेस देणे, अनुपालन (कम्प्लायन्स) अधिकाऱ्यांची नेमणूक, तक्रारीचे निवारण, आक्षेपार्ह कंटेंटचे निरीक्षण करणे, अनुपालन अहवाल आणि आक्षेपार्ह कंटेंट काढून टाकणे अशा नियमांचा समावेश आहे.

Other news

नाव बदलल्यानंतर Facebook युजर्ससाठी नेमकं काय बदलेल? जाणून घ्या झुकेरबर्ग काय म्हणाले?

मुकेश अंबानींची पेट्रोल पंप क्षेत्रात जोरदार एंट्री; वाहनाशी संबंधित सगळ्या सेवा मिळणार एका छताखाली

delhi high court tells twitter to remove objectional posts of hindu goddess

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.