दिल्ली हिंसा: राकेश टिकैत यांच्यासह 6 शेतकरी नेत्यांवर गुन्हे दाखल

दिल्ली हिंसाचार प्रकरणी शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यासह सहा शेतकरी नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Delhi Police FIR names Rakesh Tikait, others for Jan 26 violence)

दिल्ली हिंसा: राकेश टिकैत यांच्यासह 6 शेतकरी नेत्यांवर गुन्हे दाखल
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 3:51 PM

नवी दिल्ली: दिल्ली हिंसाचार प्रकरणी शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यासह सहा शेतकरी नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रॅली काढण्यासाठी दिलेल्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Delhi Police FIR names Rakesh Tikait, others for Jan 26 violence)

काल मंगळवारी प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. या रॅलीदरम्यान हिंसा भडकली होती. आखून दिलेल्या मार्गावरून ही रॅली काढण्यात आली नव्हती. तसेच रॅली काढण्यासाठी जे नियम घालून दिले होते. त्याची अमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी शेतकरी नेते राकेश टिकैत, डॉ. दर्शनपाल, जोगिंदर सिंग, बुटा सिंग, बलबीर सिंग राजेवाल आणि राजेंद्र सिंग यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल आहेत. ही रॅली काढण्यासाठी या नेत्यांची सरकार आणि पोलिसांशी वारंवार चर्चा झाली होती. त्यात त्यांना काही नियम घालून देण्यात आले होते. या सर्व नेत्यांनी एनओसींवर सही केली होती. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

काय घडलं होतं रॅलीत?

काल मंगळवारी शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. शेतकऱ्यांना रॅलीसाठी जो मार्ग आखून दिला होता. त्या मार्गावरून शेतकऱ्यांनी रॅली काढली नाही. शेतकऱ्यांनी वेगळ्याच मार्गाने रॅली काढली होती. शेतकऱ्यांचा एक जत्था गाजीपूर बॉर्डरवरून आयटीओला पोहोचला होता. हा जत्था लाल किल्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता. अक्षरधाम-नोएडा मार्गावर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना आऊटर रिंगरोडवरून जाण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, या मार्गाने न जाता आंदोलकांनी दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि शेतकरी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. याच दरम्यान शेतकऱ्यांमधून पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू झाली. ही दगडफेक सुरू होताच पोलिसांनीही शेतकऱ्यांवर लाठीचार्ज सुरू केला. त्यामुळे शेतकरी अधिकच आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी पोलिसांच्या बॅरिकेट्स तोडल्या. शेतकऱ्यांनी काही वाहनांची तोडफोडही केली. परिणामी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करावा लागला. (Delhi Police FIR names Rakesh Tikait, others for Jan 26 violence)

संबंधित बातम्या:

“हिंसाचारात भाजप सामील असल्याचा अपप्रचार, केंद्राला जबाबदार धरणं चुकीचं”

आशिष शेलार साहेब, खरं सांगा दीप सिद्धू तुमचे कोण?; मिटकरींचा सवाल

दिल्ली हिंसाचारात ज्याचं नाव समोर येतंय तो लक्खा सिधाना कोण आहे?

(Delhi Police FIR names Rakesh Tikait, others for Jan 26 violence)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.