Uddhav Thackeray: लोकशाही मृतावस्थेत, नड्डांना संघराज्य पद्धती संपवायची आहे का?; उद्धव ठाकरेंचा जेपी नड्डा यांना सवाल

नड्डा यांचे हे मत देशांच्या नागरिकांचे मत आहे का, त्यावर निवडणुका व्हायला हव्यात, असे सांगत त्यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. देशात पुढचे काही वर्षात केवळ भाजपाच असेल, सर्व राजकीय पक्ष संपतील, प्रादेशिक पक्षही उरणार नाहीत, असे वक्तव्य जे पी नड्डा यांनी केले होते. त्यावर शिवसेना पक्षप्रमुखांनी पलटवार केला आहे.

Uddhav Thackeray: लोकशाही मृतावस्थेत, नड्डांना संघराज्य पद्धती संपवायची आहे का?; उद्धव ठाकरेंचा जेपी नड्डा यांना सवाल
संघराज्य संपवायचे आहे का- उद्धव ठाकरेImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 13, 2022 | 7:39 PM

मुंबई- आज भाजपा गादीवर बसलीये, म्हणून हम करे सो कायदा चाललं आहे. ही लोकशाही नाही. असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Uddhav Thackeray)यांनी केंद्र सरकारवर (Modi Government) निशाणा साधला आहे. ही आझादी आणि त्याचा अमृत महोत्सव नाही. अमृत महोत्सव अमृतासारखाच हवा. अमृत महोत्सवी वर्षात लोकशाही मृतावस्थेत न्यायची असेल, तर अमृत महोत्सव कसला आला. असा सवाल करत लोकशाही मृतावस्थेत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. प्रादेशिक पक्ष (regional parties)संपवायचे आहेत, म्हणजे भाजपाला देशातील संघराज्य पद्धती संपवायची आहे का, असा तिखट सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना केला आहे. नड्डा यांचे हे मत देशांच्या नागरिकांचे मत आहे का, त्यावर निवडणुका व्हायला हव्यात, असे सांगत त्यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. देशात पुढचे काही वर्षात केवळ भाजपाच असेल, सर्व राजकीय पक्ष संपतील, प्रादेशिक पक्षही उरणार नाहीत, असे वक्तव्य जे पी नड्डा यांनी केले होते. त्यावर शिवसेना पक्षप्रमुखांनी पलटवार केला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

देशातील मांडणी झाली. संघराज्य आहे. त्यात सर्व राज्य आहे.ही घटक राज्य एकत्र येऊन देशाचं स्वातंत्र्य अस्तित्वात आलं आहे. हे सर्व राज्य एकत्रं आल्याने त्याला संघराज्य म्हणतात. मग नड्डांना काय म्हणायचं आहे. प्रादेशिक पक्ष संपवायचे म्हणजे त्यांना संघराज्य संपवायचं आहे का. हे संघराज्य नको हे तुमचं मत देशाच्या नागरिकांचं मत आहे का. त्यावर निवडणुका व्हायला हव्यात. आज तुम्ही गादीवर बसलात म्हणून हम करे सो कायदा चाललं आहे. ही लोकशाही नाही. ही आझादी आणि त्याचा अमृत महोत्सव नाही. अमृत महोत्सव अमृता सारखाच हवा. अमृत महोत्सवी वर्षात लोकशाही मृतावस्थेत न्यायची असेल तर अमृत महोत्सव कसला आला.

कुणीही शिवसेना नष्ट करु शकणार नाही – उद्धव ठाकरे

लोकशाही म्हटल्यावर निवडणुका आल्या, राजकीय पक्ष आले. आलेच पाहिजे. प्रत्येकाचं मत समान नसेलच. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याची मुभा मांडण्याची परवानगी असलीच पाहिजे. त्यालाच लोकशाही म्हणतात. भाजपचे अध्यक्ष नड्डा यांनी एक वक्तव्य केलं आहे. ते लोकशाहीला घातक आहे की नाही. त्याचा विचार करण्याची गरज आहे. मी पक्षाचा प्रमुख आहे. कालपर्यंत मुख्यमंत्री आहे. उद्या पुन्हा शिवसेनेची सत्ता येणारच आहे. हे येणं जाणं सुरूच असतं. पण नड्डा जे बोलले या देशात एकच पक्ष राहणार आहे. बाकीचे पक्ष संपत चालले आहेत. विशेषता शिवसेना संपत चालली आहे. बघू. त्यांनी प्रदेशाध्यक्ष केलं. त्यांच्या नावात किती कुळे आहेत माहीत नाही. पण त्यांची किती जरी कुळं उतरली तरी ते शिवसेना नष्ट करू शकत नाही. मग ते ५२ असतील किंवा १५२ असतील. मला काही फरक नाही पडत. लोकशाहीला घातक प्रादेशिक पक्ष संपवून टाकायचं.

हे सुद्धा वाचा

राज्या- राज्यातील सरकारे पाडण्यासाठी पैसे कसे?

डीपीवर तिरंगा टाकायचाच. आपल्याकडे सोशल मीडिया जोरात आहे. सोशल मीडिया जोरात आहे. पण जे चाललंय ते सोसल का. स्वातंत्र्यासाठी जीवाची बाजू करण्यासाठी सीमेवर जे उभे आहेत. तिथे लष्करात कपात करणार आहात. शस्त्र घेण्यासाठी माणसं कमी करणार असाल तर शस्त्र कुणाच्या हातात देणार. चीन रशिया अमेरिकेने तरी आधुनिकीकरणासाठी लष्कर कपात केल्याचं माझ्या वाचनात नाही. लष्कर चालवण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत. पण राज्या राज्यातील सरकारे पाडण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत हे कोणतं स्वातंत्र्य आहे. ज्यांच्यामुळे तिरंग्याचं रक्षण होतं. ज्यांच्यामुळे घरावर डीपीवर तिरंगा लावू शकतो, त्या लष्कराची कपात करत असाल तर त्याला काय अर्थ आहे. घरात बसून बेंबीच्या देठापासून भारत माता की जय म्हटल्याने शत्रू पळणार नाही. उद्या माझ्या घरावर तिरंगा लावलेला बघून चीन काय पळून जाणार आहे का. घराघरावर तिरंगा का लावला पाहिजे तर देशाचं रक्षण करणाऱ्यांना मी एकटाच नाही. माझ्यासोबत देशही आहे हे दिसलं पाहिजे.

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.