73 वर्ष जुन्या कारसाठी तुटले शाही परिवारातील लग्न, प्रकरण पोहचले सर्वोच्च न्यायालयात

मुलाच्या परिवाराने मुलीच्या परिवारावर लग्नात रक्कमेत हेराफेरी केल्याचा दावा केला आहे. त्यासंदर्भात पोलिसात तक्रारही दिली आहे. त्यानंतर मुलीच्या परिवाराने मुलावर हुंडा मागितल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. या प्रकरणात घटस्फोटाचा दावा ऋषिकेश आणि ग्वालियरमध्ये दाखल करण्यात आला होता.

73 वर्ष जुन्या कारसाठी तुटले शाही परिवारातील लग्न, प्रकरण पोहचले सर्वोच्च न्यायालयात
Follow us
| Updated on: Nov 14, 2024 | 1:03 PM

सर्वोच्च न्यायालयात एका वेगळ्या प्रकरणाची सुनावणी झाली. हे प्रकरण 1951 खास रोल्स-रॉयस कारचे आहे. ही कार वडोदराच्या महाराणीसाठी एचजे मुलिनर एंड कंपनीने बनवले होते. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी महाराणीसाठी या कारची ऑर्डर दिली होती. आता या कारमुळे ग्वालियरमधील शाही परिवारावारातील मुलीचे लग्न तुटले आहे. तसेच हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंतही पोहचले आहे.

काय आहे प्रकरण

मुलीचे परिवार स्वत:ला छत्रपती शिवाजी महाराज यांचे एडमिरल आणि कोकणातील शासक असल्याचा दावा करतात. दुसरीकडे मुलीचे वडील आर्मीमध्ये कर्नल होते. त्यांचा परिवार इंदूरमध्ये एक शैक्षणिक संस्था चालवतो. दोन्ही परिवारात मार्च 2018 मध्ये ग्वालियर येथे साखरपुडा झाला होता. त्यानंतर ऋषिकेशमध्ये लग्न झाल्याचा दावा केला जातो. त्यानंतर एका कारमुळे दोन्ही परिवारात वाद झाला. त्या वादामुळे मुलगी कधी सासरी आली नाही.

मुलाच्या परिवाराने मुलीच्या परिवारावर लग्नात रक्कमेत हेराफेरी केल्याचा दावा केला आहे. त्यासंदर्भात पोलिसात तक्रारही दिली आहे. त्यानंतर मुलीच्या परिवाराने मुलावर हुंडा मागितल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. या प्रकरणात घटस्फोटाचा दावा ऋषिकेश आणि ग्वालियरमध्ये दाखल करण्यात आला होता. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले. त्यावेळी मुलीच्या परिवाराने म्हटले की, मुलाच्या परिवाराने आमच्याकडे असलेली रोल्स-रॉयस कार आणि मुंबईत एक फ्लॅट हुंडा म्हणून मागितला.

हे सुद्धा वाचा

सर्वोच्च न्यायालयाने नेमला मधस्थ

सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुइया यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी आले. त्यावेळी वरिष्ठ वकील विभा दत्ता मखीजा यांनी सांगितले की, महिला कठीण परिस्थितीत अडकली आहे. त्यांच्या शाही परिवारात पुन्हा लग्न करण्याची परंपरा नाही. युक्तीवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकणात न्या. आर बसंत यांना मध्यस्थ म्हणून नियुक्त केले आहे. त्यावेळी न्यायालयाने म्हटले, यापूर्वी दोन्ही पक्षात मध्यस्था होऊ शकली नाही. त्यानंतर आता पुन्हा एक प्रयत्न केले जात आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.