देशातील पाचव्या सर्वात श्रीमंत महिलेबद्दल तुम्हाला माहितीये, 28 हजार कोटींची आहे संपत्ती

Success Story in marathi : वाचनाची आणि लेखनाची खूप आवड. मात्र सोशल मीडिया आणि पार्ट्यांपासून दूर. म्हणूनच बहुतेक लोकांना त्यांच्याबद्दल माहिती नसते. विशेष बाब म्हणजे श्रीमंत महिला असण्यासोबतच देशासाठी ते मोठं दान ही करतात. कोण आहेत त्या जाणून घ्या.

देशातील पाचव्या सर्वात श्रीमंत महिलेबद्दल तुम्हाला माहितीये, 28 हजार कोटींची आहे संपत्ती
Follow us
| Updated on: Sep 28, 2023 | 1:37 PM

Success Story : महिला वर्ग आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती करत आहेत. क्रीडा क्षेत्र असो की विज्ञान प्रत्येक क्षेत्रात महिलांचे वर्चस्व प्रस्थापित होत आहे. मग व्यवसायात तरी महिला कशा मागे राहतील. आज देशातील अनेक महिलांनी व्यवसायाच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची संपत्ती कमवली आहे. आपण आता एका अशाच यशस्वी महिलेबद्दल बोलणार आहोत ज्यांनी आपल्या मेहनतीने हजारो कोटी रुपयांचे साम्राज्य उभे केले आहे. त्यांच्या कंपनीत शेकडो लोकं काम करत आहेत.

ज्या अब्जाधीश महिलेबद्दल आपण बोलणार आहोत तिचे नाव आहे लीना तिवारी. आज लीना तिवारी यांची गणना देशातील पाचव्या क्रमांकाची श्रीमंत महिला म्हणून केली जाते. फार कमी लोकांना त्यांच्याबद्दल माहिती आहे. कारण लीना नेहमीच मीडियापासून दूर राहतात. सध्या लीना तिवारी यूएसव्ही इंडिया या फार्मा कंपनीच्या अध्यक्षा आहेत.

श्रीमंतांच्या यादीत 51 व्या स्थानावर आहे

फोर्ब्सने यावर्षी एप्रिल महिन्यात भारतातील श्रीमंत महिलांची यादी जाहीर केली होती. या यादीत फोर्ब्सने लीना तिवारी यांना पाचव्या स्थानावर ठेवले आहे. यूएसव्ही इंडिया या फार्मा कंपनीचा पाया त्यांचे दिवंगत वडील विठ्ठल तिवारी यांनी 1961 साली घातला होता. या कामात रेव्हलॉनने वडिलांना साथ दिली होती. सध्या लीना तिवारी 65 वर्षांच्या आहेत. फोर्ब्सने 2022 मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत लीना तिवारी यांना 51 व्या स्थानावर ठेवले होते.

एकूण संपत्ती 28,000 कोटींहून अधिक

लीना तिवारी यांची कंपनी USV फार्मा इंजेक्टेबल्स, फार्मास्युटिकल घटक आणि बायोसिमिलर औषधे बनवते. ही कंपनी मधुमेहावरील औषधे बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. या कंपनीचे नाव मधुमेहावरील औषधे बनवणाऱ्या देशातील पहिल्या तीन कंपन्यांमध्ये घेतले जाते. लीना तिवारी यांची सध्या अंदाजे नेटवर्थ $3.5 बिलियन म्हणजेच 28,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

प्रशांत तिवारी सध्या USV चे व्यवस्थापकीय संचालक

2021 मध्ये लीना तिवारी यांनी आरोग्य सेवा क्षेत्रासाठी 24 कोटी रुपयांची देणगी दिली होती. याशिवाय इतर क्षेत्रातही त्या वेळोवेळी करोडो रुपयांची देणगी देतात. लीना तिवारी यांच्या पतीचे नाव प्रशांत तिवारी आहे. प्रशांत तिवारी सध्या USV चे व्यवस्थापकीय संचालक आहेत. विशेष म्हणजे प्रशांत तिवारी हे देखील आयआयटीयन आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. दोघांनाही एक मुलगी असून तिचे नाव अनिशा गांधी तिवारी आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.