Arvind Kejriwal: भाजपा सोडू नका, पैसे पक्षाचे घ्या, पण… अरविंद केजरीवालांचा गुजरात भाजपा कार्यकर्त्यांना अजब सल्ला

केजरीवाल यावेळी म्हणाले की भाजपा आपल्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या परिवारांना मोफत शिक्षण, आरोग्यसेवा किंवा मोफत वीज देऊ शकत नाहीये. ते पुढे म्हणाले की - भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षातच राहिले तरी हरकत नाही, मात्र त्यांनी आम आदमी पार्टीचे काम करावे.

Arvind Kejriwal: भाजपा सोडू नका, पैसे पक्षाचे घ्या, पण... अरविंद केजरीवालांचा गुजरात भाजपा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
केजरीवाल यांचा अजब सल्ला Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 9:05 PM

राजकोट- गुजरातमधील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी (BJP Workers)पक्षात राहूनच बंडखोरी करावी, असे वक्तव्य केले आहे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे (AAP)राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejrival)यांनी. भआजपा कार्यकर्त्यांनी त्यांचा पक्ष सोडू नये, पार्टीत राहूनच आपसाठी काम करा, असा अजब सल्ला केजरीवाल यांनी भआजपा कार्यकर्त्यांना दिला आहे. गुजरातमधील भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हा मोलाचा मंत्र कार्यकर्त्यांना दिला. भाजपात राहिल्यास पार्टीच्या पैशांचा उपयोग या कार्यकर्त्यांना करता येईल, मात्र त्यांनी ते पैसे घ्यावेत पण काम मात्र आपचे करावे, अशी अपेक्षा अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे.

;

राजकोटमध्ये अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी स्पष्ट केले आहे की – भाजपाच्या नेत्यांना आमच्या पेक्षात घेण्याची आमची अजिबात इच्छा नाही. भाजपाने त्यांच्या नेत्यांसोबतच निवडणुका लढवाव्यात, असेही केजरीवाल म्हणाले आहेत. भाजपाचे बूथ, गाव, तालुका स्तरावरचे कार्यकर्ते आमच्या अभियानात सामील होत आहेत. मी भाजपा कार्यकर्त्यांना विचारु इच्छितो की, ते इतके वर्षे भाजपासाठी काम करीत आहेत, त्याबदल्यात त्यांना काय मिळाले आहे, असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना केला आहे.

भाजपाचा पैसा घ्या, पण काम आपसाठी करा, केजरीवाल यांचा सल्ला

केजरीवाल यावेळी म्हणाले की भाजपा आपल्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या परिवारांना मोफत शिक्षण, आरोग्यसेवा किंवा मोफत वीज देऊ शकत नाहीये. ते पुढे म्हणाले की – भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षातच राहिले तरी हरकत नाही, मात्र त्यांनी आम आदमी पार्टीचे काम करावे. यापैकी अनेकांना भाजपाकडून पैसे मिळतात. ते पैसे त्यांनी घ्यावेत, मात्र त्यांनी काम आमचे करावे, असे केजरीवाल म्हणाले आहेत. आपल्याकडे कार्यकर्त्यांना देण्यासाठी पैसे नसल्याचेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.

मोफत वीज, मोफत शिक्षणाचे आश्वासन

अरविंद केजरीवाल गुजरात दौऱ्यात म्हणाले की- जेव्हा आम्ही राज्यात सरकार स्थापन करु त्यावेळी आम्ही मोफत वीज देऊ. त्यामुळे २४ तास तुम्हाला मोफत वीज मिळेल. मुलांसाठी चांगले शिक्षण आणि मोफत शिक्षणाची व्यवस्था असेल. तुमच्या परिवारातील सगळ्यांना चांगल्या आरोग्यसुविधा त्याही मोफत पुरवू. महिलांना १ हजार रुपयांचा भत्ता देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. भाजपा कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केले आहे की, २७ वर्षे भाजपात राहणे आणि भाजपाला पुन्हा विजयी करण्यात काही अर्थ नाही. भाजपा कार्यकर्त्यांनी पक्षात राहून आपसाठी काम करावे. आप हा स्मार्ट पक्ष आहे. आपसाठी आतून काम करा, असे केजरीवाल म्हणाले आहेत.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.