Drugs seized: गुजरातमध्ये 1000 कोटींचे ड्रग्ज जप्त, 200 किलो एमडी ड्रग्ज मिळाले, बडोद्याच्या केमिकल फॅक्टरीतून जप्त, मुंबई गोव्यापर्यंत होता पुरवठा

या ठिकाणी पकडण्यात आलेले ड्रग्ज हे मुंबई आणि गोव्यात पाठवण्यात येत होते. देशातील इतरही भागात हे ड्रग्ज पाठवण्यात येत होते, असा संशय एटीएसला आहे. हे रॅकेट किती मोठे आहे आणि त्यात कुणाकुणाचा सहभाग आहे, याची माहिती आता घेण्यात येते आहे.

Drugs seized: गुजरातमध्ये 1000 कोटींचे ड्रग्ज जप्त, 200 किलो एमडी ड्रग्ज मिळाले, बडोद्याच्या केमिकल फॅक्टरीतून जप्त, मुंबई गोव्यापर्यंत होता पुरवठा
बडोदा ड्रग्ज फॅक्टरीत छापाImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 6:17 PM

बडोदा- समुद्रातून येणारे ड्रग्ज गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणात गुजरातमध्ये सापडलेले आहे. मात्र आता बडोद्यात (Baroda )बंधित एमडी ड्रग्ज तयार करणारी कंपनीच समोर आली आहे. बडोदा जिल्ह्यातील मोक्षी गावातील एका फॅक्टरीत 200 किलो ड्रग्ज (200kg drugs)जप्त करण्यात आले आहे. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 1 हजार कोटींच्या (worth 1000 crores)घरात आहे. एटीएसचे पोलीस महासंचालक दीपेन भद्रन यांनी सांगितले की – बडोद्याच्या सावली परिसरात ड्रग्जचा मोठा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर एटीएसने सोमवारी मोक्षी गावात या फॅक्टरीवर छापा घातला. त्या ठिकाणी मोठ्या ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी केमिकल बनवण्याच्या नावाखाली ड्रग्ज तयार करण्यात येत असल्याची माहितीही समोर आली आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत राही जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या तपासानंतरच संपूर्ण प्रकरण उघड होऊ शकणार आहे.

मुंबई आणि गोव्यात होत होते ड्रग्ज सप्लाय

या ठिकाणी पकडण्यात आलेले ड्रग्ज हे मुंबई आणि गोव्यात पाठवण्यात येत होते. देशातील इतरही भागात हे ड्रग्ज पाठवण्यात येत होते, असा संशय एटीएसला आहे. हे रॅकेट किती मोठे आहे आणि त्यात कुणाकुणाचा सहभाग आहे, याची माहिती आता घेण्यात येते आहे.

जप्त करण्यात आलेले ड्रग्ज सहा महिने आधी तयार करण्यात आले होते

दीपेन भद्रन यांनी पुढे सांगितले की जप्त करण्यात आलेले ड्रग्ज हे सहा महिन्यांपूर्वी तयार करण्यात आले होते. हा छापा घालण्यापूर्वी या फॅक्टरीतून मोठ्य़ा प्रमाणात ड्रग्ज तयार झाले असावे आणि त्याचा पुरवठा देशभरात करण्यात आला असावा, असा संशयही व्यक्त करण्यात येतो आहे.

हे सुद्धा वाचा

काय असते मेफेड्रोन पार्टीतील ड्रग्ज

हे ड्रग्ज मिथाइलीनन डायऑक्सी, मथैमफेटामाईन आणि मेफेड्रोन अशा वेगवेगळ्य नावांनी ओळखले जाते. प्रत्येक देशात याची वेगवेगळी कोड नावे आहेत. हे ड्रग्ज श्वासातून किंवा पाण्यातून घेतले जाते. नशेच्या बाजारात याच्या एक ग्रॅमची किंमत 25 हजार रुपये इतकी आहे. नशा करणाऱ्यांत या ड्रग्जची वेगवेगळी नावेही आहेत. हे ड्रग्ज घेतल्यानंतर मेंदूत नशा चढते, धुंदी येते. मोठ्या प्रमाणात आणि स्तात्याने हे घेतल्याने जीवाला धोका होण्याचीही शक्यता असते.

म्याऊ म्याऊ ड्रग्ज म्हणूनही परिचित

मेफेड्रोनला साधारणपणे म्याऊ म्याऊ ड्रग्ज नावाने ओळखले जाते. रेव्ह पार्ट्यांत या ड्रग्जचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. हे ड्रग्ज अफगाणिस्थान आमि नायजेरियात जास्त प्रमाणात तयार करण्यात येते. पार्टी ड्रग्ज म्हणून याचा वापर देशातही करण्यात येतो. रेव्ह पार्टीत यापूर्वी एलएसडी, लिसर्जिक एसिड डायइथाइम अमाइडचा वार करण्यात येत होता. मात्र त्यानंतर याबाबत कठोर कायदे आल्यानंतर मेफेड्रोनचा वापर जास्त प्रमाणात होऊ लागला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.