डेअरी मालकाने दिली म्हशीची ऑनलाईन ऑर्डर, पुढे काय घडले…

ऑनलाइनचा हा फंडा उत्तर प्रदेशातील एका डेअरी व्यापाऱ्याने वापरला. त्यांनी ऑनलाईन पद्धतीने चक्क म्हैस बुक केली. सुनील कुमार यांनी यासाठी म्हैस विकणाऱ्या व्यापाऱ्यास दहा हजार रुपये पाठवले. पुढे ती म्हैस आली नाही.

डेअरी मालकाने दिली म्हशीची ऑनलाईन ऑर्डर, पुढे काय घडले...
Follow us
| Updated on: Feb 02, 2024 | 3:32 PM

नवी दिल्ली, दि.2 फेब्रुवारी 2024 | सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. आपण कोणतीही गोष्टी घरी बसल्या बसल्या मागवू लागलो आहे. घरातील किराणा असो की भाजीपाला ऑनलाईन बुक करायचा काही तासांत डिलेव्हरी घरी मिळते. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या वेबसाईट सर्वच वस्तू मिळतात. कधी वस्तू वेळेत मिळाली नाही तर कस्टमर हेल्पलाइनवरुन मदत मिळते. मग ऑनलाइनचा हा फंडा उत्तर प्रदेशातील एका डेअरी व्यापाऱ्याने वापरला. त्यांनी ऑनलाईन पद्धतीने चक्क म्हैस बुक केली. त्यानंतर मात्र त्याची अडचण झाली. अखेर प्रकरण पोलिसांपर्यंत गेले.

काय घडला प्रकार

उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे डेअरी चालवणारे सुनील कुमार यांनी यूट्यूबवर एका म्हशीचा व्हिडिओ पहिला. त्यांना ती म्हैस आवडली. युट्यूबर दिलेल्या व्हिडिओत फोन नंबर दिला होता. म्हैस विकणार जयपूर येथील व्यापारी शुभम होता. त्यांनी म्हैस खूप चांगल्या जातीची आहे. रोज 18 लीटर दूध देते, असे सांगितले.

आणखी एक व्हिडिओ…

शुभम यांनी त्या म्हैसीचा आणखी एक व्हिडिओ पाठवला. त्यानंतर सुनील कुमार यांनी म्हैस खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. शुभम यांनी किंमत विचारली. त्यांनी 55 हजार रुपये किंमत सांगितली. जर म्हैस खरेदी करायचे असेल तर आधी 10 हजार रुपये माझ्या खात्यात पाठवा. त्यानंतर म्हैस तुमच्या घरी येईल. म्हैस घरी आल्यावर उर्वरित पैसे ट्रक ड्रायव्हरला द्या, असे सांगितले.

हे सुद्धा वाचा

पैसे गेले पण…

सुनील कुमार यांनी त्यांना दहा हजार रुपये पाठवले. परंतु म्हैस घरी आली नाही. त्यांनी शुभम याला फोन केला. त्यानंतर अजून 25 हजार रुपये पाठवण्याचे सांगितले. त्यानंतर सुनील कुमार यांना शंका आली. त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. आता या प्रकरणात पोलीस चौकशी करत आहे. सुनील कुमार यांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहे. पोलिसांनी ऑनलाईन खरेदी करताना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.