AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alert! ताशी 24046 किमी वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतोय लघुग्रह, विमानाइतका आहे आकार

अतिशय वेगाने एक लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येत आहे. यासंबंधीची महत्त्वाची माहिती अमेरिकेची अंतराळ संस्था NASA ने दिली आहे.

Alert! ताशी 24046 किमी वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतोय लघुग्रह, विमानाइतका आहे आकार
| Edited By: | Updated on: Oct 06, 2020 | 8:31 AM
Share

वॉशिंग्टन : संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या महामारीचा सामना करत असताना आता पृथ्वीवर आणखी एक संकट येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अतिशय वेगाने एक लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येत आहे. यासंबंधीची महत्त्वाचा अलर्ट अमेरिकेची अंतराळ संस्था NASA ने दिला आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार, 2020 RK2 असं या लघुग्रहाचं नाव आहे. ऑक्टोबरमध्ये ग्रह पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करेल किंवा तो पृथ्वीशेजारून जाण्याची शक्यता आहे. (earth NASA says asteroid 2020 rk2 is heading towards earth viral news)

नासानं म्हटलं आहे की, हा लघुग्रह पृथ्वीचं नुकसान करणार नाही. पण तरीदेखील सर्व वैज्ञानिक त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. हा लघुग्रह वैज्ञानिकांनी प्रथम सप्टेंबरमध्ये पाहिला होता. तेव्हापासून या ग्रहाचा अभ्यास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

NASA च्या मते, लघुग्रह 2020 RK2 हा ताशी 24046 किलोमीटर वेगाने पृथ्वीकडे येत आहे. या लघुग्रहाचा व्यास 36 ते 81 मीटर आहे तर रुंदी 118 ते 265 फूट असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हा लघुग्रह बोईंग 737 प्रवासी विमानापेक्षा मोठा असून तो पृथ्वीवरून दिसणार नाही असा अहवाल नासाने दिला आहे. ईस्टर्न झोन टाईमनुसार, हा लघुग्रह दुपारी 1.12 वाजता आणि अमेरिकेच्या वेळेनुसार संध्याकाळी 6.12 वाजता पृथ्वीच्या अगदी जवळ येईल. हा लघुग्रह पृथ्वीपासून 2,378,482 मैलांचा प्रवास करेल असा अंदाज नासाने मांडला आहे.

2025 पर्यंत नाही कोणताही धोका 2020-2025 दरम्यान, 2018 VP1 नावाचा लघुग्रह (Asteroid) पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आहे. परंतु तो केवळ 7 फूट रुंद आहे. 2023-2064 वर्षांच्या दरम्यान मोठा 177 फूट लघुग्रह ED224 पृथ्वीवर आदळेल. महत्त्वाचं म्हणजे नासाची सेंट्री सिस्टम आधीच या सगळ्या ग्रहांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे. तर नासाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 100 वर्षांत अशी 22 लघुग्रह पृथ्वीला धडकण्याची चिन्ह आहेत.

या लिस्टमध्ये सगळ्यात पहिला आणि आकाराने मोठा असा लघुग्रह 29075 (1950 DA) आहे, जो 2880 पर्यंत पृथ्वीवर येणार नाही. याचा आकार अमेरिकच्या एम्पायर स्टेट बिल्डिंगपेक्षाही तीन पटीने जास्त आहे. पण एकेकाळी हा पृथ्वीवर धडकणार असल्याचं बोललं जात होतं.

इतर बातम्या – 

Corona Update | राज्यात बरे होणाऱ्यांचं प्रमाण 80 टक्क्यांवर, सहा दिवसात 93,426 रुग्णांनी कोरोनाला हरवलं

गृहिणींचे बजेट कोलमडले, ऐन सणासुदीत डाळींचे भाव गगनाला, तूर डाळ 120 रुपये किलो

(earth NASA says asteroid 2020 rk2 is heading towards earth viral news)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.