ईडीचा दणका, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चिदंबरम यांच्या पत्नीसह इतरांची संपत्ती जप्त; इतक्या कोटींच्या मालमत्तेवर टाच
ईडीच्या माहितीनुसार शारदा ग्रुपच्या कंपनीने सुमारे 2459 कोटी रुपये जमवले होते. त्यात सुमारे 1983 कोटी रुपये आतापर्यंत हडप करण्यात आलेले आहेत. या रकमेत व्याज जोडण्यात आलेलं नाही.
नवी दिल्ली: संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना मोठा झटका बसला आहे. ईडीने चिदंबरम यांच्या पत्नीची संपत्ती जप्त केली आहे. शारदा चिट फंड प्रकरणात शुक्रवारी ईडीने ही मोठी कारवाई केली. चिदंबरम यांची पत्नी नलिनी चिदंबरम, माजी आयपीएस अधिकारी, सीपीएणचे माजी आमदार देबेंद्रनाथ बिस्वास आणि आसामचे माजी कॅबिनेट मंत्री अंजन दत्त यांच्या कंपनीची 6 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.
मनी लॉन्ड्रिंग अॅक्टनुसार 3.30 कोटी रुपयांची चल संपत्ती आणि 3 कोटी रुपयांची अचल संपत्ती जप्त करण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे, असं ईडीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. मनी लॉन्ड्रिंगचं हे प्रकरण 2013पर्यंत पश्चिम बंगाल, आसाम आणि ओडिशा येथील शारदा समूहाद्वारे हा कथित घोटाळा करण्यात आला आहे.
लाभार्थी कोण?
या प्रकरणात नलिनी चिदंबरम, देवव्रत सरकार, देवेंद्रनाथ बिस्वास आणि अनुभूति प्रिंटर आणि प्रकाशन हे लाभार्थी होते. माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष दत्ता यांच्याकडे अनुभूती प्रिंटरची मालकी आहे.
600 कोटींची संपत्ती जप्त
ईडीच्या माहितीनुसार शारदा ग्रुपच्या कंपनीने सुमारे 2459 कोटी रुपये जमवले होते. त्यात सुमारे 1983 कोटी रुपये आतापर्यंत हडप करण्यात आलेले आहेत. या रकमेत व्याज जोडण्यात आलेलं नाही. ईडीने या प्रकरणात आतापर्यंत 600 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.
मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय?
बेकायदेशीर मार्गाने कमावलेला पैसा कायदेशीर बनवण्याची प्रक्रिया म्हणजे मनी लॉन्ड्रिंग होय. साध्या सोप्या शब्दात सांगायचं तर ब्लॅक मनी व्हाईट करणं. ज्या पैशाचा काहीचं स्त्रोत नसतो. तो कुठून आला हे सांगता येत नाही. ज्या पैशावर कर भरला जात नाही, असा पैसा ब्लॅकमनी असतो.
पैसा लिगल सोर्सने आल्याचं वाटतं पण वास्तवात तसं नसतं. गुन्हेगारी कारणांसाठी किंवा इतर बेकायदेशीर मार्गाने हा पैसा आलेला नसतो. ती मेहनतीची कमाई नसते. कुणाला तरी फसवून किंवा फ्रॉड करून ती रक्क मिळवलेली असते. असा पैसा आणि त्याचा सोर्स सरकारपासून लपवला जातो. त्याला मनी लॉन्ड्रिंग म्हणतात.