एकनाथ खडसे यांच्या जावयाला जामीन मंजूर, खडसेंची राजकीय घौडदौड थांबवणारं हे प्रकरण त्यांना असं भोवलं

eknath khadse : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीष चौधरी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गिरीष चौधरी हे साधारण दीड वर्षापासून जेलमध्ये होते.

एकनाथ खडसे यांच्या जावयाला जामीन मंजूर, खडसेंची राजकीय घौडदौड थांबवणारं हे प्रकरण त्यांना असं भोवलं
eknath khadse
Follow us
| Updated on: Jul 21, 2023 | 12:43 PM

नवी दिल्ली | २१ जुलै २०२३ : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीष चौधरी यांना जामीन मंजूर झाला आहे. अनेक वेळा गिरीष चौधरी यांचा जामीनासाठी अर्ज फेटाळला जात होता.भोसरी एमआयडीसी प्रकरणी अखेर सुप्रीम कोर्टाने गिरीष चौधरी यांचा जामीन मंजूर केला आहे. एकनाथ खडसे यांच्यासाठी हा एक दिलासा असल्याचं म्हटलं जात आहे. यापूर्वी या प्रकरणात भाजपा-शिवसेना सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना, त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच या प्रकरणी त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांची देखील तपासादरम्यान चौकशी करण्यात आली होती.

३१ कोटीचा भूखंड ३.७ कोटी रुपयांना घेतला कसा?

अखेर एकनाथ खडसे यांचे जावई गिरीष चौधरी यांना सु्प्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गिरीष चौधरी हे साधारण दीड वर्षापासून जेलमध्ये होते, ईडीच्या कारवाईत त्यांना ही जेल झाली होती. पुण्यातील भोसरीमध्ये ३.१ एकर जमीन खरेदीत, एकनाथ खडसे यांनी महसूल मंत्रीपदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यापूर्वी खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर देखील अटकेची टांगती तलवार असल्याचं बोललं जात होतं. २०१६ मधील हे प्रकरण आहे, ३१ कोटी रुपयांचा ३.१ एकर जमीनाचा हा भूखंड एकनाथ खडसे यांचे जावई आणि पत्नी यांनी ३.७ कोटी रुपयांना विकत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

महसूल मंत्री खडसे यांच्याकडे प्रकरण आलं आणि…

हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा आहे. एमआयडीसीसाठी हा भूखंड १९७१ मध्ये अधिग्रहित झाला होता, पण अजूनही अब्बास उकानी यांना भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. कथित आरोपात एकनाथ खडसे मंत्री असताना त्यांनी याच दरम्यान अधिकाऱ्यांची बैठक बोलावली, बैठकीत त्यांनी हा मुद्दा चर्चेला घेतला. ही बैठक १२ एप्रिल २०१६ रोजी झाली, यात अब्बास उकानी या मूळ मालकाला हा ३.१ एकर जमीनाचा भूखंड परत द्यायचा की, त्यांना अधिक भरपाई द्यायची, याविषयी त्वरीत निर्देश देण्याचे आदेश दिले गेले.

हे सुद्धा वाचा

भोसरी भूखंड प्रकरणात गेलं महसूल मंत्रीपद

एकनाथ खडसे यांचं भोसरी भूखंड प्रकरणात महसूल मंत्री पद गेलं,याच दरम्यान भाजप ज्या पक्षात एकनाथ खडसे याच्या दाव्यानुसार त्यांनी ३० ते ३५ वर्ष काढली, पक्षाची सेवा केली, त्यांच्यात आणि पक्षातील नेत्यांमध्ये या प्रकरणावरुनही आरोप प्रत्यारोप झाले, एकंदरीत एकनाथ खडसे यांचा भाजपातला प्रवास रोखण्यात हे भोसरी भूखंड प्रकरण कारणीभूत ठरलं. तसेच त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांची देखील चौकशी झाली, गिरीष चौधरी जे त्यांचे जावई आहेत त्यांना दीड वर्ष जेल झाली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.