Sanjay Raut: 10 लाख रुपयांच्या बंडलावर लिहिले आहे ‘एकनाथ शिंदे अयोध्या’, संजय राऊत यांच्या घरात सापडलेल्या कॅशचा हिशोब
आता या प्रकरणात जी माहिती मिळते आहे त्यावरुन, दहा लाखांच्या बंडलावर 'एकनाथ शिंदे अयोध्या' असे लिहिलेले आहे. अशी माहिती मिळते आहे. हे पैसे पक्षाच्या कामासाठी खर्च करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते आहे. उरलेले दीड लाख रुपये हे घरातील खर्चासाठी ठेवण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर हे पैसे ईडीने जप्त केले आहेत.
मुंबई- मुंबईतील १ हजार ३४ कोटींच्या पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांना आज ईडीने ताब्यात घेतले आहे. सकाळी सात वाजता ईडीची टीम राऊत यांच्या घरी पोहचली आणि त्यानंतर साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना त्यांच्या भांडुपमधील मैत्री या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंचर ईडीने (ED)त्यांना मुंबईच्या फोर्ट परिसरातील ईडीच्या कार्यालयात आणले. ईडीच्या कार्यालयात त्यांची चौकशी करण्यात आली. या छापेमारीच्या काळात संजय राऊत यांच्या घरातून 11 लाख 50 हजार रुपयांची रोख (cash)रक्कम जप्त करण्यात आली आहे. काही कागदपत्रेही ईडीने या कारवाईत जप्त केल्याची माहिती आहे. ही रोख रक्कम जप्त केल्यानंतर संजय राऊत यांना ही कॅश कुठून आली, याची विचारणा करण्यात आली. त्याच्यावर संजय राऊत समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत, अशी माहिती आहे.
दहा लाखांच्या बंडलावर लिहिले आहे ‘एकनाथ शिंदे अयोध्या’
आता या प्रकरणात जी माहिती मिळते आहे त्यावरुन, दहा लाखांच्या बंडलावर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असे लिहिलेले आहे. अशी माहिती मिळते आहे. हे पैसे पक्षाच्या कामासाठी खर्च करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते आहे. उरलेले दीड लाख रुपये हे घरातील खर्चासाठी ठेवण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर हे पैसे ईडीने जप्त केले आहेत. संजय राऊत यांना ताब्यात घेऊन त्यांना ईडी कार्यालयात आणल्यानंतर त्यांनीच स्वताच्या अटकेचे संकेत दिले होते. रात्री उशिरा संजय राऊत यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे. ईडी कार्यालयाच्या आवारात आल्यानंतर, ‘ते मला अटक करणार आहेत आणि मी अटक करवून घेणार आहे’, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते.
गैरव्यवहाराचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत, राऊत कुटुंबीयांचा दावा
ताब्यात घेतल्यानंतर जेव्हा संजय राऊत ईडी कार्यालयात पोहचले, तेव्हा त्यांनी दावा केला की आपल्याला खोट्या प्रकरणात अडकवण्यात येते आहे. शिवसेना संपवण्यासाठी हे सगळे करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्र आणि शिवसेना कमकुवत करण्यासाठी हे सगळे सुरु असल्याची टीकाही त्यांनी केली होती. कोणत्याही नोटिशीविना ईडी आपल्याघरी दाखल झाली, मात्र त्यांना काहीही मिळालेले नाही, असेही राऊत म्हणाले होते. संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनीही पत्रा चाळीशी संबंधित एकही कागदपत्र ईडीला मिळाले नसल्याचा दावा राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर केला होता. मात्र आता जी माहिती समोरे येते आहे त्यानुसार, ईडीने ११ लाख ५० हजार रुपयांची कॅश आणि काही मालमत्तेची कागदपत्रे सोबत आणली असल्याची माहिती आहे.
राऊत यांचा मोबाईल ईडीने घेतला ताब्यात
संजय राऊत यांचा मोबाईलही ईडीने ताब्यात घेतला असल्याची माहिती आहे. ईडीने ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत यांनी tv9 मराठीवर फोनद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली होती. शिवसेनेसाठी बलिदान करण्याची तयारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले होते. मात्र आता ईडी कार्यालयात गेल्यानंतर त्यांचा फोन जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. आता यापुढे ते कुणाशी संपर्क करु शकणार नाहीत, हाच याचा अर्थ आहे.