पाच राज्यांत आजपासून प्रचाराचं ‘तांडव’; पश्चिम बंगाल, आसाममध्ये 27 मार्चला, तर केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरीत 6 एप्रिल रोजी मतदान, 2 मे रोजी निकाल!

(Election Commission announces poll schedule of 5 states)

पाच राज्यांत आजपासून प्रचाराचं 'तांडव'; पश्चिम बंगाल, आसाममध्ये 27 मार्चला, तर केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरीत 6 एप्रिल रोजी मतदान, 2 मे रोजी निकाल!
सुनील अरोरा, मुख्य निवडणूक आयुक्त
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 4:57 PM

नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयोगाने अखेर पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम या चार राज्यांसह पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये 27 मार्चमध्ये मतदान होणार आहे. तर केरळ, आसाम, आणि पुद्दुचेरीत 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आसाममध्ये 3 तर पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यात निवडणुका होणार आहेत. केरळ, पुद्दुचेरी आणि तामिळनाडूत प्रत्येकी एका टप्प्यात मतदान होणार असून या पाचही राज्यात 2 मे रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे, अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी केली. (Election Commission announces poll schedule of 5 states)

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषद घेऊन आज पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. बिहार विधानसभा निवडणुकीनंतर पाच राज्यातील निवडणुका या अत्यंत आव्हानात्मक आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका होत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या काळात आपल्याला नव्या गोष्टींचा अवलंब करावा लागणार आहे. या निवडणुकीत निवडणूक अधिकारी-कर्मचारीही कोरोना योद्धा सारखे काम करणार आहेत, असं सुनील अरोरा यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी बिहारमध्ये निवडणुका यशस्वी पार पडल्याचंही स्पष्ट केलं.

आसाममध्ये तीन टप्प्यात निवडणुका

आसाममध्ये तीन टप्प्यात निडणुका होतील. पहिल्या टप्प्यात 27 मार्च रोजी मतदान होणार आहे. दुसऱ्याच टप्प्याचं मतदान 1 एप्रिल रोजी होणार आहे. तिसऱ्या टप्प्याचं मतदान 6 एप्रिल रोजी होणार आहे आणि  2 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

केरळमध्ये एका टप्प्यात मतदान

केरळमध्ये एका टप्प्यात मतदान होणार आहे. केरळात 6 एप्रिल रोजी मतदान होणार असून 2 मे रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे.

तामिळनाडूत एकाच टप्प्यात मतदान

तामिळनाडूत एक टप्प्यात मतदान होणार आहे. तामिळनाडूत 6 एप्रिल रोजी मतदान होणार असून 2 मे रोजी निकाल लागणार आहेत.

पुद्दुचेरीत 6 एप्रिलला मतदान

पुद्दुचेरीमध्येही एका टप्प्यात मतदान होणार आहे. पुद्दुचेरीत 6 एप्रिल रोजी मतदान होणार असून 2 मे रोजी निकाल लागणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यात मतदान

पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यात मतदान होणार आहे.

पहिला टप्पा – 27 मार्च, 30 जागा दुसरा टप्पा – 1 एप्रिल, 20 जागा तीसरा टप्पा – 6 एप्रिल, 31 जागा चौथा टप्पा – 10 एप्रिल, 44 जागा पाचवा टप्पा – 17 एप्रिल, 45 जागा सहावा टप्पा – 22 एप्रिल, 43 जागा सातवा टप्पा – 26 एप्रिल, 36 जागा आठवा टप्पा – 29 एप्रिल, 25 जागा मतमोजणी आणि निकाल – 2 मे रोजी

पश्चिम बंगालमध्ये एक लाखाहून अधिक मतदान केंद्रे

824 विधानसभा मतदारसंघात 18.6 कोटी मतदार मतदान करणार आहेत. पाचही राज्यात एकूण 2.7 लाख मतदान केंद्रांवर मतदान होईल. त्यातील पश्चिम बंगालमधील एक लाखाहून अधिक मतदान केंद्रांवर मतदान होईल, असं अरोरा यांनी सांगितलं. आसाममध्ये ३ हजार मतदान केंद्र असतील. तसेच सर्व मतदान केंद्रे ग्राऊंड फ्लोअरवर असतील असंही त्यांनी जाहीर केलं. सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मतदानाची वेळ एका तासाने वाढवली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आल्याने मतदानाची वेळ एका तासाने वाढवण्यात आली आहे, त्यांनी सांगितलं. नामांकन अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन भरण्याची सुविधा देण्यात येणार असून ऑनलाईनवरच निवडणुकीचं डिपॉझिट भरता येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

सीआरपीएफचा वॉच

पाचही राज्यांतील विधानसभा निवडणुकी दरम्यान मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पाचही राज्यात सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच राज्य राखीव दलाचे जवानही निवडणूक काळात तैनात असतील असं त्यांनी स्पष्ट केलं. (Election Commission announces poll schedule of 5 states)

उत्सव आणि परीक्षेच्या दिवशी निवडणूक होणार नाही

यावेळी निवडणूक आयोगाने सण-उत्सवाच्या दिवशी आणि परीक्षांच्या दिवशी मतदान होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

पाच लोकांनाच घरोघरी जाऊन प्रचार करण्यास मुभा

या पाचही राज्यांच्या निवडणुकीत उमेदवारांना किंवा त्यांच्या समर्थकांना घरोघरी प्रचार करण्यासाठी मोठा ताफा घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. प्रत्येक उमदेवाराला केवळ पाच लोकांना घेऊनच घरोघरी प्रचार करता येणार आहे, असं अरोरा यांनी सांगितलं. (Election Commission announces poll schedule of 5 states)

कुठे किती पोलिंग स्टेशन

>> आसाममध्ये 33530 पोलिंग स्टेशन >> तामिळनाडूत 88936 पोलिंग स्टेशन >> पश्चिम बंगालमध्ये 101916 पोलिंग स्टेशन >> केरळमध्ये 40771 स्टेशन >> पुद्दुचेरीत 1559 स्टेशन (Election Commission announces poll schedule of 5 states)

संबंधित बातम्या:

Assembly Election 2021 Date EC LIVE : 5 राज्यात विधानसभेच्या 824 जागांवर मतदान

पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकांचा बिगूल आज वाजणार; निवडणूक तारखांची घोषणा होण्याची शक्यता

रात्री मुंबईत, आज केरळमध्ये; मोठ्या प्रमाणात रेल्वे स्टेशनवर स्फोटकं जप्त

(Election Commission announces poll schedule of 5 states)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.