AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Election : आता दिल्ली-मुंबईत बसून यूपी-बिहारच्या उमेदवारांना मतदान करा?, कसं शक्य?; नवीन व्होटिंग मशीनचे नाव काय?

आता तुम्ही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहा. तुम्हाला मतदानाच्या काळात तुमच्या राज्यात, गावात, शहरात जाण्याची गरज नाही. तुम्ही जिथे आहात तिथूनच तुमच्या गावातील उमेदवाराला मतदान करून निवडून देऊ शकता. त्यासाठी निवडणूक आयोगाने...

Election : आता दिल्ली-मुंबईत बसून यूपी-बिहारच्या उमेदवारांना मतदान करा?, कसं शक्य?; नवीन व्होटिंग मशीनचे नाव काय?
evm voting machineImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 16, 2023 | 9:25 AM
Share

नवी दिल्ली | 16 ऑक्टोबर 2023 : लोकसभा निवडणूक असो की विधानसभा, किंवा इतर कोणतीही निवडणूक असो. मतदान करण्यासाठी प्रत्येकाला आपल्या गावी जावं लागतं. गावाकडे मतदार यादीत नाव असल्याने अनेकांना गावी जावं लागतं. पण आता गावी जाण्याची गरज नाही. आता मुंबई-दिल्लीत बसून तुम्ही यूपी-बिहारचे खासदार निवडून देऊ शकता. बाहेरगावी गेलेल्या प्रवाशांना मतदान करता यावं म्हणून निवडणूक आयोग कामाला लागले आहे. आयोगाने एक मशीन तयार केली आहे. या मशीनची टेस्टही करण्यात आली आहे. ही मशीन निवडणुकीत वापरल्यास त्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे. कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर निवडणूक आयोग ही मशीन मतदान प्रक्रियेत वापरात आणणार आहे.

नवीन व्होटिंग मशीन कशी असेल? त्यामुळे निवडणूक सोपी होणार की नाही? ही मशीन आणल्यानंतर निवडणूक आयोगासमोर काय समस्या निर्माण होतील? नव्या व्होटिंग मशीनचा कुणाला फायदा होईल? मतदानाचा टक्का वाढेल काय? या मशीनचा लाभ घेण्यासाठीची प्रक्रिया काय आहे? असे काही प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचं काम आपण करणार आहोत.

नवीन व्होटींग मशीन कोणती?

कुणाला कुठूनही मतदान करता यावे म्हणून रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (R-EVM) विकसित करण्यात आली आहे. विद्यमान व्हीएम मशीन सारखीच ही मशीन आहे. फक्त यात काही बदल करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या काळात आपल्या गाव किंवा शहरात जाऊ शकत नाही, अशा मतदारांना मतदान करण्यासाठी ही मशीन उपयोगी पडणार आहे.

या मशीनचा वापर करण्यासाठी मतदारांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. निर्धारीत कालावधीतच त्यांना ही नोंदणी करावी लागणार आहे. मात्र, ही प्रक्रिया देशात कधी लागू होईल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण निवडणूक आयोग ही मशीन वापरात आणण्यासाठी तयार आहे. अधिकाधिक नागरिकांनी मतदानात भाग घ्यावा म्हणून निवडणूक आयोग कामाला लागले आहे.

कायद्यात दुरुस्ती

ही मशीन निवडणूक प्रक्रियेचा भाग करण्यासाठी लोकप्रतिनिधीत्व कायदा 1950 आणि 1951, द कंडक्ट ऑफ इलेक्शन रुल्स 1961 तसेच द रजिस्ट्रेशन इलेक्टर्स रुल्स, 1960 मध्ये दुरुस्ती करावी लागणार आहे.या दुरुस्तीवेळी प्रवासी मतदारांना वेगळ्या पद्धतीने डिफाइन करावं लागणार आहे. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहत असतानाही आपल्या मूळ मतदारसंघातील उमेदवाराला निवडून देण्याची ज्यांची इच्छा आहे, त्यांचीच नोंदणी केली जाईल आणि त्यांनाच या मशीनचा फायदा घेता येणार आहे. सध्या मतदारांना कोणत्याही भागात राहून मतदान करता येत नाही. त्यांना मतदानासाठी आपल्या मूळ गावी जावं लागत आहे.

मतदान कार्ड स्कॅन होणार

ही व्यवस्था लागू होईल तेव्हा मतदारांसाठी वेगळे मतदान केंद्र तयार करण्यात येईल. या मतदान केंद्रांना रिमोट पोलिंग स्टेशन संबोधलं जाईल. एक साथ जास्तीत जास्त 72 निवडणूक केंद्रांवर मतदान करण्याची सुविधा दिली जाणार आहे. मतदार मतदान केंद्रावर गेल्यावर त्यांचं व्होटर कार्ड स्कॅन केलं जाईल. हे मतदान कार्ड स्कॅन करताच त्याच्या मतदारसंघातील उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्ह मशीनमध्ये दिसेल. त्यामुळे मतदारांना मतदान करता येणार आहे.

फायदा कुणाला?

निवडणूक आयोगाकडील आकडेवारीनुसार दिल्ली, मुंबई सारख्या बड्या शहरात इतर राज्यातील लोक मोठ्या प्रमाणावर राहत आहेत. विशेष म्हणजे अनेक वर्षांपासून ते इथे राहत आहेत. मात्र, त्यांच्याकडील मतदान कार्ड त्यांच्या मूळ गावचं आहे. निवडणुकीच्या काळात काही लोक गावाकडे मतदानासाठी जातात.

पण असंख्य लोकांना कामाच्या व्यस्ततेमुळे गावाकडे जाता येत नाही. त्यामुळे या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून ही मशीन विकसित करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात दिल्लीच्या झोपडपट्ट्यांमध्ये या मशीनची टेस्ट करण्यात आली. यावेळी एक हजाराहून अधिक प्रवासी मतदारांनी भाग घेतला.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.