AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑक्सिजनच्या व्यवस्थापनासाठी ‘मुंबई मॉडेलचा’ वापर करा, सुप्रीम कोर्टाचे दिल्लीला सूचना

दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. (Examine 'Mumbai Model', learn from it: Supreme Court tells Delhi govt on oxygen crisis)

ऑक्सिजनच्या व्यवस्थापनासाठी 'मुंबई मॉडेलचा' वापर करा, सुप्रीम कोर्टाचे दिल्लीला सूचना
supreme court
| Updated on: May 05, 2021 | 3:12 PM
Share

नवी दिल्ली: दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला ऑक्सिजनच्या व्यवस्थापनासाठी मुंबई मॉडल स्वीकारण्याच्या सूचना केल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या ऑक्सिजन व्यवस्थापनाची सुप्रीम कोर्टाने स्तुतीही केली आहे. (Examine ‘Mumbai Model’, learn from it: Supreme Court tells Delhi govt on oxygen crisis)

दिल्लीत गेल्या काही आठवड्यांपासून ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे दिल्लीकरांना ऑक्सिजनसाठी वणवण भटकावे लागत आहे. याप्रकरणी आधी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर आलं आहे. यावेळी कोर्टाने मुंबई महापालिकेने ज्या पद्धतीने ऑक्सिजनचं व्यवस्थापन केलं. ते मॉडल दिल्ली सरकारने अवलंबावं. दिल्ली सरकारने मुंबई महापालिकेकडून काही चांगल्या गोष्टी घ्याव्यात, असं कोर्टाने म्हटलं आहे. न्यायामूर्ती चंद्रचूड यांनी हा सल्ला दिला.

मुंबई पालिकेकडून शिका

मुंबई महापालिकेने कोरोना काळात चांगलं काम केलं आहे. अशावेळी दिल्लीने काही शिकलं पाहिजे. वैज्ञानिक पद्धतीने काम केलं पाहिजे, असं चंद्रचूड म्हणाले. चार अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकल्याने ऑक्सिजन येणार नाही. लोकांचे जीव कसे वाचतील याकडे लक्ष दिलं पाहिजे, असंही कोर्टाने सांगितलं.

मुंबई मॉडेल राजकीय मॉडेल नाही

मुंबई मॉडेल हे काही राजकीय मॉडेल नाही. कोर्टातील अधिकारी हे काही केंद्र किंवा राज्यांचे नाही. आपल्याला यातून मार्ग काढला पाहिजे. मुंबई महापालिका काय करत आहे, कसे करत आहे? हे जाणून घ्या. महाराष्ट्र आता स्वत: ऑक्सिजन पुरवठा करू शकतो. ते दिल्ली करू शकत नाही, असंही कोर्टाने म्हटलं.

चहल यांच्याशी बोलला का?

जर दिल्लीचे आरोग्य सचिव आणि केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याशी चर्चा झाली असेल, त्यात ऑक्सिजन स्टोरेज टँक कशा तयार करायच्या याची माहिती घेतली असेल तर दिल्लीसाठी हा प्लान कसा राबवणार याची माहिती आम्हाला द्या, अशी विचारणाही कोर्टाने केली.

काय आहे मुंबई मॉडल?

कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर मुंबईत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. यावेळी मुंबई महापालिकेने तातडीने ऑक्सिजनचं नियोजन केलं. पालिकेने ऑक्सिजन पुरवठा सिस्टिम वाढवली. 28 हजार बेड पैकी 12 ते 13 हजार बेडवर ऑक्सिजन सप्लाय करणअयाची व्यवस्था केली. त्यानंतर पालिकेने ऑक्सिजन सिलिंडरही बदलण्यास सुरुवात केली. सुरुवातीला पालिका साधारण ऑक्सिजन सिलिंडरवर अवलंबून होती. नंतर पालिकेने जम्बो ऑक्सिजन सिलिंडरचा वार केला. साधारण ऑक्सिजन सिलिंडरपेक्षा या सिलिंडरची क्षमता दहा टक्के अधिक असते. त्याचबरोबर पालिकेने 13 हजार किलो लीटरची मेडिकल ऑक्सिजन टँक तयार केली. त्यामुळे रुग्णालये रिफिल मोडवरून स्टोरेज सप्लाय मोडवर आले, असं पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं. (Examine ‘Mumbai Model’, learn from it: Supreme Court tells Delhi govt on oxygen crisis)

संबंधित बातम्या:

Maharashtra Coronavirus LIVE Update : पुणे शहराला 30 हजार लसी मिळाल्या, ठराविक केंद्रांवर लसीकरण सुरु होणार

LIVE | नाशकात भाजपाचे सभागृह नेते सतीश सोनवणे यांच्या कार्यालयावर हल्ला

सर्वोच्च न्यायालयाने मराठा बांधवांना जे नाकारले, त्याची भरपाई राज्य सरकार सर्वतोपरीने करुन देणार: अजित पवार

(Examine ‘Mumbai Model’, learn from it: Supreme Court tells Delhi govt on oxygen crisis)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.