Crime: अरब देशातून 4 आमदारांना येत होती खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी, स्पेशल टास्क फोर्सने 6 जणांना केले जेरबंद, 2आरोपी मुंबईतील
वेगवेगळ्या भाषाशैलीत त्यांना या धमक्या देण्यात आल्या होत्या. त्या मुंबईय्या हिंदी आणि पंजाबी भाषांचा समावेश होता. आता या प्रकरणात सहा जणांना अटक केल्याची घोषणा हरियाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोकप्रतिनिधींना धमकी देण्याचे आणि त्यांच्या फसवणुकीच्या प्रकारात वाढ होताना दिसते आहे. गुन्हेगारांचा हा एक नवा पॅटर्न असल्याची चर्चाही यानिमित्ताने सुरु झाली आहे.
चंदीगड – अरब देशातील मोबाईल नंबरवरुन चार आमदारांना (four MLA)खंडणी आणि जीवे मारण्याच्या धमक्या (death threats)येत होत्या. वेगवेगळ्या फोन नंबरवरुन हे फोन करण्यात येत होते. या प्रकरणात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. सगळ्या गुन्ह्यांचा एकत्र तपास करण्याची जबाबदारी स्पेशल टास्क फोर्सला (Special task force)देण्यात आली होती. या तपासात धक्कादायक माहिती हाती आली. मोबाईल तंत्रज्ञांच्या सहाय्याने हे फोन कुठून येतायेत हा शोध घेण्यात आला. त्यात असे समोर आले की, हे फोनचे नंबर जरी अरब देशांतील असले, तरी पाकिस्तानातून हे सगळे ऑपरेट होत आहेत. याच पद्धतीने पंजाबच्या काही माजी आमदारांनी धमक्या आल्या होत्या. अशाच मोबाईल नंबरवरुन त्यांनाही खंडणीची मागणी करण्यात आली होती. वेगवेगळ्या भाषाशैलीत त्यांना या धमक्या देण्यात आल्या होत्या. त्या मुंबईय्या हिंदी आणि पंजाबी भाषांचा समावेश होता. आता या प्रकरणात सहा जणांना अटक केल्याची घोषणा हरियाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोकप्रतिनिधींना धमकी देण्याचे आणि त्यांच्या फसवणुकीच्या प्रकारात वाढ होताना दिसते आहे. गुन्हेगारांचा हा एक नवा पॅटर्न असल्याची चर्चाही यानिमित्ताने सुरु झाली आहे.
I congratulate Haryana Special Task Force for arresting 2 accused from Bombay and 4 from Mujjaffarpur Bihar involved in sending threating calls to 4 Haryana MLAs. Several mobile phones, SIM cards, ATM cards have been recovered. Further investigation is on.
हे सुद्धा वाचा— ANIL VIJ MINISTER HARYANA (@anilvijminister) July 31, 2022
आरोपींपैकी दोघे मुंबईतील
अनिल वीज यांनी ट्टिव करुन ही माहिती दिली आहे, त्यात लिहिले आहे – हरियाणातील चार आमदारांना धमकीचे फोन येत होते, या प्रकरणात सहभागी असलेल्या दोघांना मुंबईतून, तर चौघांना मुज्जफरपूर, बिहारमधून अटक करण्यात आली आहे. हरियाणाच्या स्पेशल टास्क फोर्सने केलेल्या कारवाईबाबत मी त्यांचे अभिनंदन करतो. या आरोपींकडून अनेक मोबाईल फोन, सीम कार्ड आणि एटीएम कार्डही जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे.
पोलीस महासंचालक लक्ष ठेवून होते
सुमारे 15 दिवस सुरु असलेल्या या ऑपरेशनवर हरियाणाचे पोलीस महासंचालक प्रशांत अग्रवाल वैयक्तिक पातळीवर लक्ष ठेवून होते, वेळोवेळी सूचनाही देत होते. या तपासात केंद्रीय तपास यंत्रणांचेही सहकार्य घेण्यात आले. स्पेशल टास्क फओर्सने सगळे मोबाईल नंबर आणि आयपी एड्रेसचे तांत्रिक विश्लेषण केले. यासाठी पाच टीम्सनी वेगवेगळे कार्य केले.
वेगवेगळ्या टीमने टाकल्या धाडी
या आरोपींची माहिती मिळवण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सने रणनीती तयार केली. या योजनेत या आरोपींकडे पैसे देण्यासाठी त्यांचे बँकेतील अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर मागण्यात आले. आरोपींनी दिलेल्या बँक अकाऊंटचा शोध घेण्यात आला. दोन वेगवेगळ्या टीमने मुंबई आणि बिहारच्या मुज्जफरपूरमध्ये धाडी घातल्या.