AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जबरदस्त! भारताचा चीनला ‘दे धक्का’, घातक ‘ब्रह्मोस’ मिसाइल देणार ‘या’ देशाला, 2770 कोटींची डील

दक्षिण चीन समुद्रात चीनची दादागिरी सुरु असते. सैन्य शक्तीचा धाक दाखवून विस्ताराचं चीनचं धोरण आहे. म्हणूनच ब्रह्मोसची निर्यात हे रणनितीक दृष्टीने भारताने उचलेलं मोठं पाऊल आहे.

जबरदस्त! भारताचा चीनला 'दे धक्का', घातक ‘ब्रह्मोस’ मिसाइल देणार 'या' देशाला, 2770 कोटींची डील
| Edited By: | Updated on: Jan 15, 2022 | 9:42 AM
Share

नवी दिल्ली: आजच्या घडीचं भारताचं सर्वात घातक अस्त्र म्हणजे ‘ब्रह्मोस’ (BrahMos). भारत आणि रशियाने (Russia) मिळून ‘ब्रह्मोस’ हे सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल विकसित केलं आहे. मागच्या काही काळापासून भारताची ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र विक्री संदर्भात फिलिपिन्स (Philippines) बरोबर बोलणी सुरु होती. दोन्ही देशांमधील चर्चेच्या फेऱ्या अखेर यशस्वी झाल्या असून भारताला ‘ब्रह्मोस’क्षेपणास्त्र निर्यातीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. 375 मिलियन डॉलर्स म्हणजे 2770 कोटींचा हा करार आहे.

भारत त्यांची ताकत वाढवणार

भारताप्रमाणेच चीनचं फिलिपिन्स बरोबर सुद्धा पटत नाही. दक्षिण चीन समुद्रात सागरी हद्दीवरुन त्यांच्यात वाद आहेत. ‘ब्रह्मोस’ हे भारताच्या शस्त्रास्त्र ताफ्यातील सर्वात घातक अस्त्र आहे. आता भारत हेच अस्त्र फिलिपिन्सला देऊन त्यांची ताकत वाढवणार आहे. एकप्रकारे चीनसाठी हा मोठा धक्का आहे. फिलिपिन्सच्या राष्ट्रीय संरक्षण विभागाने ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडसाठी नोटीस ऑफ अवॉर्ड काढली आहे. त्या अंतर्गत पुढच्या आठवड्यात या करारावर स्वाक्षरी होईल. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

निर्यातीची ही पहिली डील

290 किलोमीटरची रेंज असलेल्या ब्रह्मोस मिसाइल निर्यातीची ही पहिली डील आहे. या कारारमुळे फिलिपिन्स तसेच अन्य आशियाई देश इंडोनेशिया, व्हिएतनाम बरोबर करार करण्याच मार्ग मोकळा होणार आहे. दक्षिण चीन समुद्रात चीनची दादागिरी सुरु असते. सैन्य शक्तीचा धाक दाखवून विस्ताराचं चीनचं धोरण आहे. म्हणूनच ब्रह्मोसची निर्यात हे रणनितीक दृष्टीने भारताने उचलेलं मोठं पाऊल आहे.

मिसाइल बरोबर ट्रेनिंग

मिसाइल बरोबर ट्रेनिंग आणि अन्य बाबींचाही या पॅकेजमध्ये समावेश आहे. ‘ब्रह्मोस’ची सागरी आवृत्ती फिलिपिन्सच्या देण्यात येणार आहे. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने फिलिपिन्स नौदलासाठी हा करार करण्यात येणार आहे. यानंतर लष्कराला सामुग्री पुरवण्याचाही करार होऊ शकते. इंडोनेशियालही ब्रह्मोस मिसाइलची निर्यात करण्याची बोलणी महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. ज्या प्रमाणे चीन भारताच्या शेजारी देशांमध्ये मोठी आर्थिक गुंतवणूक करुन घेरण्याची रणनिती अवलंबत आहे. आता भारताने सुद्धा त्याच पद्धतीचे उत्तर देण्याची रणनिती अवलंबली आहे.

संबंधित बातम्या

IND vs SA: ‘ओय एक मॅच तो अच्छा खेल के जाओ’, कॅच सुटली नेटीझन्सनी पुजाराची वाट लावली IND vs SA: ‘बाहेरच्या लोकांना माहित नसतं, मैदानात काय…’, विराटचं DRS वादावर मोठ विधान U19 World Cup: पहिल्याच सामन्यात भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं चॅलेंज, सिनियर संघाच्या पराभवाचा वचपा काढणार?

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.