Fack Check : कृषी कायद्यांतर्गत खरंच शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावणार? वाचा सत्य

कृषी कायद्यातील त्रुटींविषयी बोलताना काही शेतकरी नेत्यांनी कृषी कायद्यामधील करारात शेती करणाऱ्या कंपन्या (Contract farming) देणगीदारांची जमीन हडप करतली असंही म्हटलं आहे.

Fack Check : कृषी कायद्यांतर्गत खरंच शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावणार? वाचा सत्य
Follow us
| Updated on: Jan 06, 2021 | 8:58 PM

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात (Farm Act) शेतकरी आंदोलनाचा आज 42 वा दिवस आहे. जोपर्यंत सरकार तिन्ही कायदे मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची घोषणा शेतकरी नेत्यांकडून करण्यात आली आहे. यासाठी ट्रॅक्टर मोर्चाचीदेखील तयारी सुरू आहे. याच दरम्यान, कृषी कायद्यातील त्रुटींविषयी बोलताना काही शेतकरी नेत्यांनी कृषी कायद्यामधील करारात शेती करणाऱ्या कंपन्या (Contract farming) देणगीदारांची जमीन हडप करतली असंही म्हटलं आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणखी संतापाचं वातावरण आहे. पण हे नेमकं खरं आहे की खोटं? (farm act contract farming new law fact check kisan andolan latest news)

समोर आलेल्या अधिक तपासानंतर ही माहिती खोटी असल्याचं सांगण्यात येत आहे. कंत्राटी शेतीमध्ये कोणत्याही रकमेच्या वसुलीसाठी शेतकर्‍यांच्या शेतजमिनीवर कारवाई करता येणार नाही असं कृषी कायद्यामध्ये स्पष्टपणे लिहण्यात आलं आहे. यामध्ये शेतकर्‍यांच्या जमिनीच्या विक्री, भाडेतत्त्वावर देणं आणि तारणासाठी पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये करार हा समजूतीचा असणार आहे जमिनीचा नाही. डिसेंबर 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: याबद्दल माहिती दिली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात विविध राज्यातले शेतकरी बांधव तसंच शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. हे कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी दिल्लीत हजारो शेतकरी तळ ठोकून आहे. आज आपण समजून घेऊयात नेमका सरकारने पारित केलेला कृषी कायदा काय आहे?, शेतकऱ्यांचा या कृषी कायद्याला विरोध का आहे?, दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचे मुख्य चेहरे कोणते?, शेतकऱ्यांच्या मागण्या कोणत्या? तसंच सरकारची बाजू काय?

कोणते कृषी कायदे वादग्रस्त?

1) कृषी उत्पादने,व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा 2020

2) हमी भाव व कृषी सेवांचा शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण ) करार कायदा 2020

3) जीवनावश्यक वस्तू (सुधारणा) कायदा 2020

शेतकऱ्यांना चिंता कशाची?

1) हमी भाव राहील असे सरकार तोंडी म्हणतंय, त्याची खात्री नाही

2) सरकार हमी भावाने शेतमाल खरेदी करणे बंद करेल

3) खाजगी कंपन्या हमी भावाने शेतमाल घेतील याची खात्री नाही

4) कृषी कायद्यांमुळे खाजगी कंपन्यांची खरेदी दरात मनमानी होईल

5) 3% ग्रामीण पायाभूत सुविधा निधी यंदापासून राज्यांना बंद

6) शक्तीशाली कंपन्या शेतकऱ्यांचे शोषण करतील, फसवतील

शेतकऱ्यांच्या काय आहेत मागण्या?

1) तिन्ही कृषी कायदे मागे घ्या

2) हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी अपराध ठरवा

3) किमान हमी भावाचा कायदा करा

4) 3% ग्रामीण पायाभूत सुविधा निधी पुन्हा सुरु करा

5) सरकारकडून धान्य खरेदी चालूच ठेवा

6) कृषी क्षेत्रात भांडवलदारांना मनाई करा

7) राज्यांच्या वैधानिक अधिकारांचा सन्मान करा (farm act contract farming new law fact check kisan andolan latest news)

संबंधित बातम्या:

अहंकार सोडा, राजधर्म पाळा, कृषी कायदे मागे घ्या; सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्ला

तब्बल 26 वर्षांनी मायावती-मुलायम एकत्र, भेटल्यानंतर काय म्हणाले?

(farm act contract farming new law fact check kisan andolan latest news)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.