Bharat Bandh Live : दिल्ली ते केरळ शेतकरी रस्त्यावर, रस्ते बंद, रेल्वे ट्रॅक जाम, गाजीपूर बॉर्डरवर शेतकरी जमले

| Updated on: Sep 28, 2021 | 4:00 PM

Farmers Protest Live updates: केंद्र सरकारने (Centre Government) तीन नवे सुधारित कृषी कायदे पारित केले आहेत. या कायद्याला विरोध दर्शवत मागील जवळपास दीड वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे (Farmer) आंदोलन हे सुरु आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज (सोमवारी) शेतकरी संघटनांनी ‘भारत बंद’ ची हाक दिली आहे.

Bharat Bandh Live :  दिल्ली ते केरळ शेतकरी रस्त्यावर, रस्ते बंद, रेल्वे ट्रॅक जाम, गाजीपूर बॉर्डरवर शेतकरी जमले
bharat Bandh

केंद्र सरकारने (Centre Government) तीन नवे सुधारित कृषी कायदे पारित केले आहेत. या कायद्याला विरोध दर्शवत मागील जवळपास दीड वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे (Farmer) आंदोलन हे सुरु आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज (सोमवारी) शेतकरी संघटनांनी ‘भारत बंद’ ची हाक दिली आहे. त्या अनुशंगाने दिल्ली येथे तर बंदोबस्त वाढविण्यात आला आहेच शिवाय राज्यातील शेतकरी संघटना आणि काही पक्षांनीही या बंदला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे बाजार समित्या, शहरातील मुख्य मार्केट यावर परिणाम होणार असल्याचे चित्र आहे. कॅांग्रेस पक्षानेही आंदोलनाला पाठिंबा दिला असून स्थानिक पातळीवरही पोलीस बंदोबस्त राहणार आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 27 Sep 2021 06:39 PM (IST)

    भारत बंद मध्ये सांगलीच्या वसंतदादा साखर कामगारांचा सहभाग, केंद्र सरकारच्या विरोधात केली घोषणाबाजी..

    कृषी कायदा आणि कामगार विरोधी धोरण असणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात आज सांगलीच्या वसंतदादा पाटील साखर कारखाना मध्ये कामगारांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. नरेंद्र मोदी चले जाओ अश्या घोषणा कामगारांनी दिल्या. देशातील आणि पंजाब राज्यातील शेतकरी केंद्र सरकारने दडपशाहीने लागू करू पहात असलेले तीन शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत आणि शेतीमालाला ५०% नफ्यासह  हमीभाव मिळावा म्हणून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. तसेच देशातील प्रमख देशव्यापी केंद्रीय कामगार संघटना राज्यव्यापी फेडरेशन निरनिराळ्या स्वतत्र कामगार सघटना ही शेतकरी विरोधी तीन कायदे मागे घ्यावेत व शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य कराव्यात म्हणून सक्रिय झालेल्या आहेत.   या मागण्या बरोबरच केंद्र सरकारने कामगार विषयक ४४ कामगार कायदे मोडीत काढून मोठ बड्या भांडवलदार व कारखानदारांना अनुकूल कामगार विरोधी धोरण अवलंबणेचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. त्यामुळे भाजपाप्रणीत केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी आणि त्यांच्या जनविरोधी भूमिकांना विरोध. करण्यासाठी संपूर्ण देशभर  भारत बंदचा आदेश दिलेला आहे. यालाच पाठिंबा देत आज सांगलीच्या वसंतदादा पाटील साखर कारखाना मध्ये कामगारांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
  • 27 Sep 2021 06:38 PM (IST)

    सोयाबीन हातातोंडाशी आल्यावर त्याचे भाव पाडण्याचे षडयंत्र चालू, शेतकऱ्यांचा आरोप

    शेतकरी विरोधी कायदे रद्द करा या मागणीसाठी गेल्या वर्षापासून दिल्लीत मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलन करत आहेत…परंतु केंद्र सरकार जगाच्या पोशिंद्याशी साधे बोलायलाही तयार नाही…सोयाबीन हातातोंडाशी आल्यावर त्याचे भाव पाडण्याचे षडयंत्र चालू असून दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परभणीत मस्कवादी कम्युनिस्ट पक्ष,भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाभरात धरणे आंदोलन तसेच रास्ता रोको करण्यात आला…केंद्राने केलेले कायदे रद्द करावे…अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली.

  • 27 Sep 2021 06:37 PM (IST)

    शेतकऱ्यांना संपविण्याचा केंद्र सरकारचा डाव ; काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांचा आरोप

    भारतीय संविधान धर्म ग्रंथापेक्षा सर्व श्रेष्ठ आहे. केंद्र सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत आहे. शेतकऱ्यांना संपविण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. हे ओळखून दिल्ली येथे शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले. परंतु, केंद्र सरकार केवळ आम्ही बोलायला तयार आहोत, असे सांगून वेळ मारून नेत आहे. त्याची झळ विदर्भातील शेतकऱ्यांना बसणार आहे. शेतकर्‍यांच्या विरोधातील तीन काळे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे, असे मत काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले.  विविध संघटनांनी भारत बंदची हाक दिली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. या आजच्या आंदोलनात कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते
    भारत बंद चा फारसा परिणाम यवतमाळ मध्ये दिसून आला नाही संमिश्र प्रतिसाद भारत बंद ला होता
  • 27 Sep 2021 10:25 AM (IST)

    आंध्रमध्ये सीपीआय कार्यकर्ते रस्त्यावर

  • 27 Sep 2021 10:21 AM (IST)

    नोएडात चक्काजाम, वाहनांच्या लांबच लांब रांगा

  • 27 Sep 2021 09:19 AM (IST)

    Bharat bandh : हैदराबादमध्ये दुकाने बंद

  • 27 Sep 2021 09:17 AM (IST)

    bharat bandh : कर्नाटकमध्ये शेतकरी रस्त्यावर

  • 27 Sep 2021 08:35 AM (IST)

    Bharat Bandh : रोहतकमध्ये राज्य महामार्ग बंद

  • 27 Sep 2021 08:26 AM (IST)

    Bharat Bandh : नागरिकांनो, दुपारनंतर घराबाहेर पडा, राकेत टिकैत यांचं आवाहन

  • 27 Sep 2021 08:21 AM (IST)

    Bharat Bandh : लाल किल्ल्याच्या दोन्ही बाजूंनी रस्ते बंद

  • 27 Sep 2021 08:20 AM (IST)

    Bharat Bandh : अमृतसरमध्ये आंदोलनस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त

  • 27 Sep 2021 08:17 AM (IST)

    Bharat Bandh : शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडून कृषी कायद्यांना काळा झेंडा

  • 27 Sep 2021 08:16 AM (IST)

    Bharat Bandh : गाजीपूर बॉर्डरवर शेतकरी जमायला सुरुवात

  • 27 Sep 2021 08:10 AM (IST)

    Bharat Bandh : भारत बंदला कोणकोणत्या पक्षांचं समर्थन?

    भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), भारतीय कम्युनिस्ट पक्ष, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, क्रांतिकारी समाजवादी पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, तेलुगू देसम पार्टी, जनता दल (सेक्युलर) सारख्या डाव्या पक्षांनी आजच्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, द्रविड मुन्नेत्र कळघम, युवाजन श्रमिक रायथू काँग्रेस पक्ष, झारखंड मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय जनता दल, स्वराज इंडिया यांनीही आजच्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे.

  • 27 Sep 2021 08:05 AM (IST)

    Bharat Bandh : यूपीकडून गाजीपूरकडे येणारा रस्ता बंद

  • 27 Sep 2021 08:04 AM (IST)

    Bharat Bandh : दिल्ली मेरठ हायवे बंद

    आज पुकारलेल्या भारत बंदचा भाग म्हणून गाझीपूर सीमेवरील राष्ट्रीय महामार्ग 9 च्या दिल्ली मेरठ लेन शेतकऱ्यांनी बंद केला आहे.

  • 27 Sep 2021 08:01 AM (IST)

    Bharat Bandh : गाजीपूर बॉर्डरवर शेतकरी जमायला सुरुवात

Published On - Sep 27,2021 7:57 AM

Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.