Bihar Crime: बिहारमध्ये दृश्यमची पुनरावृत्ती, पत्नीच्या प्रियकराला अडकवण्यासाठी प्लॅन करुन मुलीची हत्या

प्लाननुसार राजेशने स्वतःच्या 11 वर्षाच्या मुलीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर मुलीच्या कपड्यांममध्ये पत्नी व तिचा प्रियकर सूरजचा फोटो ठेवून चित्रपटातील कथेनुसार मृतदेह चहटपूर गावात सूरजच्या घरामागे टाकला. त्यानंतर राजेशने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली.

Bihar Crime: बिहारमध्ये दृश्यमची पुनरावृत्ती, पत्नीच्या प्रियकराला अडकवण्यासाठी प्लॅन करुन मुलीची हत्या
भिवंडीत झोपड्यावर ट्रक कोसळून तीन बहिणींचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 6:05 PM

बिहार : धोकेबाज पत्नीला कंटाळून पतीने आपल्या निष्पाप मुलीचे आयु्ष्य संपवल्याची धक्कादायक घटना बिहारमधील अररियामध्ये घडली आहे. मुलीची हत्या करुन पत्नीच्या प्रियकराला या हत्याकांडात गोवण्याचा पतीचा प्लान होता. आरोपीने दृश्यम चित्रपट पाहून हा सर्व प्लान आखला होता. मात्र स्तःच्या प्लानमध्ये तो स्वतःच फसला. राजेश पंडित असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळला

आरोपी राजेश पंडित हा अररियाच्या पलासी पोलीस स्टेशन हद्दीतील उरला गावात आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहतो. आरोपीच्या पत्नीचे गावातीलच सूरज नावाच्या एका विवाहित पुरुषांसोबत प्रेमसंबंध सुरु होते. राजेशचे आपल्या पत्नीवर खूप प्रेम होते. त्यामुळे त्याला पत्नीला सोडायचे नव्हते. म्हणून त्याने पत्नीच्या प्रियकरालाच आपल्या मार्गातून दूर करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने दृश्यम चित्रपट पाहून चित्रपटातील मुलीची हत्या करुन पत्नीच्या प्रियकराला या हत्येत गोवण्याचा प्लान तयार केला.

गळा दाबून मुलीची हत्या केली

प्लाननुसार राजेशने स्वतःच्या 11 वर्षाच्या मुलीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर मुलीच्या कपड्यांममध्ये पत्नी व तिचा प्रियकर सूरजचा फोटो ठेवून चित्रपटातील कथेनुसार मृतदेह चहटपूर गावात सूरजच्या घरामागे टाकला. त्यानंतर राजेशने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. तसेच आपल्या मुलालाही पोलिसांनी प्रश्न विचारल्यास आपल्या बहिणीला सूरज सोबत घेऊन गेला होता असे सांगण्यास सांगितले होते.

पोलिसांनी राजेशची चौकशी केली असता धक्कादायक खुलासा झाला

राजेशच्या तक्रारीनुसार पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र मुलगी कुठेही सापडत नव्हती. पोलिसांनी तपास केला असता हत्येच्या दिवशी प्रियकर सूरजचे ठिकाण घटनास्थळापासून दूर दुसऱ्या गावात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी राजेश पंडितला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली. चौकशीनंतर ही धक्कादायक बाब समोर आली. हे ऐकून पोलीसही थक्क झाले. हत्येचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी चहटपूर गावातून मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. अररियाचे डीएसपी पुष्कर कुमार यांनी सांगितले की, आरोपी राजेश पंडितला गुरुवारी अटक करण्यात आली आहे. आता त्याला न्यायालयात हजर करण्याची तयारी सुरू आहे. (Father kills daughter in Bihar to seduce wife’s boyfriend)

इतर बातम्या

इंदापूर तालुक्यातील ‘त्या’ हत्येचा अखेर उलगडा, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या; भावानेच केली हत्या

काय राव गुरुजी, तुम्हीही जुगारात? संताप व्यक्त करावा की आश्चर्य? जिल्हा परिषदेने दिला दणका!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.