अहंकार सोडा, राजधर्म पाळा, कृषी कायदे मागे घ्या; सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्ला

अहंकार सोडा, राजधर्माचं पालन करा आणि तिन्ही कृषी कायदे मागे घ्या, असं आवाहन काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलं आहे. (First time such arrogant government in power: Sonia Gandhi)

अहंकार सोडा, राजधर्म पाळा, कृषी कायदे मागे घ्या; सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्ला
हायकमांडने राज्यातील काँग्रेस नेत्यांकडे या सगळ्या परिस्थितीचा अहवाल मागितला आहे.
Follow us
| Updated on: Jan 03, 2021 | 6:50 PM

नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकार हे स्वातंत्र्यानंतरच सर्वात अहंकारी सरकार आहे, अशी टीका करतानाच अहंकार सोडा, राजधर्माचं पालन करा आणि तिन्ही कृषी कायदे मागे घ्या, असं आवाहन काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलं आहे. (First time such arrogant government in power: Sonia Gandhi)

अजूनही वेळ गेलेली नाही. मोदी सरकारने सत्तेचा अहंकार सोडावा आणि तिन्ही कृषी कायदे मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. गेल्या महिन्याभरापासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. कृषी कायदे मागे घेण्याचा राजधर्म पाळणं म्हणजे या आंदोलनात बळी गेलेल्यांना खरी श्रद्धांजली असेल, असं सोनिया गांधी यांनी सांगितलं.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अहंकारी सरकार सत्तेत आलं आहे. शेतकऱ्यांच्या वेदनाही हे सरकार समजून घेण्यास तयार नाही तिथे सामान्य जनतेची काय बिशाद? कृषी विधेयकाला सुरू असलेल्या आंदोलनात आतापर्यंत 50 शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. त्यातील काही जणांनी सरकारविरोधातील संतापातून आत्महत्या केली आहे, तर काहीचा थंडीमुळे मृत्यू झाला आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

भांडवलदार धार्जिणे सरकार

यावेळी त्यांनी मोदी सरकार हे भांडवलदार धार्जिणे असल्याचा आरोप केला. काही ठरावीक उद्योजकांना लाभ पोहोचवण्याचं काम मोदी सरकार करत आहे. पण लक्षात ठेवा, लोकशाहीत लोकांचं न ऐकणारे लोक अधिक काळ सत्तेत राहत नाहीत. लोकशाहीचा अर्थ शेतकरी आणि मजुरांच्या हिताचं रक्षण करणं आहे, हे सरकारला समजलं पाहिजे, असं सांगतानाच थंडीपाठोपाठ आता दिल्लीत पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे आंदोलन करणाऱ्या महिला, पुरुष आणि लहान मुलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, याकडेही त्यांनी सरकारचं लक्ष वेधलं. (First time such arrogant government in power: Sonia Gandhi)

संबंधित बातम्या:

सरकारं येत असतात, जात असतात; सूडबुद्धीने कोणी काही करू नयेः अजित पवार

बिहारमध्ये पुन्हा नितीश-लालूंच्या कचाट्यात भाजप? भाजपचे ‘सुमो’ सक्रिय

मोदींच्या ‘असत्याग्रहा’वर बळीराजांचा विश्वास नाही; ‘त्या’ बैठकीपूर्वीच राहुल गांधींचं ट्विट

(First time such arrogant government in power: Sonia Gandhi)

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.