Bharatsinh Solanki Video : पती, पत्नी और वो, काँग्रेस नेता दुसऱ्या बाईबरोबर सापडताच खवळलेल्या पत्नीने… व्हिडीओ व्हायरल

Bharatsinh Solanki Video : सोशल मीडियात हा कथित व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सोलंकी यांची पत्नी हळूच दरवाजा उघडून आत येताना दिसत आहे. पत्नी घरात येताच भरतसिंह सोलंकी धावतच येताना दिसत आहेत.

Bharatsinh Solanki Video : पती, पत्नी और वो, काँग्रेस नेता दुसऱ्या बाईबरोबर सापडताच खवळलेल्या पत्नीने... व्हिडीओ व्हायरल
पती, पत्नी और वो, काँग्रेस नेता दुसऱ्या बाईबरोबर सापडताच खवळलेल्या पत्नीने... Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 12:47 PM

अहमदाबाद: काँग्रेस (Congress) नेते भरतसिंह सोलंकी (Bharatsinh Solanki) हे एका तरुणीबरोबर आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका तरुणीबरोबरचा सोलंकी यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल (video) झाला आहे. त्यामुळे गुजरातच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या व्हिडीओत सोलंकी एका अनोळखी तरुणीसोबत दिसत आहेत. तिथे त्यांची पत्नी पोहोचलेली दिसत आहे. आपल्या नवऱ्याला परक्या बाईसोबत पाहून सोलंकी यांची पत्नी रेश्मा पटेल यांनी एकच कहर केला. त्यांनी जोरजोरात आरडाओरड करून भांडण केलं. या तरुणीसोबत तुमचे संबंध आहेत, असा आरोप करतानाच रेश्मा यांनी चक्क पतीचे कॉलर पकडल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. त्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. एका परक्या स्त्रीवरून नवरा बायकोमध्ये सुरू असलेलं भांडणही या व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ गुजरातमध्ये वाऱ्यासारखा व्हायरल होत असून त्यामुळे सोलंकी यांच्यावर टीकाही होत आहे.

व्हायरल व्हिडीओत काय आहे?

सोशल मीडियात हा कथित व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सोलंकी यांची पत्नी हळूच दरवाजा उघडून आत येताना दिसत आहे. पत्नी घरात येताच भरतसिंह सोलंकी धावतच येताना दिसत आहेत. पोलिसांना बोलवा.. पोलिसांना बोलवा… असं ओरडत पत्नी रेश्माला आत येण्यास मज्जाव करताना दिसत आहे. रेश्मा पटेल यांच्यासोबत काही लोक असून हे लोकही घरात जबरदस्तीने घुसताना दिसत आहेत. त्यानंतर या अनोळखी तरुणीचे केस पकडून रेश्मा या तिला मारझोड करताना दिसत आहेत. तर मध्ये पडून या तरुणीला वाचवण्याचा सोलंकी प्रयत्न करताना दिसत आहेत. पण रेश्मा या ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. त्या सोलंकी यांना धक्के मारून बाजूला सारताना दिसत आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्लिपमध्ये या अनोळखी तरुणीला मारहाण केली जात असल्याचं दृश्य दिसत आहे. या तरुणीचे केस ओढून तिला मारहाण करताना रेश्मा पटेल दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

तिचा व्हिडीओ काढा… तिचा व्हिडीओ शूट करा…

या व्हिडीओमध्ये रेश्मा पटेल या तरुणीला फटकारतानाही दिसत आहे. तू माझ्या नवऱ्याला जाळ्यात अडवलं आहेस. तुला मी सोडणार नाही, असा इशारा रेश्मा देताना दिसत आहेत. अचानक घरात घुसल्यानंतर भरतसिंह सोलंकी प्रचंड घाबरलेले दिसत आहेत. ते इतके की गार्डला बोलवा, गार्डला बोलवा असं म्हणण्याऐवजी पोलिसांना बोलवा… पोलिसांना बोलवा असं म्हणताना ते दिसत आहे. तर, या तरुणीचे केस पकडून तिचा व्हिडीओ काढा… तिचा व्हिडीओ शूट करा, असं म्हणताना रेश्मा पटेल दिसत आहेत. तर ही तरुणी आपला चेहरा लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहे. रेश्मा पटेल यांच्यासोबत एक व्यक्ती आहे. तोही या तरुणीला दरडावताना दिसत आहे. हा धंदा बरा नाही, असं सांगताना हा माणूस दिसत आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.