पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी एनडीएमध्ये यावं; रामदास आठवलेंची खुली ऑफर

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीएमध्ये यावे. असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अमारीदर केलं आहे.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी एनडीएमध्ये यावं; रामदास आठवलेंची खुली ऑफर
Follow us
| Updated on: Sep 20, 2021 | 4:34 PM

मुंबई : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीएमध्ये यावे. पंतप्रधान सर्वांचा सन्मान करतात, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कॅप्टन अमारीदर सिंह यांना केले आहे. (Former Punjab CM Capt. Amarinder Singh should join NDA; Ramdas Athawale’s offer)

कॅप्टन अमारीदर सिंह यांनी काल पंजाबच्या राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला. आज काँग्रेस पक्षाने त्यांच्या जागी नवीन मुख्यमंत्री चारणजीतसिंह चन्नी यांच्या नावाची घोषणा केली. पंजाबच्या राजकारणाची सध्या देशभर चर्चा सुरू आहे. अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अमरिंदर सिंह यांना एनडीए मध्ये सामील व्हावे, असा सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वांना सन्मान मिळतो, असे रामदास आठवले यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

चरणजीतसिंह चन्नी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून चरणजीतसिंह चन्नी अखेर शपथ घेतली आहे. त्यामुळे ते राज्यातील पहिले दलित मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांच्यासोबत दोन मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. चरणजीतसिंह चन्नी यांनी आज सकाळी राजभवन येथे जाऊन मोजक्याच लोकांच्या उपस्थित मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चन्नी यांच्याशिवाय सुखजिंदरसिंग रंधावा आणि ओपी सोनी यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना शपथ दिली. या दोन्ही नेत्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाण्याची दाट शक्यता आहे. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी, पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू, माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड आदी नेते उपस्थित होते.

चन्नी भावूक

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर चन्नी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते भावूक झाले होते. हायकमांडने एका सामान्य माणसाला मुख्यमंत्रीपदाची धुरा दिली आहे. ज्याच्या घराला छत नव्हतं, आज काँग्रेसने त्याला मुख्यमंत्री केलं आहे, असं भावूक उद्गार चन्नी यांनी काढलं.

कृषी कायदे मागे घ्या

यावेळी त्यांनी केंद्र सरकारने कृषी कायदा मागे घेण्याचं आवाहन केलं. कृषी कायदे मागे घेतलं नाही तर कृषी व्यवस्थाच उद्ध्वस्त होईल. त्याचा पंजाबच्या प्रत्येक घराला फरक पडेल. परंतु आम्ही पंजाबच्या शेतकऱ्यांना कमजोर होऊ देणार नाही, असं त्यांनी सांगितलं.

कोण आहेत चन्नी?

चरणजीतसिंग चन्नी हे चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. ते अमरिंदर सिंग सरकारमध्ये शिक्षण आणि औद्योगिक प्रशिक्षण मंत्री होते. त्यापूर्वी ते 2015 ते 2016पर्यंत पंजाबमध्ये विरोधी पक्षनेते होते. चरणजीतसिंग चेन्नी हे रामदासिया शीख समुदायातील आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग सरकारमध्ये ते 16 मार्च 2017मध्ये वयाच्या 47व्या वर्षी कॅबिनेट मंत्री झाले होते. चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघातून ते तिसऱ्यांदा आमदार झाले होते. चरणजितसिंह चन्नी हे दलित समुदयातून आहेत आणि कॅप्टन अमरींदरसिंह यांचे कडवे विरोधक मानले जातात.

इतर बातम्या

चरणजीतसिंग चन्नी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, सोबत दोन मंत्र्यानाही दिली शपथ; पुढचा प्लॅन काय?

…तर राखी सावंतही महात्मा गांधी झाली असती, यूपी विधानसभेच्या सभापतींच्या वक्तव्याने वाद

(Former Punjab CM Capt. Amarinder Singh should join NDA; Ramdas Athawale’s offer)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.