Rajasthan Crime : घरमालकाला ‘हनीट्रॅप’मध्ये फसवले; तीन महिलांसह चौघांना अटक
हनीट्रॅपमध्ये घरमालक बिल्लू सैनीची 15 लाखांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. रसाळ, मीरा, ममता आणि रामप्रसादने बिल्लू सैनीकडून 15 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. हे पैसे देण्यास नकार दिल्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.
जयपूर : राजस्थानमध्ये एका ‘हनीट्रॅप’चा पर्दाफाश झाला आहे. दौसाच्या पोलिसांनी एक अशा ठग महिलेला अटक केली आहे, जी लोकांना आपल्या प्रेमपाशात अडकवून त्यांना आर्थिक गंडा घालत होती. ती निष्पाप लोकांना आपल्या जाळ्यात खेचून त्यांच्याशी शारिरीक संबंध ठेवायची आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करायची. ज्या लोकांकडून ती पैसे मागायची, त्यातील ज्या लोकांनी तिला पैसे देणे नाकारले, त्यांच्यावर तिने खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. दौसा कोतवाली पोलिस ठाण्याचे एसएचओ लाल सिंह यांनी या धक्कादायक घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गुप्तेश्वर रोड परिसरात राहणाऱ्या बिल्लू सैनी नावाच्या व्यक्तीसोबत ही हनीट्रॅपची घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
हनीट्रॅपमध्ये अडकवणारे चार आरोपी अटकेत
पीड़ित बिल्लू सैनी नावाच्या व्यक्तीची मालकी असलेल्या घरात रायपुरा ब्राह्मणची रहिवासी ममता सैनी नावाची महिला राहत होती. आरोपी ममताने तिच्या ओळखीची आणि गुर्जरबैराडा येथील रहिवासी महिला रसाल आणि रामगड येथील मीरा नावाच्या महिलेला घरी बोलावले. यादरम्यान त्यांच्यासोबत राहणारा संवास गावचा रहिवासी रामअवतार गुर्जरसुद्धा आला. आरोपी ममता सैनीने घरमालक बिल्लू सैनीची रसाळ नावाच्या महिलेशी मैत्री करून दिली. त्या महिलेच्या माध्यमातून बिल्लू सैनी हा प्रेमाच्या जाळ्यात अडकला. त्याने रसाळ नावाच्या महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवले. या संबंधामुळे तो पुरता फसल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपी ममताने त्याच्याकडून पैसे लाटण्यास सुरुवात केली. यावेळी तिने बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचे तपासात समोर आले आहे.
हनीट्रॅपमध्ये फसवून मागितले 15 लाख रुपये
हनीट्रॅपमध्ये घरमालक बिल्लू सैनीची 15 लाखांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. रसाळ, मीरा, ममता आणि रामप्रसादने बिल्लू सैनीकडून 15 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. हे पैसे देण्यास नकार दिल्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे बिल्लू सैनी भेदरून गेला व त्याने तत्काळ आपल्या मुलाला बोलावले. त्याने चारही आरोपींना 50 हजार रुपये दिले. उर्वरित साडेचौदा लाख रुपयांची रक्कम देण्यासाठी काही तासांचा वेळ मागितला. मात्र या अवधीत बिल्लू पैसा एकत्र करू शकला नाही. त्यामुळे बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवले जाण्याच्या भितीने बिल्लूने कोतवाली पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि रितसर तक्रार दाखल केली. (Four arrested including three womens in Honeytrap case in Rajasthan)
इतर बातम्या
Rajasthan Crime: अल्पवयीन मुलीची प्रियकरासोबत आत्महत्या; राजस्थानातील घटना