दुकानदार ग्राहकांना देत होता मूत्र मिसळून ज्यूस, लोकांना कळताच…मग असे घडले की…
Crime news: लोकांनी दुकानात ज्यूस घेतला. त्यानंतर त्यांना चव बदललेली आढळली. लोकांना तो ज्यूसमध्ये मूत्र मिसळत असल्याचे समजले. त्याचा व्हिडिओ बनवला. लोकांनी त्यांची चांगलीच धुलाई केली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संतप्त लोकांना शांत केले.
अनेक जणांना बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्याची सवय असते. परंतु गेल्या काही दिवासांपासून खाद्यपदार्थ, आईस्क्रीममध्ये झालेल्या प्रकारानंतर लोकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. पुण्यात समोसामध्ये गुटखा अन् कंडोम सापडले होते. त्यानंतर मुंबईत आईस्क्रीमध्ये मानवाचे बोट सापडले होते. आता उत्तर प्रदेशातून धक्कादायक बाब समोर आली आहे. एका ज्यूस सेंटरमधून ज्यूसमधून मानवी मूत्र मिसळून दुकानदार ग्राहकांना देत होता. लोकांना ज्यूसची चव बदलल्याचे जाणवले. त्यानंतर स्थानिक लोकांनी त्याला पकडून जाब विचारत चांगलीच धुलाई केली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याकडून मानवी मूत्र जप्त करण्यात आले आहे.
काय आहे प्रकार
उत्तरप्रदेशातील गाझीयाबाद शहरातील ही घटना आहे. या घटनेची माहिती देताना पोलीस अधीक्षक भास्कर वर्मा यांनी सांगितले की, गाझीयाबादमधील लोनी बोर्डरवर खुशी ज्यूस सेंटर आहे. या ठिकाणी दुकानदार आमिर आणि त्याचा अल्पवयीन सहकारी ज्यूसमध्ये मानवी मूत्र टाकत होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले. त्यांनी दुकानदाराची चौकशी केली. परंतु तो उत्तर देऊ शकला नाही. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून मूत्र असलेला एक कॅन जप्त करण्यात आला.
यूपी : गाजियाबाद में जूस में पेशाब मिलाकर कस्टमर्स को पिलाया जा रहा था। दुकान संचालक आमिर और कैफ को पुलिस ने गिरफ्तार किया। दुकान से करीब एक लीटर पेशाब बरामद हुआ। पब्लिक ने दोनों आरोपियों की पिटाई की। pic.twitter.com/cePg6p2YzE
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) September 13, 2024
घटनास्थळी मानवी मूत्र जप्त
लोकांनी दुकानात ज्यूस घेतला. त्यानंतर त्यांना चव बदललेली आढळली. लोकांना तो ज्यूसमध्ये मूत्र मिसळत असल्याचे समजले. त्याचा व्हिडिओ लोकांनी बनवला. काही जणांनी त्या दोघांची चांगलीच धुलाई केली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संतप्त लोकांना शांत केले. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी दुकानातून एक लिटर मानवी मूत्र जप्त केले. तसेच मूत्राचा नमून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस अटक करण्यात आली आहे. तो दुकानदार ज्यूसमध्ये मानवी मूत्र का मिसळत होता? तो कधीपासून हा प्रकार करत होता? त्याची चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.