शौर्य पुरस्कार 2022: प्रजासत्ताक दिनानिमित्त 939 जवानांच्या धैर्याला देश करणार सलाम
प्रजासत्ताक दिनानिमित्त शौर्य पुरस्कार मिळविण्याऱ्या विजेत्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी 939 पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या धाडसाबद्दल शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यामधील 189 गौरवमूर्तींना पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे.
दिल्लीः प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) शौर्य पुरस्कार (Gallantry Award) मिळविण्याऱ्या विजेत्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी 939 पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या धाडसाबद्दल शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यामधील 189 गौरवमूर्तींना पोलीस पदक (Police Medal) जाहीर करण्यात आले आहे. तर 88 जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक (PPM) आणि 662 जणांना उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस पदक (PM) देण्यात येणार आहे. पोलीस पदक प्राप्त 189 शौर्यवीरांपैकी 134 जवानांना जम्मू आणि काश्मीर प्रदेशातील त्यांच्या शौर्याबद्दल गौरविण्यात येत आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाच्या सुरक्षेत अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या शूर सैनिकांना शौर्य पुरस्काराने गौरविले जाते. पोलीस पदकासाठी छत्तीसडमधील त्यांच्या अतुलनीय कार्यासाठी 10 जण, दिल्लीतील 3, झारखंडमधील 2, मध्य प्रदेशचे 3 मणिपूर, उत्तर प्रदेशमधील 1 आणि ओरिसामधील धैर्यासाठी 9 जणांना पोलीस पदकाने गौरविण्यात येणार आहे. यावेळी पुरस्कारामध्ये केंद्रीय राखीव दलातील 30 पोलिसांचा समावेश आहे, तर शस्त्रात सीमा दलातील 3 जवानांना पोलीस पदक प्रदान केले जाणार आहे.
तुरुंग अधिकाऱ्यांचाही गौरव
प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या शौर्य पुरस्कार प्रदान सोहळ्यात तुरुंग अधिकाऱ्यांनाही सेवा पुरस्कार दिला जाणार आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. 26 जानेवारीच्या राजपथावरील संचलनाअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय समर स्मारकामध्ये देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांना अभिवादन करून देशाला संबोधित करणार आहेत. त्यानंतर तिबेट सीमा दलातील पुरुषांची तुकडी आणि महिलांची तुकडी दुचाकीच्या कवायती दाखवणार आहेत.
देशातील विविध राज्यातील यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी आहेत. सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवादी परिसरात आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या सुरक्षा दलातील जवानांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याने जवानांना प्रेरणा मिळणार असल्याची भावना अनेक अधिकारी व्यक्त करतात.
चोवीस तास बारा महिने देशसेवेसाठी सैनिक तैनात
जम्मू-काश्मिरम परिसरात नेहमीच दहशतवादी कारवाया आणि गोळीबार होत असतो. या ठिकाणी असणाऱ्या सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांवर चोवीस तास बारा महिने युद्धजन्य परिस्थित सामना करावा लागतो. जॉर्ज फर्नांडीस केंद्रीय संरक्षण मंत्री असताना या पुरस्कार समारंभानंतर त्यांनी आपली भावना व्यक्त करताना म्हणाले होते की, शौर्य पुरस्काराने ज्यावेळी सुरक्षा व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांचा गौरव होतो त्यावेळी त्यांच्याप्रती असणारी भावना या पुरस्काराच्यानिमित्ताने देशाला व्यक्त करता येते. त्यामुळे अतुलनीय कामगिरी करणाऱ्या प्रत्येक जवानाबद्दल देशातील नागरिकांना अभिमान मनात राहतो तो, त्याला या पुरस्कारामुळे आणखी उर्जा मिळेत अशी भावना अधिकारी, मंत्री आणि देशातील नागरिक व्यक्त करत असताता.
संबंधित बातम्या
महापालिकेच्या निवडणुकीबाबत Mumbai मध्ये आज भाजप कार्यकरिणीची बैठक
टेलिकॉम युजर्ससाठी महत्त्वाची बातमी, प्रीपेड प्लॅन्स पुन्हा महागणार
Kharif Season : खरिपातील शेतीमालाची आवक वाढली, आता दर्जानुसार मिळणार दर