Moosewala Murder:पंजाबच्या जेलमध्ये गँगवॉरचा धोका, सिद्धू मुसेवालाच्या ह्त्येनंतर गँगस्टर्सच्या एकमेकांना धमक्या, सरकार अलर्टवर
चंदीगड – पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Panjabi singer Siddhu Moosewala) याच्या हत्याकांडानंतर आता पंजबाच्या जेलमध्ये गँगवॉर (gang war in Jail)होण्याचा धोका निर्माण झाला आहे. गँगस्टर ग्रुप एकमेकांना य हत्येनंतर धमक्या देत आहेत. यामुळे सरकारही सतर्क झाले (Punjab Government)असून प्रसिद्ध अधिकारी हरप्रीत सिंद्धू यांच्याकडे जेलचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. हरप्रीत आत्तापर्यंत ड्रग्जच्या विरोधात कारवाई करणाऱ्या स्पेशल […]
चंदीगड – पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Panjabi singer Siddhu Moosewala) याच्या हत्याकांडानंतर आता पंजबाच्या जेलमध्ये गँगवॉर (gang war in Jail)होण्याचा धोका निर्माण झाला आहे. गँगस्टर ग्रुप एकमेकांना य हत्येनंतर धमक्या देत आहेत. यामुळे सरकारही सतर्क झाले (Punjab Government)असून प्रसिद्ध अधिकारी हरप्रीत सिंद्धू यांच्याकडे जेलचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. हरप्रीत आत्तापर्यंत ड्रग्जच्या विरोधात कारवाई करणाऱ्या स्पेशल टास्क फोर्समध्ये कार्यरत होते. सिद्धू मुसेवाला याची २९ मे रोजी संध्याकाळच्या सुमारास मानसामध्ये गोळ्या मारुन हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स गँगने स्वीकारली होती. त्यानंतर आता सिद्धू याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अनेक गँगस्टर्सही पुढे सरसावले आहेत. राज्यात भगवंत मान यांचे आपचे सरकार सत्तेत आल्यानंतर, सिद्धू याच्या हत्येने पंजाब अद्यापही सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. त्यात राजकारण, गुन्हेगारी आणि गँगस्टर्स यांचे मोठे नेक्सस यानिमित्ताने समोर येईल की काय, अशी शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती राज्यात असल्याचे बोलले जात आहे.
मुसेवालाच्या हत्येनंतर गँगस्टर सक्रिय
मुसेवाला याच्या हत्येनंतर आता सोशल मीडियावरुन गँगस्टर एकमेकांना धमक्या देत आहेत. मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्सच्या गँगने घेतली होती. त्यानंतर गँगस्टर दविंदर बंबीहा आणि गँगस्टर विकी गौंडर गँग यांनी या हत्येचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. मुसेवालाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दिल्ली आणि हरियाणातील गँगस्टरही सक्रिय झाल्याची माहिती आहे, गँगस्टर नीरज बवाना, भूप्पी राणा, कौशल चौधरी यांनीही मुसेवालाच्या हत्येचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. त्यांच्या निशाण्यावर लॉरेन्स गँग आहे.
फिरोजपूर जेलमध्ये झाली चकमक
पंजाबच्या फिरोजपूर गँगमध्ये काल गँगस्टरच्या टोळ्या एकमेकांना भिडल्या आहेत. जेलमध्ये दोन गटांत सिद्धू मुसेवाला याच्या हत्येवरुन वाद झाला. एका गटाने ही हत्या योग्य होती असे म्हटले, दुसऱ्याने नकार दिला. त्यानंतर दोन्ही गटात हिंसा झाली. मात्र उच्च सुरक्षा असलेल्या जेलमध्ये घडलेल्या या प्रकाराबाबत अधिकाऱ्यांनी गुप्तता बाळगली आहे. यातील एक गट हागँगस्टर मनप्रीत मन्ना याचा होता असे सांगण्यात येते आहे. याच मनप्तीची कोरोला गाडी मुसेवाला हत्याकांडातील शार्प शूटर्सनी वापरल्याची चर्चा आहे.
जेलमध्ये सातत्याने सापडतायेत मोबाईल
पंजाबच्या जेलमधून सात्तयाने मोबाईल जप्त करण्यात येत आहेत. पोलिसांच्या मदतीने सर्व जेलमध्ये यासाठी सर्च ऑपरेशन राबवण्यात येते आहे. त्यानंतरही मोबाईल सापडणे अद्याप थांबलेले नाही. मोबाईलच्या माध्यमातून जेलमधून गँगस्टर्स आपली बाहेर असलेली गँग चालवित आहेत. त्याना पुढे कुणाला मारायचे आहे हे सांगतायेत.