वरमाला घातली, दोन फेरे झाले…त्यानंतर मुलीने दिला लग्नास नकार? काय आहे कारण?

marriage story : अनेक लग्न तुम्ही पाहिली असणार. परंतु लग्नातील वाद पाहण्याचा प्रसंग विरळच असतो. एका लग्नाची अर्धवट ही काहणी आहे. दोन फेरे झाल्यावर मुलीने केला लग्नास विरोध केला. मग लग्न मंडपात निरव शांतता पोहचली.

वरमाला घातली, दोन फेरे झाले...त्यानंतर मुलीने दिला लग्नास नकार? काय आहे कारण?
Follow us
| Updated on: May 21, 2023 | 9:55 AM

सीतामढी : मंगलाष्टके झाली… वधूवरांनी वरमाला घातली होती…त्यानंतर फेरे सुरु झाले… ब्राम्ह्यण मंत्र म्हणत होते दोन फेरे झाले…अचानक काय झाले वधूने मी लग्न करणार नसल्याचे सांगितले. सर्वत्र शांतता पसरली…कोणाला काय बोलवे हे समजेना. मुलीच्या घरच्यांनीही तिला समजवण्याचा प्रयत्न केला. पण मुलगी ऐकायला तयार नव्हती. मग वराने विचारले अचानक काय झाले, तर नवरी म्हणाली की मला तू आवडत नाहीस. मी लग्न करू शकत नाही. हे प्रकरण बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील सोनवर्षा परिसरातील.

काय आहे प्रकरण

17 मे रोजी मिरवणूक वरात आली. वधू पक्षाकडून वरातीचे जोरदार स्वागत करण्यात आले. मग त्यानंतर सर्व धार्मिक रितीरिवाज सुरु झाले. मंगलाष्टके झाली… वधूवरांनी वरमाला घातली होती..वराला पुष्पहार घातल्यानंतर वधू मंचावरून खाली उतरली आणि परत गेली. दरम्यान, वधूने तिच्या कुटुंबीयांना सांगितले की, मला त्या मुलाशी लग्न करायचे नाही.

हे सुद्धा वाचा

पुन्हा तयार झाली वधू

घरच्यांनी समजवल्यानंतर वधू लग्न मंडपात आली. त्यानंतर फेरे सुरु झाले. सात फेऱ्यांपैकी वरासोबत तिने दोन फेरेही घेतले. पण, यानंतर पुन्हा तिने आपण हे लग्न करणार नसल्याचे सांगितले. यापुढे फेरे घेणार नसल्याचे सर्वांसमोर जाहीर केले.

काय दिले कारण

मुलगा काळा आहे आणि मी त्याच्याशी लग्न करणार नाही. वधूचे हे वाक्य ऐकल्यानंतर लग्न मंडपात शांतता पसरली. वधूने नकार दिल्यानंतर दोन्ही बाजूने चर्चा सुरु झाली. दरम्यान, लग्नसोहळ्यात सहभागी गावातील ज्येष्ठांसह इतर लोकांनी वधूची समजूत काढण्यास सुरुवात केली. तासनतास समजूवल्यानंतरही मुलगी तयार झाली नाही.

मग भेटवस्तूची मागणी

मुलीच्या बाजूच्या लोकांनी भेटवस्तू आणि दिलेल्या पैशांची मागणी सुरू केली. मुलाच्या वडिलांनी भावूकपणे सांगितले की, लग्न चार महिन्यांपूर्वीच ठरले होते. अचानक काय झाले? मुलीचे कोणाशी तरी अफेअर असल्याचे ऐकले आहे, त्यामुळे लग्न मोडले असल्याचे सांगितले. मग दोन्ही बाजूंचा वाद पोलिसांत गेला. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर प्रकरण शांत झाले. एका अर्धवट लग्नाची चर्चा परिसरात चांगलीच झाली.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.