Lakhimpur Kheri Gangrape : संतापजनक ! अनैतिक संबंधांना विरोध दर्शवला, मोठ्या बहिणीने लहान बहिणीवर सामूहिक बलात्कार घडवून आणला

बलात्कारानंतर पीडितेची गळा आवळून हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह शेतावर फेकून आरोपींनी तेथून पळ काढला. याप्रकरणी मोठ्या बहिणीसह एकूण सात आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कुटुंबीयांच्या चौकशीदरम्यान पोलिसांना मोठ्या बहिणीचा संशय आला. त्यानंतर तिची कसून चौकशी केली असता प्रकरणाचे बिंग फुटले.

Lakhimpur Kheri Gangrape : संतापजनक ! अनैतिक संबंधांना विरोध दर्शवला, मोठ्या बहिणीने लहान बहिणीवर सामूहिक बलात्कार घडवून आणला
गोंदियात नाल्यात चार जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 9:26 PM

उत्तर प्रदेश : नात्याला काळिमा फासणारी एक घटना 29 जून रोजी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधांना विरोध केल्याने मोठ्या बहिणीने आपल्या चार प्रियकरांकडून आपल्या धाकट्या बहिणीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) घडवून आणल्याची संतापजनक आणि क्रूर घटना लखीमपूर खेरी येथे घडली आहे. बलात्कारानंतर पीडितेची गळा आवळून हत्या (Murder) करण्यात आली. त्यानंतर मृतदेह शेतावर फेकून आरोपींनी तेथून पळ काढला. याप्रकरणी मोठ्या बहिणीसह एकूण सात आरोपींना पोलिसांनी बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. कुटुंबीयांच्या चौकशीदरम्यान पोलिसांना मोठ्या बहिणीचा संशय आला. त्यानंतर तिची कसून चौकशी केली असता प्रकरणाचे बिंग फुटले.

मोठ्या बहिणीच्या अनैतिक संबंधांना पीडितेचा विरोध होता

मोठ्या बहिणाचे गावातील चार-पाच मुलांशी अनैतिक संबंध होते. ही बाब लहान बहिणीला माहित होती. लहान बहिण मोठ्या बहिणीच्या या संबंधांना विरोध दर्शवत होती. याचाच राग मनात धरुन मोठ्या बहिणीने लहान बहिणीविरोधात कट रचला. एक दिवस तिने बहिणीला शेतावर बोलावले. तिथे तिचे चार प्रियकर आधीच उपस्थित होते. चौघांनी आधी तरुणीसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यावर मोठ्या बहिणीने धाकट्या बहिणीचा एक हात तर तिच्या दुसऱ्या साथीदाराने दुसरा हात धरला. यानंतर चौघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. गँगरेपनंतर मोठ्या बहिणीने पीडितेचा तिच्याच ओढणीने गळा आवळला. यावेळी पीडितेला स्वतःचा बचाव करण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला. पीडितेचा मृतदेह शेतात टाकून सर्व जण घरी गेले.

बहिणीसह सात आरोपी गजाआड

दुसऱ्या दिवशी उसाच्या शेतात एका मुलीचा मृतदेह पडलेला आढळून आला. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करत मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. चौकशीनंतर मुलीची ओळख पटवण्यास पोलिसांना यश आले. पोलिसांकडून मुलीच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान मुलीची मोठी बहीण घाबरलेली दिसत होती. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी तिची कसून चौकशी केली. चौकशीत मोठ्या बहिणीने आपल्या चार प्रियकरांसोबत मिळून लहान बहिणीवर सामूहिक बलात्कार घडवून आणल्याचे पोलिसांना सांगितले. हे ऐकून पोलीसही काही काळ चक्रावून गेले. याप्रकरणी पोलिसांनी मोठ्या बहिणीसह तिचे चार प्रियकर आणि पहारा देणारे तिघांना अटक केली आहे. (Girl murder after gang assualt in up for opposed to immoral relation of sister)

हे सुद्धा वाचा

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.