Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Goa Election | नाना पटोले यांच्याशी झालेल्या भेटीचा फोटो tweet करताना संजय राऊत म्हणतात, हम…

महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडी सरकारची शक्यता मावळल्याची चिन्ह होती. त्यानंतर गोवा निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने युती केली आहे.. मात्र आता काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांच्या नेत्यांच्या भेटीमागील प्रयोजन नेमके काय आहे, यावर चर्चांना उधाण आले आहे.

Goa Election | नाना पटोले यांच्याशी झालेल्या भेटीचा फोटो tweet करताना संजय राऊत म्हणतात, हम...
संजय राऊत आणि नाना पटोले यांची पणजी येथे भेट
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 2:33 PM

पणजी | महाराष्ट्र काँग्रेस आणि गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज पणजी येथे भेट झाली. तब्बल दीड तास चाललेल्या या चर्चेत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, या बाबत आता आडाखे बांधले जात आहे. गोवा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या भेटीला अधिक महत्त्व आहे. विशेष म्हणजे या भेटीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेले ट्वीटदेखील जास्त सांकेतिक आहे. त्याचेही वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. गोव्यात काँग्रेसने विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election) स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने काँग्रेससमोर युतीचा पर्याय ठेवला होता. मात्र काँग्रेसने तो नाकारला. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडी सरकारची शक्यता मावळल्याची चिन्ह होती. त्यानंतर गोवा निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने युती केली आहे.. मात्र आता काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांच्या नेत्यांच्या भेटीमागील प्रयोजन नेमके काय आहे, यावर चर्चांना उधाण आले आहे.

संजय राऊतांचे ट्वीट काय?

पणजी येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी ट्वीट केले. या ट्वीटमध्ये त्यांनी या भेटीचा फोटो शेअर केला असून फक्त ‘हम’.. एवढा एकच शब्द लिहिला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने युती केली असून काँग्रेस स्वबळावर लढत आहे. मात्र संजय राऊत यांच्या या ट्वीटचा अर्थ काय निघेल, काँग्रेसला शिवसेनेचा पाठींबा असेल का, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

भेटीबाबत नाना पटोले काय म्हणाले?

गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या भेटीत नेमक्या कोणत्या मुदद्यांवर चर्चा झाली, याबद्दल सांगितले. ते म्हणाले, ‘केंद्र सरकार ज्या पद्धतीने सूड बुद्धीने राजकारण करते आहेत, त्यावर आमच्यात चर्चा झाला. केंद्र सरकारला उत्तर कसं द्यायचं त्याची एक रणनीती आम्ही तयार केली. केंद्राच्या सूड बुद्धीच्या राजकारणाला उत्तर देण्याची भूमिका काय असेल यावर आम्ही बराच वेळ चर्चा केली.’ दरम्यान, आज मुंबईत राष्ट्रवादी नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे एकाच गाडीत प्रवास करताना दिसले, त्यावरही प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले, दोन पक्षातले नेते एकत्र आलेत, त्याला वेगळेच समीकरण म्हणता येणार नाही. या दोन नेत्यांच्या एकत्र असण्यात काँग्रेसचा नेताही हवा होता, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी व्यक्त केली.

संजय राऊत या भेटीबाबत काय म्हणाले?

नाना पटोले गोव्यात विवांता हॉटेलमध्ये थांबल असून तेथेच त्यांची आणि संजय राऊत यांची भेट झाली. या भेटीबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘होय आमची गोव्यात भेट झाली. माझ्यासोबत काँग्रेसचे नेते अतुल लोंढे हेदेखील उपस्थित होते. पण आम्ही महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा केली. या भेटीमुळे पक्षांतर्गत आहेत, ती समीकरणं अधिक घट्ट झाली आहेत. गोव्यात काँग्रेसचे पूर्णपणे राज्य येईल, अशी शक्यता आहे. नाना पटोले आणि माझ्यात दीड तास चर्चा झाली. आम्ही अनेक विषयांवर बोललो. नाना पटोले एक पूर्णपणे वेगळे व्यक्तिमत्त्व आहे. मी आणि नाना दोन वेगळे व्यक्तीमत्त्व एकत्र येतील तेव्हा आणखी एक वेगळे व्यक्तीमत्त्व तयार होईल.’

इतर बातम्या-

Skoda Slavia डीलर शोरूम्समध्ये दाखल, 11000 रुपयांत करा बुकिंग, पाहा कशी आहे नवी सेडान

आजोबा जोमात, पाहणारे कोमात! आयपीएस अधिकाऱ्यानं Share केलेला ‘हा’ Dance video होतोय Viral

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.