Goa Assembly Election : काँग्रेसकडून पहिली यादी जाहीर, वाचा कुणाला मिळाली संधी?
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आता काँग्रेसकडून 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलीय. त्यात म्हापसा, ताळगाव, फोंडा, मुरगाव, कुडतरी, मडगाव, कुंकळ्ळी, केपे या मतदारसंघांचा समावेश आहे.
पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election) रणधुमाळी आता सुरु झाली आहे. या निवडणुकीसाठी आता काँग्रेसकडून (Congress) 8 उमेदवारांची पहिली यादी (Candidate List) जाहीर करण्यात आलीय. त्यात म्हापसा, ताळगाव, फोंडा, मुरगाव, कुडतरी, मडगाव, कुंकळ्ळी, केपे या मतदारसंघांचा समावेश आहे. दरम्यान, सर्वात आधी उमेदवार घोषित करुन काँग्रेसनं आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
काँग्रेसकडून कोणत्या मतदारसंघात कुणाला संधी?
म्हापसा – सुधीर कानोळकर ताळगाव – टोनी रॉड्रिग्ज फोंडा – राजेश वेर्णेकर मुरगाव – संकल्प आमोणकर कुडतरी – आलेक्स रेजिनाल्ड मडगाव – दिगंबर कामत कुंकळ्ळी – युरी आलेमाव केपे – एल्टन डिकास्टा
काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट
काँग्रेसने उमेदवार घोषित केले, याचा अर्थ काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. गेल्या आठवड्यात संजय राऊत हे राहुल गांधींना भेटले होते. तेव्हा गोव्यावर चर्चा झाल्याचं ते म्हणाले होते. पण या यादीमुळे काँग्रेस शिवसेनेसोबत जाणार नसल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीनं आपला पक्ष दोन दिवसांपूर्वी टीएमसीत विलीन केला आहे. चर्चिल आलेमाव हे तांत्रिकदृष्ट्या टीएमसीचे गोवा विधानसभेतील पहिले आमदार झाले आहेत.
गोव्यात काँग्रेस 4 वर्षात 17 वरून 3 आमदारांवर!
4 वर्षापूर्वी झालेल्या गोव्याच्या निवडणुकीत जवळपास 17 आमदार निवडून आलेल्या काँग्रेसला राज्य चालवण्याची संधी आली होती. मात्र हा घास भाजपाने हिरावून घेतला. आज त्याच काँग्रेसची अवस्था 17 आमदारांवरून केवळ 3वर आलीय. काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी आठवडाभरापूर्वी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या वर्षी ऑक्टोबरमध्ये गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइझिन्हो फालेरो यांनी काँग्रेस आमदारपदाचा राजीनामा दिला आणि नंतर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्ये ते सहभागी झाले.
नाईक यांच्या राजीनाम्यामुळे राज्याच्या 40 सदस्यीय विधानसभेत काँग्रेसचे संख्याबळ तीनवर आलंय. गोव्यातील पोंडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नाईक यांनी विधानसभा अध्यक्ष राजेश पाटणेकर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यांच्यासोबत त्यांची दोन मुलेही होती, ज्यांनी गेल्या वर्षी सत्ताधारी भाजपामध्ये प्रवेश केला होता.
इतर बातम्या :