Gold Rate | शेअर बाजारात अस्थिरता, मग सोन्याचे दरही वाढलेच की.. पहा आजचे दर!

24 कॅरेट शुद्धता असलेल्या एक तोळा सोन्याचे दर आज 50013 रुपयांपर्यंत पोहोचले. तर 22 कॅरेट शुद्धता असलेल्या सोन्याचे दर 45,996 रुपये झाला आहे. तर एक किलो शुद्ध चांदीचे दरही वाढले असून ते 64133 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

Gold Rate | शेअर बाजारात अस्थिरता, मग सोन्याचे दरही वाढलेच की.. पहा आजचे दर!
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 2:56 PM

नवी दिल्ली| शेअर बाजार आणि सोन्या-चांदीच्या दराचे (Gold and Silver rate) विरुद्ध गणित असते. शेअर बाजारात जोरदार तेजी येते तेव्हा सोने-चांदीसारख्या महागड्या धातूंची किंमत घसरते. मात्र शेअर बाजारात (Share Market) अस्थिरता दिसू लागताच इकडे पारंपरिक आणि कायम विश्वासू गुंतवणुकीचे साधन म्हणून पाहिल्या जाणाऱ्या सोन्या-चांदीचे दर वाढतात. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. त्यामुळे सोन्याचे भावही वाढताना दिसत आहेत. भारतीय सराफा बाजारात शुक्रवारी सोने (Gold rate today) आणि चांदीचे दर वाढलेले दिसून आले. 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा 50, 214 एवढे नोंदवले गेले. तर चांदीच्या दरातही वाढ दिसून आली. एक किलो चांदीचे दर 64,133 रुपयांपर्यंत पोहोचले.

आजचे दर किती?

ibjarates.com नुसार 24 कॅरेट शुद्धता असलेल्या एक तोळा सोन्याचे दर आज 50013 रुपयांपर्यंत पोहोचले. तर 22 कॅरेट शुद्धता असलेल्या सोन्याचे दर 45,996 रुपये झाला आहे. तर एक किलो शुद्ध चांदीचे दरही वाढले असून ते 64133 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

कालच्या तुलनेत आज किती वाढ?

सोन्या-चांदीच्या दरात दररोज चढ-उतार होत असतो. किंबहुना काही मिनिटांच्या अंतरानेही सोन्याच्या दरात घट किंवा वाढ होत असते. पूर्वी सोन्याचे दर दिवसातून दोन वेळाच जाहीर केले जात होते, मात्र आता त्यात सातत्याने बदल होत असतात. आज जारी करण्यात आलेल्या दरांनुसार, कालच्या तुलनेत 24 कॅरेट सोन्याच्या दरात 105 रुपयांनी वाढ झाली. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 96 रुपयाची वाढ झाली. तसेच शुद्ध चांदीच्या दरातही 348 रुपये प्रति किलो अशी वाढ झाली.

सोन्याचे भाव कुठे पाहू शकता?

हल्ली स्मार्ट फोनमुळे सोन्या-चांदीचे दर तुम्हाला घरातूनही पाहता येतात. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्या आणि शनिवार – रविवार वगळला ibja कडून हे दर जाहीर केले जातात. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर काही वेळातच तुमच्या मोबाइलवर सोन्या-चांदीच्या दराचा मेसेज येऊन धडकतो. तसेच आपली माहिती अपडेट ठेवण्यासाठी तुम्ही www.ibja.com किंवा ibjarates.com वरही सोन्या-चांदीचे दर जाणून घेऊ शकता.

इतर बातम्या-

Ranji Trophy: सहा सामन्यात 928 धावा करणाऱ्या मुंबईच्या युवा सर्फराजची सौराष्ट्राविरुद्ध शानदार डब्ल सेंच्युरी

VIDEO: सोमय्या कोर्लईत येताच तणाव, शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने, गोमूत्र आणि दूध शिंपडून शुद्धीकरण

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.