8 वा वेतन आयोगाबाबत पुढील वर्षी येऊ शकते आनंदाची बातमी

8th Pay Commission : सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 7 व्या वेतन आयोगानंतर 8 वा वेतन आयोग आणला जाऊ शकतो. मात्र, याबाबत सरकारकडून कोणतेही औपचारिक वक्तव्य आलेले नाही. पण शक्यता वर्तवली जात आहे की लवकरच आठव्या वेतन आयोगाबाबत कमिटी नेमली जाऊ शकते.

8 वा वेतन आयोगाबाबत पुढील वर्षी येऊ शकते आनंदाची बातमी
Pay Commission
Follow us
| Updated on: Nov 13, 2023 | 11:28 PM

8th Pay commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुढच्या वर्षी खुशखबर येऊ शकते. केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना गुडन्यूज देऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 7व्या वेतन आयोगानंतर 8वा वेतन आयोग आणला जाऊ शकतो. याबाबत सरकारकडून कोणतेही औपचारिक वक्तव्य आलेले नाही. नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत चर्चा सुरू झाली आहे.  पुढील वर्षी मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करू शकते. अशी शक्यता आहे.

८व्या वेतन आयोगाची तयारी सुरू

8 व्या वेतन आयोगाबाबत दिल्लीत कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे आंदोलन सुरू आहे. सरकारने पुढील वेतन आयोगाबाबत परिस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी सरकारी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. सरकारने यावर निर्णय घेतल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात मोठी वाढ होऊ शकते. आतापर्यंत 8 वा वेतन आयोग येणार नाही अशी चर्चा होती. पण, पुढील वेतन आयोगाची तयारी सुरू असल्याची अपेक्षा आहे. मात्र, सरकारकडून याला दुजोरा देण्यात आलेला नाही. याकडे सरकार लक्ष देत असल्याचे सरकारी सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार 2024 मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी नवीन वेतन आयोग स्थापन करण्याबाबत चर्चा होऊ शकते. मात्र, पुढील वर्षी वेतन आयोग कधी स्थापन होण्याची शक्यता आहे, हे सांगणे घाईचे ठरेल. 8 वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळू शकतो. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, वेतन आयोगासाठी कोणतेही पॅनल तयार करण्याची गरज नसावी याच्या बाजूने सरकार आहे. त्यापेक्षा वेतन आयोगातच वेतन सुधारणेचे नवे सूत्र असावे. यावर सध्या विचार सुरू आहे.

आठवा वेतन आयोग कधी येणार?

सूत्रांच्या माहितीनुसार 2024 मध्ये 8 वा वेतन आयोग स्थापन केला जावू शकतो. त्याचबरोबर दीड वर्षात त्याची अंमलबजावणी होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, असे झाल्यास केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. 7 व्या वेतन आयोगाच्या तुलनेत 8 व्या वेतन आयोगात अनेक बदल शक्य आहेत. फिटमेंट फॅक्टरच्या बाबतीतही काही बदल होऊ शकतात. आत्तापर्यंत सरकार 10 वर्षांतून एकदा वेतन आयोग स्थापन करते.

पगार किती वाढणार?

7 व्या वेतन आयोगाच्या तुलनेत 8 व्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांना लॉटरी लागणार आहे. सर्व काही सुरळीत राहिल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी झेप अपेक्षित आहे. कर्मचाऱ्यांचे फिटमेंट फॅक्टर ३.६८ पटीने वाढेल. तसेच फॉर्म्युला काहीही असो, कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ४४.४४% वाढ होऊ शकते. त्यामुळे कर्मचार्‍यांसाठी ही आनंदाची बातमी होती ज्यामुळे कर्मचार्‍यांना आनंद होऊ शकतो.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.