सरकारने सीरम लसीसाठी केली 6.6 कोटींची डील, 200 रुपयांना मिळणार एक डोस
या लसीच्या एका डोसमागे सरकारला 3-4 डॉलर (219-292 रुपये) मोजावे लागणार आहेत. भारतीय उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने सोमवारी यासंबंधी माहिती दिली आहे.
नवी दिल्ली : अॅस्ट्रॅजेनेका (Astrazeneca) आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने (Oxford University) विकसित केलेल्या कोरोनाव्हायरस लसीकरणासाठी (Coronavirus Vaccine) खर्चाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या लसीच्या एका डोसमागे सरकारला 3-4 डॉलर (219-292 रुपये) मोजावे लागणार आहेत. भारतीय उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने सोमवारी यासंबंधी माहिती दिली आहे. जगातील सर्वात मोठी लस उत्पादक एसआयआयकडे (SII) कोविड -19 लस (Covid-19 Vaccine) पूरक पदार्थांचं उत्पादन करण्याचा परवाना आहे आणि त्याने आधीच पाच कोटी डोस तयार केले आहेत. (Government deals with Serum Institute to buy 6 6 crore corona vaccine vaccine to be Rs 200 each)
एसआयआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी (SEO) आदर्श पूनावाला (Adar Poonawala) यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, कंपनी पहिल्या टप्प्यात भारत सरकार आणि जीएव्हीआय देशांमध्ये लसीच्या विक्री सुरुवात करण्यात येईल. त्यानंतर ही लस खासगी बाजारातही विकली जाईल. भारतीय औषध नियामकांनी रविवारी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन आणि कोवाक्सिनच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली.
यासंबंधी माहिती देताना पूनावाला यांनी सांगितलं की, कोरोनाची लस योग्य त्या किंमतीमध्ये सगळ्यांसाठी उपलब्ध व्हावी अशी आमची इच्छा आहे. भारत सरकारला या लसीसाठी अतिशय कमी किंमत मोजावी लागणार आहे. म्हणजेच एका डोसची किंमत 3-4 डॉलर असणार आहे.
कोरोनावर 90 टक्क्यांपर्यंत यशस्वी ‘कोव्हिशिल्ड’!
‘कोव्हिशिल्ड’ या कोरोना लसीनं तिन्ही टप्प्यातील चाचण्या पूर्ण केल्या आहे. चाचण्यांदरम्यान ही लस 90 टक्क्यांपर्यंत यशस्वी ठरली होती. मात्र, महिनाभराच्या अंतरानं या लसीचे 2-3 डोस घेतल्यास ही 95 टक्क्यांपर्यंत यशस्वी ठरते, असं सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावालांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळंच कोरोनाला भारतातून संपवण्यात कोविशिल्ड हे मुख्य हत्यार ठरणार आहे.
‘कोव्हिशिल्ड’ ची किंमत काय असणार?
पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटच ‘कोव्हिशिल्ड’चं उत्पादन करत आहे. सीरममध्ये ‘कोव्हिशिल्ड’चे कोट्यवधी डोस तयार होणार आहे. सीरमचे सीईओ अदर पुनावालांच्या म्हणण्यानुसार, ही लस सरकारला 200 ते 250 रुपयांपर्यंत मिळू शकते, तर खासगी विक्रेत्यांना ही लस 500 ते 600 रुपयांपर्यंत मिळू शकते. मात्र, तुम्हाला ही लस घेण्यासाठी खिशातील एकही रुपया खर्च करण्याची गरज भासण्याची शक्यता कमी आहे. कारण, कोरोना लसीकरण कार्यक्रमांतर्गत सरकारकडून प्रत्येकाला ही लस मोफत दिली जाणार आहे. (Government deals with Serum Institute to buy 6 6 crore corona vaccine vaccine to be Rs 200 each)
संबंधित बातम्या –
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात मी लस टोचणार नाही : शिवराज सिंह चौहान
अखिलेश यादव नंतर आता काँग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्यांना कोरोना लसीवर शंका?, केले गंभीर आरोप
(Government deals with Serum Institute to buy 6 6 crore corona vaccine vaccine to be Rs 200 each)