‘तो’ हॅशटॅग, अकाउंट हटवा, नाही तर कारवाई करू; केंद्राची ट्विटरला फायनल नोटीस

दिल्लीतील ट्रॅक्टर रॅलीनंतर शेतकऱ्यांचा नरसंहार करण्यात आल्याचा हॅशटॅग ट्विटरवरून सुरू होता. (Government issues notice to Twitter, warns of penal action)

'तो' हॅशटॅग, अकाउंट हटवा, नाही तर कारवाई करू; केंद्राची ट्विटरला फायनल नोटीस
ट्विटर
Follow us
| Updated on: Feb 03, 2021 | 4:22 PM

नवी दिल्ली: दिल्लीतील ट्रॅक्टर रॅलीनंतर शेतकऱ्यांचा नरसंहार करण्यात आल्याचा हॅशटॅग ट्विटरवरून सुरू होता. अनेकांनी आपल्या अकाउंटवरून हा हॅशटॅग वापरला. खोटा हॅशटॅग चालवण्याच्या या प्रकाराची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. हा हॅशटॅग आणि ज्या अकाउंटवरून हा हॅशटॅग चालवला गेला त्यावर कारवाई करा, अन्यथा तुमच्यावर कारवाई करू, अशी फायनल नोटीसच केंद्र सरकारने ट्विटरला बजावली आहे. (Government issues notice to Twitter, warns of penal action)

केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाने ट्विटरला ही नोटीस बजावली आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनानंतर ट्विटरवरून #ModiPlanningFarmerGenocide हा हॅशटॅग वापरण्यात आला होता. प्रत्यक्षात असं काहीही घडलेलं नसतानाही हा हॅशटॅग वापरण्यात आला होता. त्याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेऊन ट्विटरकडे तक्रार केली होती. ट्विटरनेही केंद्र सरकारच्या तक्रारीनंतर 250 ट्विटर अकाउंट ब्लॉक केले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा हे ट्विटर अकाउंट सुरू करण्यात आले.

केंद्र सरकार संतापले

ट्विटरच्या या निर्णयामुळे केंद्र सरकार भडकले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ट्विटरला फायनल नोटीस पाठवली असून त्यात संबंधित हॅशटॅग आणि अकाउंट ब्लॉक करण्याची सूचना केली आहे. जर ही कारवाई केली नाही तर ट्विटरवर कारवाई करण्यात येणार असल्याचं केंद्राने म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा हवाला

ट्विटरवरील कंटेस्ट पोस्ट तथ्यात्मकरित्या चुकीच्या होत्या. केवळ द्वेष पसरविणे हा त्यामागचा हेतू होता. समाजात तणाव निर्माण करण्यासाठी ठरवून उघडण्यात आलेली ती मोहीम होती. या मोहिमेला काहीच आधार नव्हता, असंही नोटिसीत म्हटलं आहे. ट्विटरने केंद्र सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी करत हा हॅशटॅग हटवून अकाउंटवर कारवाई करावी अन्यथा ट्विटरवर कारवाई करू, असं केंद्राने म्हटलं आहे. यावेळी केंद्राने ट्विटरला सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाची आठवणही करून दिली आहे. त्यात सर्वोच्च न्यायालयाने ट्विटर कोर्टासारखे निर्णय घेऊ शकत नाही, असं म्हटलं होतं. (Government issues notice to Twitter, warns of penal action)

संबंधित बातम्या:

Video : जिंद महापंचायतीचं व्यासपीठ कोसळलं, काहीजण जखमी, ‘व्यासपीठ तर भाग्यवानांचे कोसळतात,’ टिकैत यांची कोटी

जगातील हुकूमशहांची नावं ‘M’वरूनच का सुरू होतात?; राहुल गांधींची खोचक टीका

रेशनकार्ड धारकांना मोठा झटका, रॉकेलवरील सबसिडी बंद, 1 एप्रिलपासून नवा नियम

(Government issues notice to Twitter, warns of penal action)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.