हिजाब विरुद्ध भगवा! कर्नाटकातल्या कुंदापुरातल्या प्रकरणाला भगवं वळण, विद्यार्थ्यांचे जय श्रीरामचे नारे!
कर्नाटकात शाळा-महाविद्यालयांमध्ये हिजाब विरुद्ध भगवा असा वाद निर्माण झाला आहे. शाळांमध्ये हिजाब घालण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. काही ठिकाणी तर बजरंग दलाने विद्यार्थीनींनी भगवा स्कार्फ घालण्याची सक्ती केली आहे.
बेंगळुरू: कर्नाटकात शाळा-महाविद्यालयांमध्ये हिजाब (hijab) विरुद्ध भगवा (saffron scarves)असा वाद निर्माण झाला आहे. शाळांमध्ये हिजाब घालण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. काही ठिकाणी तर बजरंग दलाने (bajrang dal) विद्यार्थीनींनी भगवा स्कार्फ घालण्याची सक्ती केली आहे. तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये जय श्रीरामचे नारेही दिले जात आहेत. कुंदापुरातील शाळा-महाविद्यालयात जय श्रीरामचे नारे दिल्याने वातावरण तंग झालं आहे. उडुपी जिल्ह्याीतल बिंदूर गावातील गव्हर्नमेंट प्री-विद्यापीठ कॉलेजात ही घटना घडली. या घटनेमुळे शाळा आणि महाविद्यालयात एकच खळबळ उडाली आहे. प्राचार्यांनी हिंदू संघटनांना भगवा स्कार्फ परिधान करण्याची मोहीम मागे घेण्याची विनंती केली आहे. मात्र, हिंदू संघटना अधिकच आक्रमक झाल्याने शाळेतील वातावरण अधिकच तंग झालं आहे. या वादामुळे कर्नाटक सरकार कर्नाटक एज्युकेशन अॅक्ट 1983चे कलम 133 लागू केले आहे. त्यामुळे सर्वांना समान ड्रेस घालावा लागणार आहे. खासगी शाळा स्वत:चा ड्रेस कोड निवडू शकणार आहेत. तर सरकारी शाळांमध्ये ठरलेला ड्रेसच घालून यावं लागणार आहे. या आदेशामुळे हिजाबचा वाद अधिकच वाढला आहे.
मुस्लिम विद्यार्थीनी काय म्हणाल्या?
आम्ही पूर्वी हिजाब घालूनच शाळा-महाविद्यालयात यायचो. त्यावर पूर्वी कधी वाद झाला नाही. कुणी आक्षेप घेतला नाही. आमच्या घरातील मुलींनीही अशाच प्रकारे शिक्षण घेतलं आहे. मात्र आता हिजाबवर वाद केला जात आहे, असं मुस्लिम विद्यार्थींनींनी म्हटलं आहे. दुसरीकडे एका वर्गाला ड्रेसचा आणि शिक्षणाचं काही घेणं देणं नसल्याचं वाटतं. मात्र, सर्व शाळेत एक समान नियम असावेत असं या वर्गाचं म्हणणं आहे.
काँग्रेस विद्यार्थ्यांमध्ये फूट पाडत आहे
या वादावर भाजपचे नेते सीटी रवी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सर्व शाळेत स्कूल युनिफॉर्म अनिवार्य असावा. काँग्रेसने जाणूनबुजून विद्यार्थ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणावर लक्ष द्यावं असं माझं आवाहन आहे. शिक्षणच त्यांचं भविष्य ठरवेल. एखादा ड्रेस ठरवणार नाही, असं सीटी रवी यांनी म्हटलं आहे.
बजरंग दल काय म्हणतंय
विद्यार्थीनी भगवा स्कार्फ घालून येत असून त्यांना पोलीस कॉलेजात जाण्यापासून मज्जाव करत आहेत. जर भगवा स्कार्फ घालून येणाऱ्या विद्यार्थीनींना महाविद्यालयात प्रवेश मिळत नसेल तर हिजाब घालून येणाऱ्या मुलींनाही महाविद्यालयात प्रवेश देऊ नये, अशी मागणी बजरंग दलाचे जिल्हा सचिव सुरेंद्र कोटेश्वर यांनी केली आहे.
वादाचे मूळ काय?
जानेवारीत उडुपीच्या एका सरकारी महाविद्यालयात सहा विद्यार्थीनींना हिजाब घालून महाविद्यालयात येण्यास मज्जाव करण्यात आला. मात्र, महाविद्यालयाने परवानगी दिली नाही असं सांगितलं गेलं. त्यानंतर हा ट्रेंड निघून गेला. तसेच दुसऱ्या महाविद्यालयातही विद्यार्थीनी हिजाब घालून जाऊ लागल्या. त्याला विरोध म्हणून काही विद्यार्थीनींनी भगवा स्कार्फ घालून महाविद्यालयात जायला सुरवात केली. त्यानंतर त्याला राजकीय वळण मिळालं आणि वादाला सुरुवात झाली.
36 जिल्हे 50 बातम्या | 7 February 2022 pic.twitter.com/xPrkJ9WCc2
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 7, 2022
संबंधित बातम्या:
एअर इंडियाच्या सिनिअर पायलटचा करुण अंत, गॅस गिझर गळतीने बाथरुममध्येच गमावले प्राण