19 लाखांचे हॉटेलचे बिल थकवले, 58 लाखांच्या ऑडीचा लिलाव होणार
चंदीगडमधील एका आलिशान हॉटेलमध्ये 2 व्यक्ती थांबले होते. त्यांनी सहा महिने खूप मजा केली. सहा महिन्यांचे बिल 19 लाख रुपये झाले. परंतु बिल भरण्याची वेळ आली तेव्हा पसार होण्याचा प्रयत्न केला.
चंदीगड : चंदीगडमध्ये हॉटेलच्या बिलाच्या वसुलीचे एक रंजक प्रकार समोर आला आहे. चंदीगडमधील एका आलिशान हॉटेलमध्ये 2 व्यक्ती थांबले होते. त्यांनी सहा महिने खूप मजा केली. सहा महिन्यांचे बिल 19 लाख रुपये झाले. परंतु बिल भरण्याची वेळ आली तेव्हा पसार होण्याचा प्रयत्न केला. हॉटेल व्यवस्थापनाने त्यांची आलिशान ऑडी आणि क्रूझ गाडी जप्त केली. त्याची किंमत 58 लाख आहे. या घटनेला पाच वर्षे उलटून गेली तरी दोघेही वाहने घेण्यासाठी आले नाहीत. आता चंदीगड औद्योगिक आणि पर्यटन विकास महामंडळ 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेला या दोन्ही लक्झरी वाहनांचा लिलाव करणार आहे.
काय आहे प्रकार
चंदिगडच्या पॉश सेक्टर 17 मध्ये शिवालिक व्ह्यू नावाने चार तारांकित हॉटेल आहे. 2018 मध्ये अश्विनी कुमार चोप्रा आणि रमणिक बन्सल नावाचे दोन ग्राहक येथे आले. ते सहा महिने हॉटेलमध्ये राहिले. त्यांनी हॉटेलच्या प्रत्येक सुविधेचा आनंद लुटला. त्यांनी चेक आउट केल्यावर हॉटेलने त्यांना 19 लाखांचे बिल दिले. हे बिल बघून दोघांची पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र हॉटेलच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना पकडले. त्यानंतर त्याला बिल भरण्यास सांगण्यात आले. परंतु त्यांनी बिल भरले नाही. यामुळे त्यांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या.
धनादेश बाऊन्स
गाड्या जप्त केल्यावर बिलाच्या नावावर प्रत्येकी 6 लाखांचे तीन धनादेश त्यांनी दिले. हॉटेलने हे धनादेश बँकेत जमा केले असता ते बाऊन्स झाले. त्यानंतर हॉटेलने त्यांची ऑडी Q3 आणि शेवरलेट क्रूझ जप्त केली. या घटनेला पाच वर्षे उलटून गेली तरी ते वाहने परत घेण्यासाठी आले नाहीत. आता हॉटेलने त्यांची विक्री करण्याचा निर्णय घेतला.
प्रकरण न्यायालयात
2020 मध्ये हे प्रकरण चंदीगड जिल्हा न्यायालयात गेले. न्यायालयाने कार मालक रमणिक बन्सल यांना समन्स पाठवले. परंतु ते परत आले.गाडीच्या आरसी बुकच्या आधारे दुसऱ्या कार मालकाला समन्स बजावण्यात आले होते, परंतु तोही हजर झाला नाही. गेल्या तीन वर्षांपासून ते संबंधित पत्त्यावर राहत नसल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात पीबी 10 सीएफ 0009 कार अश्विनी कुमार चोप्राच्या नावावर नोंदवण्यात आली होती. तर PCL 0082 ची नोंदणी रमणिक बन्सल यांच्या नावावर करण्यात आली होती. आता या दोन्ही गाड्यांचा लिलाव करुन हॉटेलचे बिल देण्यात येणार आहे. म्हणजे चार आने की मुर्गी 12 आने का मसाला असा हा प्रकार झाला आहे.