Gujrat Love Jihad : हायकोर्टाचा मोठा निर्णय, केवळ लग्न केलं म्हणून गुन्हा दाखल होऊ शकत नाही!

Gujrat Love Jihad : मुलीला फसवून किंवा जबरदस्तीने लग्नासाठी तयार केलं हे जोपर्यंत सिद्ध होत नाही, तोपर्यंत गुन्हा दाखल होऊ शकत नाही असं हायकोर्टाने सांगितलं. आंतरधर्मीय विवाहावर बंधन नाही, पण जबरदस्ती लग्न करुन धर्मांतर करण्यावर निर्बंध असेल असा युक्तीवाद गुजरात सरकारने केला होता.

Gujrat Love Jihad : हायकोर्टाचा मोठा निर्णय, केवळ लग्न केलं म्हणून गुन्हा दाखल होऊ शकत नाही!
court
Follow us
| Updated on: Aug 19, 2021 | 4:21 PM

अहमदाबाद : हायकोर्टाने गुजरात सरकारला धक्का दिला आहे. केवळ आंतरधर्मीय विवाह केला म्हणून ‘लव जिहाद’बाबत गुन्हा दाखल होऊ शकत नाही असं गुजरात हायकोर्टाने  (Gujrat High Court) ठणकावून सांगितलं आहे. इतकंच नाही तर गुजरातमधील भाजप सरकारने आणलेल्या गुजरात धर्म स्वतंत्रता (संशोधन) विधेयकातील काही नियमांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. नुकतंच काही दिवसापू्र्वी हायकोर्टाने या विधेयकावरील सुनावणीनंतर राज्य सरकारला नोटीस पाठवली होती.

मुलीला फसवून किंवा जबरदस्तीने लग्नासाठी तयार केलं हे जोपर्यंत सिद्ध होत नाही, तोपर्यंत गुन्हा दाखल होऊ शकत नाही असं हायकोर्टाने सांगितलं. आंतरधर्मीय विवाहावर बंधन नाही, पण जबरदस्ती लग्न करुन धर्मांतर करण्यावर निर्बंध असेल असा युक्तीवाद गुजरात सरकारने केला होता.

त्यावर कोर्टाने केवळ आंतरधर्मीय लग्न केलं म्हणून ‘लव्ह जिहाद’ नाव देऊन त्याआधारे गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, असं म्हटलं. हा विवाह जोर-जबरदस्तीने झालाय, किंवा कोणत्यातरी आमिषाने झालाय हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्याबाबत पोलिसात गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, असं म्हणत कोर्टाने अधिनियम 3, 4, 5 आणि 6 मधील सुधारणा लागू करण्यास स्थगिती दिली.

गुजरात सरकारला नोटीस

जोर जबरदस्तीने आंतर धर्मीय लग्न केल्यास गुन्हा दाखल करणारं विधेयक गुजरात सरकारने आणलं होतं. लग्नानंतर जबरदस्तीने किंवा फसवणुकीने धर्मांतराचा निषेध करुन कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर 6 ऑगस्टला सुनावणी झाली. मुख्य न्यायाधीश विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती बीरेन वैष्णव यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने आपलं म्हणणं मांडण्यासाठी गुजरात सरकारला नोटीस पाठवली.

गुजरातमधील धर्म स्वतंत्रता (संशोधन) विधेयक 2021 विरुद्ध याचिका जमीयत उलेमा-ए-हिंद गुजरात शाखेने दाखल केली होती. हे विधेयक 15 जूनपासून अधिसूचित केलं होतं.

संबंधित बातम्या  

न्यायाधीश बीव्ही नागराथन होणार भारताच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश?; कॉलेजियमकडून 9 न्यायाधीशांची शिफारस

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.