Video : बसच्या चाकाखाली येऊनही दुचाकीस्वार वाचला, काळजाचा ठोका चुकवणारा अपघात

व्हिडीओ पाहिल्यानंतर कुणालाही वाटेल की या अपघातातला दुचाकीस्वार नक्कीच मृत पावला असेल, पण अपघातातला दुचाकीस्वार आश्चर्यकारित्या बचावला आहे. गुजरातमधील दाहोद इथून एक हृदयद्रावक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ एका दुचाकीस्वाराचा आहे, जो अपघातात थोडक्यात बचावतो.

Video : बसच्या चाकाखाली येऊनही दुचाकीस्वार वाचला, काळजाचा ठोका चुकवणारा अपघात
गुजरातच्या दाहोद येथील अपघात....
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 4:00 PM

मुंबई : व्हिडीओ पाहिल्यानंतर कुणालाही वाटेल की या अपघातातला दुचाकीस्वार नक्कीच मृत पावला असेल, पण अपघातातला दुचाकीस्वार आश्चर्यकारित्या बचावला आहे. गुजरातमधील दाहोद इथून एक हृदयद्रावक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ एका दुचाकीस्वाराचा आहे, जो अपघातात थोडक्यात बचावतो. काही तासांत या व्हिडीओ हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

गुजरातच्या दाहोद जिल्ह्यात महामार्गावर एका तरुणाला बसने धडक दिली. या जोरदार धडकेतही तो सुखरूपपणे बचावला. दुचाकी बसला धडकली आणि दुचाकी 10 फूट पुढे गेली आणि दुचाकीस्वार बसखाली आला. पण तो दुचाकीस्वार भाग्यवान होता. बसच्या चालकाने पूर्ण वेगाने धावणाऱ्या बसचे ब्रेक वेळेवर लावले, अन्यथा चाकांखाली येणाऱ्या तरुणाला आपल्या आयुष्याला मुकावं लागलं असतं. दुचाकीस्वार कसा बसला ओव्हरटेक करत आहे हे या चित्रात दिसत आहे.

व्हिडीओमध्ये हे स्पष्टपणे पाहिलं जाऊ शकतंय की बस महामार्गावरुन प्रचंड वेगाने जात आहे. अचानक दुचाकीवर जाणारा एक तरुण वळणावर बस ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतो. अचानक त्याला बसने धडक दिली. काही सेकंदांसाठी असं वाटतं की, बसखाली आल्यानंतर तो तरुण वाईटरीत्या जखमी झाला असावा, परंतु तो बसखालून सुरक्षितपणे उठतो. महामार्गावरून जाणारे प्रवासी त्या तरुणाला बाईक उचलण्यास मदत करतात.

बसच्या खालून उठल्यानंतर संबंधित व्यक्ती आपले हात-पाय झाडून घेते आणि नंतर त्याच्या दुचाकीच्या दिशेने येऊ लागते. या दरम्यान, तो कधी बसकडे पाहतो तर कधी रस्त्यावर पडलेल्या त्याच्या दुचाकीकडे….!

हे ही वाचा :

नवी मुंबई एपीएमसी परिसरात मृतदेहाचे तुकडे करुन गटारात फेकणारा आरोपी गजाआड

खडू, पेन्सिल रुसले, रुसला माझा फळा…, गणेश सजावटीतून प्रबोधनात्मक देखावा

बेलापूरच्या आग्रोळी गावात पारंपरिक गौरी पूजनाचा थाट, सोनपावलांनी आलेल्या गौरींचे आज विसर्जन

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.