AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अग्नीवीर युवकांना सरकारी नोकरी, महिलांना दर महिन्याला 2100 रुपये, भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?

Haryana BJP Manifesto 2024: ग्रामीण आणि शहरी भागात पाच लाखांमध्ये घरकुल दिले जाणार आहे. 24 प्रकारच्या पिकांना किमान हमीभाव देणार आहे. पाच लाख युवकांना रोजगार उपलब्ध केला जाणार आहे. पाचशे रुपयात प्रत्येक गृहिणीला गॅस सिलेंडर पुरवले जाणार आहेत.

अग्नीवीर युवकांना सरकारी नोकरी, महिलांना दर महिन्याला 2100 रुपये, भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
BJP
| Updated on: Sep 19, 2024 | 12:46 PM
Share

Haryana BJP Manifesto 2024: मध्य प्रदेशात कमालीची यशस्वी ठरलेली ‘लाडली बहना योजना’ महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नावाने सुरु आहे. मध्य प्रदेशात पुन्हा भाजप सरकार येण्यास या योजनेचा महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे भाजपने इतर राज्यातही ही योजना सुरु करण्याचा संकल्प केला आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपला जाहीरनामा जाहीर केला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. जाहीरनाम्यामधून भाजपचा 20 कलमी संकल्प कार्यक्रम दिली आहे. त्यात हरियाणामध्येही भाजपकडून लाडकी बहीण योजना आणि अग्नीवीर युवकांना सरकारी नोकरी देण्याची गॅरंटी दिली आहे.

काय, काय आहे भाजपच्या घोषणापत्रात

हरियाणात सध्या भाजपचे सरकार आहे. परंतु येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा सत्ता मिळणार का? याबाबत विविध मतप्रवाह समोर येत आहे. त्याचवेळी राज्यातील अर्धी लोकसंख्या असलेल्या महिलांना आकर्षित करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यामुळे हरियाणामध्ये सत्ता आल्यास महिलांना दर महिन्याला 2100 रुपये दिले जाणार आहे. तसेच अग्नीवीर योजनेसंदर्भात युवकांमध्ये असलेल्या नाराजीमुळे त्या संदर्भात महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. अग्नीवीर युवकांना सरकारी नोकरीची गॅरंटी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात दिली आहे.

५ लाख युवकांना तरुणांना नोकरी

ग्रामीण आणि शहरी भागात पाच लाखांमध्ये घरकुल दिले जाणार आहे. 24 प्रकारच्या पिकांना किमान हमीभाव देणार आहे. पाच लाख युवकांना रोजगार उपलब्ध केला जाणार आहे. पाचशे रुपयात प्रत्येक गृहिणीला गॅस सिलेंडर पुरवले जाणार आहेत.

भाजप जाहीरनामा

मुख्यमंत्र्यांचा दावा, सर्व आश्वासने पूर्ण

मुख्यमंत्री नायबसिंग सैनी म्हणाले, आमच्या सरकारने पाच वर्षांपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. 2014 मध्ये दिलेली आश्वासने आम्ही पूर्ण केली आहेत. आम्ही 187 आश्वासने दिली होती आणि आम्ही अभिमानाने सांगू शकतो की आम्ही सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत. आम्ही आमचा जाहीरनामा पूर्ण केल्यामुळे लोक आमच्यावर विश्वास ठेवतात.आम्ही जे वचन देत आहोत ते पूर्ण केले जाईल. लोक आता काँग्रेसला कंटाळले आहेत. हरियाणातील लोक भाजपसोबत आहेत. भाजपचा तकलादू राजकारणावर विश्वास नाही. काँग्रेसने नेहमीच हरियाणातील जनतेचा विश्वासघात केला आहे, पण आता लोकांना काँग्रेसचा खरा चेहरा कळला आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.