5जी आणि कोरोनाचा काहीही संबंध नाही, अफवा पसरवल्यास कठोर कारवाई; हरियाणाच्या मुख्य सचिवांचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून 5जी नेटवर्कमुळे कोरोना होत असल्याच्या अफवा पसरत आहेत. (Haryana Chief Secretary Told To Take Action On Rumours Linking 5G To Covid)

5जी आणि कोरोनाचा काहीही संबंध नाही, अफवा पसरवल्यास कठोर कारवाई; हरियाणाच्या मुख्य सचिवांचा इशारा
5g tower
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 11:19 AM

चंदीगड: गेल्या काही दिवसांपासून 5जी नेटवर्कमुळे कोरोना होत असल्याच्या अफवा पसरत आहेत. हरियाणात तर या अफवांचं पेव फुटलं आहे. त्यामुळे हरियाणाचे मुख्य सचिव विजय वर्धन यांनी या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. अशा प्रकारच्या अफवा पसरविल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराच विजय वर्धन यांनी दिला आहे. तसेच देशात अजून 5जीची टेस्टिंगच सुरू झाली नसल्याचंही वर्धन यांनी स्पष्ट केलं आहे. (Haryana Chief Secretary Told To Take Action On Rumours Linking 5G To Covid)

हरियाणाचे मुख्य सचिव विजय वर्धन यांनी एक पत्रक काढून हा इशारा दिला आहे. त्यांनी राज्यातील सर्व डीसी आणि एसपींना हे पत्रं पाठवून अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. 5जीमुळे कोरोना होत असल्यांच्या अफवांचं पेव फुटलं आहे. काही असामाजिक तत्त्वांकडून या अफवा पसरविल्या जात आहे. कोरोनाचा आणि 5जीचा काहीही संबंध नाही. त्यामुळे अशा अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश वर्धन यांनी पोलिसांना दिले आहेत. काही असामाजिक तत्त्वांकडून अफवा पसरवून 5जीच्या टॉवरला क्षती पोहोचवण्याचं कामही हो आहे. त्यांच्यावर तातडीने कारवाई करा. तसेच टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चरला हानी पोहोचणार नाही, याची काळजी घ्या, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.

5जीची टेस्टिंगच सुरू नाही

5जी आणि कोरोनाचा काहीच संबंध नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. देशात अजून 5 जीची टेस्टिंगही सुरू झालेली नाही. केवळ जनतेला संभ्रमित करण्यासाठी सोशल मीडियावरून अशा प्रकारच्या अफवा पसरविल्या जात आहेत. अशा अफवांना काहीही वैज्ञानिक आधार नसल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानेहे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अशा अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. (Haryana Chief Secretary Told To Take Action On Rumours Linking 5G To Covid)

संबंधित बातम्या:

Corona Cases in India | देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत 17 हजारांनी घट, मात्र कोरोनाबळी पुन्हा वाढले

Maharashtra Coronavirus LIVE Update : सोलापुरात ग्रामीण भागात आजपासून दहा दिवस कडक लॉकडाऊन

CM Uddhav Thackeray | कोकणावर कोरोना आणि तौक्ते वादळाचं दुहेरी संकट – मुख्यमंत्री

(Haryana Chief Secretary Told To Take Action On Rumours Linking 5G To Covid)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.