हे कुटुंब अख्खे IAS अन् IPS अधिकाऱ्यांचे, आई- मुलगा आयएएस तर मुलगी आयपीएस

IAS and IPS officer family | एक शेतकऱ्याचे कुटुंबाने कमाल केली आहे. कुटुंबात आयएएस आणि आयपीएस आहेत. कुटुंबातील एकूण अकरा जण क्लासवन अधिकारी आहेत. त्या शेतकऱ्याचे शिक्षण चौथीपर्यंत झाले होते. शेतकऱ्याने आपल्या परिवारात शिक्षणाचा असा आदर्श निर्माण केला की अनेक अधिकारी तयार झाले.

हे कुटुंब अख्खे IAS अन् IPS अधिकाऱ्यांचे, आई- मुलगा आयएएस तर मुलगी आयपीएस
Follow us
| Updated on: Jan 04, 2024 | 3:23 PM

नवी दिल्ली, दि. 4 जानेवारी 2024 | काही करण्याची इच्छा आणि महत्वकांक्षा असली तर मग काहीच अशक्य नाही. चौथीपर्यंत शिक्षण झालेल्या एका शेतकऱ्याच्या कुटुंबाने हे दाखवून दिले आहे. त्या शेतकऱ्याच्या कुटुंबात एक, दोन नव्हे तर तब्बल अकरा जण आयएएस आणि आयपीएस झाले आहेत. अगदी आई, मुलगा आणि मुलगीही आयएएस आणि आयपीएस झाले आहे. हे शेतकरी म्हणजे हरियाणातील चौधरी बसंत सिंह श्योकंद (Chaudhary Basant Singh Shyokand) आहे. त्यांनी आपल्या परिवारात शिक्षणाचा असा आदर्श निर्माण केला की अनेक अधिकारी तयार झाले.

शिक्षण केवळ चौथी पण…

हरियाणामधील जींद जिल्ह्यातील डूमरखा कला हे गाव आहे. या गावात राहणारे चौधरी बसंत सिंह श्योंकद यांच्या परिवारात दोन आएएस, एक आयपीएससह 11 जण ग्रेड-वन ऑफिसर आहेत. बसंतसिंह चौथी शिकले असली तरी त्यांची मैत्री अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी होती. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना अधिकारी बनण्याचे स्वप्न दाखवले. ते मार्गदर्शन करत राहिले, मुले मेहनत राहिली. अन् एकामागे एक ग्रेड वन अधिकारी झाले. चौथीपर्यंत शिक्षण झालेले बसंत यांचे वयाच्या 99 वर्षी निधन झाले. त्यांच्या परिवारातील प्रत्येक सदस्य त्यांच्या यशाचे श्रेय त्यांनाच देत आहेत.

हे सुद्धा वाचा

आई अन् मुलगा आयएएस तर मुलगी आयपीएस

बसंत सिंह यांचा मोठा मुलगा रामकुमार श्योकंद कॉलेजमध्ये हे प्रोफेसर होते. ते निवृत्त झाले आहेत. त्यांची पत्नी जयवंती श्योकंद आयएएस तर त्यांचा मुलगा यशेंद्रही आयएएस आहे. त्यांची मुलगी स्मिती चौधरी आयपीएस आहे. स्मिती यांचे पती राजेश कुमार बीएसएफमध्ये आयजी आहेत. बसंत सिंह यांचा दुसरा मुलगा सज्जन कुमार जीएम होते. त्यांची पत्नी क्लास वन अधिकारी होती. तिसरा मुलगा वीरेंद्र क्लास वन अधिकारी तर त्यांची पत्नी इंडियन एअरलाइंसमध्ये डिप्टी मॅनेजर आहे. बसंत सिंह यांचा चौथा मुलगा गजेंद्र सिंह भारतीय लष्करात कर्नल होते. ते निवृत्त झाले. बसंत सिंह यांची मुलगी बिमला यांचे पती वकील आहे. दुसरी मुलगी कृष्णा ही प्राचार्य होती.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.