पोलिसांनी धमकावलं, पीडित कुटुंबाचा गंभीर आरोप; हाथरसमधून ‘टीव्ही9 मराठी’चा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकरणात मीडिया कव्हरेज करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

पोलिसांनी धमकावलं, पीडित कुटुंबाचा गंभीर आरोप; हाथरसमधून 'टीव्ही9 मराठी'चा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट
Follow us
| Updated on: Oct 03, 2020 | 12:08 PM

हाथरस, उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या हाथरस इथल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. अशात या प्रकरणात कुटुंबियांनी धक्कादायक आरोप केले आहेत. पीडितेच्या कुटुंबियांना धमकवण्यात आलं असल्याचा धक्कादायक दावा तरुणीच्या काकीकडून करण्यात आला आहे. ‘आमच्या पुरूषांना मारहाण करण्यात आली. आमच्यावर केस मागे घेण्यासाठी दबाव टाकत होते. पोलीस आणि जिल्हा प्रशासन धमकी देत होते. प्रकरण दाबण्यासाठी सांगत होते’ असा गंभीर दावा पीडित तरुणीच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. (Hathras Case gang rape family allegation on police exclusive news)

टीव्ही 9 मराठीला माहिती देताना कुटुंबाकडून हा दावा करण्यात आला आहे. यावेळी पीडितेच्या काकी पुढे म्हणाल्या की, ‘पोलिसांनी पैसै घेऊन प्रकरण मागे घेण्यास सांगत होते.’ यावेळी आमच्या प्रतिनिधींनी पीडितेच्या आईचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ‘एसडीएम आणि पोलिसांनी आम्हाला बंदिस्त करून ठेवलं होतं. पोलीस घराबाहेर होते, घराच्या छतावर होते. आम्हाला घराबाहेर पडू दिलं नाही आणि धमकावण्यात आलं.’ अशी माहिती त्यांनी दिली. कुटुंबाच्या या दाव्यामुळे नागरिकांमध्ये आणखी संताप वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकरणात मीडिया कव्हरेज करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. एसआयटी तपास करायचा होता म्हणून दोन दिवसांपासून कव्हरेजवर बंदी घाण्यात आली होती. पण आता तपास पूर्ण झाल्यानंतर पुन्हा परवानगी देण्यात आली आहे. (Hathras Case gang rape family allegation on police exclusive news)

हाथरसच्या घटनेनंतर संबंध भारतभरातून संताप व्यक्त केला जातोय. देशभरात निषेध आंदोलने सुरू आहेत. तर दुसरीकडे तेथील स्थानिक प्रशासनाची मुजोरी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. पीडित कुटुंबाला घराबाहेर पडण्यास प्रशासनाने मनाई केली होती. पीडित कुटंब सध्या दहशतीच्या वातावरणात आहेत. पोलिसांनी पीडितेच्या संपूर्ण घराला वेढा दिला होता. प्रसारमाध्यमांना देखील वार्तांकन करण्यास मनाई केली गेली होती. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारचा नेमका काय हेतू आहे? असा प्रश्न वारंवार विचारला जात होता.

याआधीही पीडित मुलीच्या भावाने आम्हा सगळ्या कुटुंबीयांना घरात डांबून ठेऊन पोलिसांना मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला होता. इतकंच नाही तर आमचे फोनही काढून घेतले गेले होते. जेणेकरून आम्ही कुणाला काही बोलू नये, कुणाला काही सांगू नये, असं पीडितेच्या भावनं म्हटलं होतं.

संबंधित बातम्या –

Headlines | हाथरसचे SP आणि इतर चौघे निलंबित

हाथरस, बलरामपूरप्रकरणात हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला?, शिवसेनेचा भाजपला सवाल

(Hathras Case gang rape family allegation on police exclusive news)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.