भारतात कसा असणार कोरोना लस वितरणाचा प्लॅन, केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणतात….
देशात 2021 च्या पहिल्या तीन महिन्यात लस उपलब्ध होईल, असं हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे (Health Minister Harsh Vardhan on Corona Vaccine).
नवी दिल्ली : संपूर्ण जगाचं लक्ष सध्या कोरोना लसीवर (Corona Vaccine) आहे. भारतात काही लसींची चाचणी अंतिम टप्प्यावर आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने लस नक्की कधी येईल? असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावतोय. या प्रश्नाचं उत्तर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ‘आजतक’ला दिलेल्या मुलाखतीत दिलं आहे. देशात 2021 च्या पहिल्या तीन महिन्यात लस उपलब्ध होईल, असं हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे (Health Minister Harsh Vardhan on Corona Vaccine).
“कोरोनाविरोधाच्या लढाईचा हा अकारावा महिना आहे. जगभरात एकूण 250 लसींच्या कंपन्या आहेत. यापैकी 30 कंपन्यांची नजर भारतावर आहे. देशात सध्या पाच लसींची चाचणी सुरु आहे. 2021 च्या पहिल्या तीन महिन्यात आपल्याकडे लस उपलब्ध होईल. सप्टेंबर 2021 पर्यंत 25 ते 30 कोटी भारतीयांना लस देण्यात आली असेल”, असा दावा हर्षवर्धन (Harsh Vardhan) यांनी केला आहे.
कोरोना लसीचं वितरण कसं होईल?
“सर्वातआधी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. त्यांनंतर फ्रंटलाईन वर्कर, पोलीस, पॅरामिलिट्री फोर्स यांना लस दिली जाईल. त्यानंतर 62 वयापेक्षा जास्त वयोगटाच्या नागरिकांना लस दिली जाईल. मग 50 वयापेक्षा जास्त वयोगटाच्या नागरिकांना लस दिली जाईल. त्यानंतर कोमर्बिडिटीच्या रुग्णांना लस दिली जाईल”, असं हर्षवर्धन (Harsh Vardhan) यांनी सांगितलं.
“कोरोना विरोधात लढण्यासाठी सर्व राज्य सरकार आणि नागरिकांना जागरुक राहण्यास सांगितलं गेलं आहे. सर्व नियमांचं सक्तीने पालन केलं जात आहे. स्थिती भयंकर असूनही नियंत्रणात आहे. देशातील 90 लाख रुग्णांपैकी 85 लाख रुग्ण ठीक झाले आहेत. भारताचा सर्वाधिक रिकव्हरी रेट आहे”, असं हर्षवर्धन म्हणाले (Health Minister Harsh Vardhan on Corona Vaccine).
‘सिरम इन्स्टिट्यूटची लस 90 टक्के प्रभावी’
दरम्यान, कोरोना लसीबाबत सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला (adar poonawalla) यांनीदेखील सूचक वक्तव्य केलं आहे. सिरम इन्स्टिट्यूटकडून विकसित करण्यात येणारी ‘कोव्हीशिल्ड’ ही लस कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 90 टक्के प्रभावी असल्याचं समोर आलं आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.
“कमी किमतीत उपलब्ध होणारी कोव्हिशिल्ड लस एका प्रकारच्या डोसमध्ये कोरोनावर 90 टक्के प्रभावी ठरत आहे. तर दुसऱ्या प्रकारच्या डोसमध्ये 62 टक्के प्रभावी आहे. याबाबतची विस्तृत माहिती संध्याकाळी देण्यात येईल.” असं अदर पुनावाला म्हणाले आहेत. तसेच, या लसचे वितरणदेखील लवकरच सुरु होईल असेही त्यांनी सांगितलं आहे.
I am delighted to hear that, Covishield, a low-cost, logistically manageable & soon to be widely available, #COVID19 vaccine, will offer protection up to 90% in one type of dosage regime and 62% in the other dosage regime. Further details on this, will be provided this evening. https://t.co/KCr3GmROiW
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) November 23, 2020
कोव्हीशिल्ड लशीची किंमत 500 ते 600 रुपये
‘कोव्हीशिल्ड’ ही लस फेब्रुवारी महिन्यात भारतात वितरीत व्हायला सुरुवात होईल. या लसीची किंमत 500 ते 600 रूपये इतकी असेल. त्यामुळे कोरोनाच्या संकटामुळे तणावाखाली असलेल्या भारतीयांना खूप मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
सिरम इन्स्टिट्यूटकडून पुढच्या महिन्यात केंद्र सरकारकडे ‘कोव्हीशिल्ड’च्या तातडीच्या मंजुरीसाठी अर्ज करण्यात येईल. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य सेवक आणि ज्येष्ठ नागरिकांना ही लस देण्याला प्राधान्य असेल. तर सामान्य जनतेसाठी मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून ही लस उपलब्ध होईल. ही लस साठवून ठेवण्यासाठी 2°C ते 8°C अंश सेल्सिअस तापमानाची गरज असेल. तर या लशीच्या एका डोसची किंमत 500 ते 600 रुपये असेल. केंद्र सरकार या लशीची मोठ्याप्रमाणावर खरेदी करणार आहे. त्यामुळे सरकारला ही लस 225 ते 300 रुपयांना मिळू शकेल.
संबंधित बामत्या :
Good News! भारतात डिसेंबरपर्यंत सिरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीचे 10 कोटी डोस पुरवणार
कोरोनावरील लस बनवण्यासाठी 900 कोटींचं अतिरिक्त बजेट; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा