केंद्राने देशाची जाहीर माफी मागावी, आरोग्य मंत्री राजीनामा द्या; चिदंबरम यांची मागणी

जगप्रसिद्ध संशोधन पत्रिका 'द लॅन्सेट'ने कोरोना परिस्थितीत हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचं सांगत मोदी सरकारच्या कारभारावर बोट ठेवले आहे. (Health minister should resign: P Chidambaram)

केंद्राने देशाची जाहीर माफी मागावी, आरोग्य मंत्री राजीनामा द्या; चिदंबरम यांची मागणी
P Chidambaram
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 12:10 PM

नवी दिल्ली: जगप्रसिद्ध संशोधन पत्रिका ‘द लॅन्सेट’ने कोरोना परिस्थितीत हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचं सांगत मोदी सरकारच्या कारभारावर बोट ठेवले आहे. त्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम आक्रमक झाले असून थोडी जरी लाज शिल्लक असेल तर केंद्र सरकारने देशाची जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली आहे. (Health minister should resign: P Chidambaram)

पी. चिदंबरम यांनी दोन ट्विट करून केंद्रातील मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. आजच्या लॅन्सेटच्या अग्रलेखानंतर थोडी जरी लाज बाकी असेल तर सरकारने देशाची सार्वजनिक माफी मागावी. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्र्याने त्वरीत मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी पी. चिदंबरम यांनी केली आहे.

केंद्राला सल्ला

महामारीशी लढण्याचं काम एका मजबूत टीमवर आणि पंतप्रधानांवर सोडून द्यावं. आरोग्य मंत्री आणि डॉक्टर, सल्लागारांच्या टीमला त्यात स्थान देऊ नये, असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला आहे.

लॅन्सेटने काय लिहिलं?

भारतात 4 मे रोजी 2 कोटीपेक्षा अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झालाय. दररोज भारतात साधारणतः 3 लाख 78 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद होतेय. याशिवाय आतापर्यंत कोरोनामुळे 2 लाख 22 हजार कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. यात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचा धोका आहे. रुग्णालयं भरली आहेत आणि वैद्यकीय कर्मचारी थकले असून त्यातील अनेकांना कोरोना संसर्ग झालाय, असं लॅन्सेटच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

सोशल मीडियावर नागरिकांसह डॉक्टरही ऑक्सिजन, बेड आणि इतर वैद्यकीय सुविधांसाठी मदत मागत आहेत. दुसरीकडे कोरोनाची दुसरी लाट मार्चमध्ये येण्याआधी आरोग्यमंत्री हर्षवर्धन भारताने कोरोनाला हरवल्याची घोषणा करत होते. विशेष म्हणजे जागतिक पातळीवर वारंवार दुसऱ्या कोरोना लाटेविषयी आणि कोरोनाच्या नव्या विषाणूंबाबत इशारा दिला जात होता, असंही नमूद करण्यात आलं.

काँग्रेसची टीका सुरूच

चिदंबरम यांच्याआधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनीही मोदींवर टीका केली आहे. देशातील यंत्रणा नव्हे तर सरकार कोरोना रोखण्यात अपयशी ठरल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.

कोण काय म्हणालं?

सोनिया गांधी: संकट रोखताना सिस्टिम फेल झालेली नाही. तर मोदी सरकार फेल झाली आहे. मोदी निवडणुकीत मश्गूल राहिले. कोरोना संकटाबाबत दिलेल्या इशाऱ्यांकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आहे. कोरोना संकट रोखण्यासाठी तातडीची सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात यावी. कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचे इशारे दिलेले असतानाही आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यात आली नाही. ऑक्सिजन, औषधे आणि व्हेंटिलेटर आदी व्यवस्था उभारल्या नाहीत. नागरिकांना दिलासा देण्याऐवजी भाजपशासित राज्यातील सरकार हुकूमशहासारखे वागले. सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्मवर लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

राहुल गांधी: देशाला पीएम आवास नव्हे, श्वास हवा आहे. जनतेचा जीव जात आहे. पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली काही थांबलेली नाहीत. (Health minister should resign: P Chidambaram)

संबंधित बातम्या:

देशाला पीएम आवास नव्हे, श्वास हवा; राहुल गांधींचा हल्लाबोल सुरूच

लोकांचा जीव जातोय, पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली काही थांबत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल

देशवासियांना मोफत लस द्या, केंद्राविरुद्ध ममता सरकार थेट सर्वोच्च न्यायालयात

(Health minister should resign: P Chidambaram)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.